Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली जिल्हा दौरा नियोजित ०५ जुलै २०२३ | जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली - टी पॉइंट ते कोटगल या दरम्यानचा मार्ग सामान्य नागरिकांच्या रहदारीस बंद राहणार

गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, दिनांक ०५ जुलै २०२३ वार बुधवार रोजी भारताचे प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ( President Of India Honorable Smt. Draupadi Murmu) यांचा गडचिरोली जिल्हा दौरा नियोजित आहे.  तरी ०५ जुलै २०२३ रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली - टी पॉइंट ते कोटगल या दरम्यानचा मार्ग सामान्य नागरिकांच्या रहदारीस बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करू नये.
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंग ची व्यवस्था टी पॉइंट येथील खुल्या मैदानात केली असून, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनाची सोय मृदा संवर्धन कार्यालय, गडचिरोली या ठिकाणी केलेली आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या