Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलेल्या Inspirational "करिष्मा" ची संघर्षमय यशोगाथा

ख्वाहिशें उछाल दी है हमने

हौसलो की वादियों में

देखते हैं कितना दम है

मुश्किलों की आंधियों में !

या हिंदीतल्या ओळीला संपूर्णतः पूर्णत्वास नेऊन आज जिंकलेल्या अशा कीर्तिवंत आणि यशाच्या स्वप्नांत जगण्याच्या निराशेतून मरू पाहणाऱ्यांना परत जिवंत करणाऱ्या आणि जगण्याची, लढण्याची प्रेरणा देणाऱ्या तरुणीच्या संघर्षाची ही गाथा आहे. 

Made with Canva

"करिश्मा" या नावातच काहीतरी करिष्माई घडण्याची प्रचिती यावी. जेव्हा मार्ग संपलेला वाटावा. जेव्हा वाटावे सर्व रस्ते आता समाप्त झाले, तेव्हा एक नवीनच पायवाट दिसावी जी, मुख्य हमरस्त्याला ठेपावी असे घडल्यास आपण सहजच उद्गारतो. हा तर करिश्माच ! अशाच प्रकारच्या अनेक पैलूंवर म्हणजेच, आभाळ टेकलेल्या त्या क्षितिजाच्या अभासास ओळखून पलीकडे जाऊन नवी पायवाट शोधत आपले डेस्टिनेशन साकारले त्या प्रवासाची सुरुवात झाली ती वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी. 

वयाने अडविले मार्ग

स्वप्न NEET द्यावे, MBBS बनुन लोकसेवा करावी पण, मधल्या साथीच्या काळात अनेक स्वप्ने उध्वस्त झालीत त्याच काळाच्या ओघात करिष्माचे स्वप्न धूसर होत गेले. गडचिरोली जिल्हयातील उत्तर टोकावर गाव जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहातून खूप दूर, परिणामी होत असलेल्या एकूण स्पर्धा, आणि आपल्याला कराव्या लागणाऱ्या अनेक शैक्षणिक बाबींचा सामना त्यामुळे मार्ग अगदीच खडतर होत गेला. Intermediate नंतर सर्वांनाच स्पर्धा परीक्षेतील ओढच लागते असेही नाही. पण "करिष्मा" ला कमालीची ओढ लागली, BA प्रथम वर्षातच Appear म्हणून संधी मिळावी या हेतूने तिची एमपीएससी च्या स्पर्धेत उतरण्याची खूप घाई होती. द्वितीय वर्ष असायला हवे हे तिला ठाऊकच होते पण, निदान स्पर्धा परीक्षा तरी आपण देऊन पाहू ही तळमळ तिच्यात होती, त्याच काळात पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या "ताईची" तयारी आधीच पूर्ण. हा Syllabus आपला कंप्लीट आहे असे प्रतिपादन ती देत असायची. आता प्रश्न होता थोडाफार Physical चा आणि तो तिने आधीच ओळखून तयारी जोमात सुरू केली. पुन्हा एक प्रश्न मार्गात अडसर निर्माण करत होता. तो प्रश्न आता होता वयाचा कारण, या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास कमीत कमी १८ वर्षे पूर्ण झाली असायला हवे पण "करिश्मा" यातही कमीच होती. तेव्हा ती भरती देऊ शकली नाही. आणि दिलीच तरी त्यात काहीही साध्य होणारच नव्हते. म्हणून निमूटपणे आपल्या पूर्ववत शिक्षणाकडे लक्ष देत आपल्या स्पर्धा परीक्षेतील संधीकडे पाहू लागली.

सर्वांच्या आवडीची 

MSCIT शिकतांना तिला शिकविणाऱ्या कॉम्पुटर शिक्षिकेने करिष्माने आता आमच्या इन्स्टिट्युट ला जॉईन होऊन प्रशिक्षण कार्य करावे ही विनंती केली. त्या शिक्षिकेला आपण आवडली असावी म्हणून व या माध्यमातून आपल्या शैक्षणिक व घरच्यास आर्थिक सहकार्य होणार होते त्यामुळे ही संधी स्वीकारावे ही गोष्ट करिश्मास अगदीच पटली   आणि वडिलांनी सुध्दा या बद्दलचा निर्णय तिलाच ठरविण्यास दिला. आपली एक्साम पूर्ण करून ती इन्स्टिट्युट जॉईन करणार हे ठरले. दरम्यान आताच हातातून निसटून गेलेल्या पोलीस भरतीने आणि तिच्या त्या भरतीबद्दलच्या तयारीने मनात घर निर्माण केले होते. 

पुन्हा पोलीस भरती होण्याच्या बातम्या येऊ लागल्या. करिष्मा आता प्रथम वर्ष पूर्ण करून दुसऱ्या वर्षात होती. यावेळी ती १८ वर्ष पूर्ण करणार होती त्यामुळे आता तिला मागे हटण्याची किंवा हटविण्याची धमक कोणातच नव्हती. तिने बाबांना कळविले मी आता एक तर शिकणार, किंवा पोलीस बनणार आणि मी आता इकडेच राहणार. बाबांनी ओळखलं होतं आणि आधीच त्यांनी सांगितले तुझा निर्णय तूच घे आम्ही सहकार्य करू. 


आतापर्यंत आपण पाहत असलेला तिचा प्रवास हा एकदम सोयीस्कर वाटत असला तरीही, त्यात अनेक वादळे, अनेक समस्या होत्या. त्या कदाचित मी मांडू शकलो नाही. आतापर्यंतचा प्रवास हा तिलाच अनुभवता आला. पण यानंतर आलेल्या अनेक वादळांनी तिला धमकवण्याचा, थांबविण्याचा प्रयत्न केला तो पूर्ण निष्फळ ठरवत ती यातून बाहेर आली, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवणारे तिला शिकविणारे "चिंतन" सर हे साक्षीदार आहेत. 

प्रामाणिक जीवनशैली

पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. लेखी परीक्षेची तयारी ही आधीच ओळखून पूर्ण करून बसलेल्या करिष्माला एकच प्रश्न होता तो शारीरिक परीक्षेच्या संदर्भात. लेखी परीक्षेची तयारी म्हणा किंवा आपल्या एकंदरीत पोलीस भरतीची तयारी करताना ती इतकी प्रामाणिक असायची की, आपल्याला कितपत समजले आहे किंवा आपली तयारी कितपत झाली याची परीक्षा ती स्वतः आपल्या बाबांना विचारून त्यांच्याकडून उजळणी स्वरूपात करून घेत असे. कधीकाळी बाबांशी शेतावर गेल्यावर ती निवांत बसून अभ्यासाविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे घ्यायची असे तिच्या बाबांकडून ऐकावयास मिळते. 

प्रश्न एकच होता, शारीरिक चाचणी आणि पोलीस भरती प्रक्रियेत हाच कळीचा मुद्दा आहे कारण, पुढची पायरी ही शारीरिक चाचणी पूर्ण करूनच चढावी लागणार होती. याच दरम्यान तिला "चिंतन" सर हे त्या भागात पोलीस शिपाई म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असलेले शिक्षक मिळाले. एका नवख्या धावणाऱ्या मुलाला त्याचे पाय आणि ताकद वाढविण्यास खूप काळ लोटावा लागतो. पण करिष्माने अल्पावधीचतच आपल्या कमकुवत असलेल्या शरीरास अगदी दणकट बनविण्याचे हट्टच धरले. सकाळी ४.०० ला उठणे आणि १०.०० ला झोपणे ही दिनचर्या, शारीरिक चाचणी ची कसरत, त्यानंतर द्वितीय वर्ष असल्याने त्याचा अभ्यास, परत महाविद्यालय शिक्षण गडचिरोली या ठिकाणी आणि शारीरिक चाचणी घेणारे व जीव तोडून शिकविणारे शिक्षक हे गावाकडे. अशा स्थितीत एखाद्याची तारांबळ उडाली असती. सोमवार ते शुक्रवार महाविद्यालय करून परत गावी जाऊन शारीरिक चाचणीची तयारी करताना तिला कराव्या लागणाऱ्या तिच्या मानसिक आणि शारीरिक कष्टाने एखादा व्यक्ती खचून गेला असता. पण ती खचली नाही तिला प्रत्येक गोष्टीची ओढ असायची, गावाकडे जाताना कधी कधी मैदानात उतरून धावेन आणि महाविद्यालयात येतांना कधी पोहचून अभ्यास करेन ही ओढ असायची.


कोमल पायाच्या अनवाणी तळव्याने धावताना क्षणभर वाटलं की, आता पायात बूट घालून अंतिम तयारी जोरात करावी. कारण स्पर्धा जवळ आली होती. आता तिने स्वतःला संपूर्णतः झोकून दिले होते अभ्यासात आणि शारीरिक चाचणीत. रोज पायात काहीतरी दुखत असावे पण ती सांगत नव्हती, की तिला कळत नसावे ज्याप्रमाणे रोज काट्यात फिरणाऱ्या माणसास छोटासा काटा ऋतावा पण त्याने ते दुर्लक्षित करावे. पण जेव्हा तो काटा रुतून पायात उपद्रव करतो मात्र त्या वेळेस लक्ष देणे भागच पडते अगदी तसेच करिष्माला रोज थोडेफार दुखणारे पाय आता असह्य होऊ लागले होते. तेव्हा तिला पायाची समस्या आपल्या पोलीस भरतीचीच्या तयारीतील धोका असल्याचे संकेत मिळू लागले. तिने बाबांना आणि आपल्या सरांना याबाबतीत कळविले. हॉस्पिलमध्ये उपचाराने निष्पन्न झाले होते की, पायाच्या हाडात छोटासा भेग पडलाय. काही दिवस आराम करून योग्य होईल असा सल्ला डॉक्टरनी दिला पण, नुसता भेग आपल्याला काहीही करणार नाही म्हणून ती विसरून गेली की, आपण कुठल्या डॉक्टरकडे जाऊन पायाची भेग काढली किंवा प्रॉब्लेम आहे. आणि तिने परत आपली तयारी सुरू केली. या स्थितीत पायातले दुखणे थांबले होते की, दुखतच असावे हे तिलाच माहीत असावे. फक्त डोळ्यांसमोर पोलीस हे चित्र ठेऊन ती, धावताना "मी आता बरी आहे", "पाय व्यवस्थित आहे" असेच हसत म्हणत असायची.

धैयनिष्ठ, जिद्द आणि चिकाटी 

अभ्यासात उत्तम असल्याने शारीरिक चाचणीत साधारण गुण मिळावे ही अपेक्षा सर्वांना होती, कारण राहिलेली सर्व कसर ती लेखी परीक्षेत भरूनच काढणार होती. परीक्षा आता जवळ आली होती. पायातले दुखणे थांबले असे तिच्याकडून ऐकावयास मिळाले पण ते थांबले की नाही याची शास्वती नव्हतीच पण ती पायाला संपूर्णतः विसरली होती. इतक्यातच पुन्हा एका समस्येने तोंड उभे केले. यावेळी पायाची जखम सरळ पोटात आली होती. परीक्षेला काही दिवसच बाकी होती, जसे पायात दुखण्याचे लपवत बरेच दिवस काढलेली करिष्मा परत पोटात दुखणे रोजचे होते तरीही तिने सुचविले नव्हते. परत तिला ते असह्य होऊ लागले. पुन्हा एकदा बाबांना या विषयी कळविले, आता मात्र आई बाबांनी तिला घरी बोलावून घेतले, त्यांना आता वाटले की, हे सर्व करत असताना मुलीला फार त्रास होतोय, क्षणभर त्यांनाही वाटले असावे निदान या वर्षी तरी पोलीस भरतीचा नाद सोडूनच द्यावे. पण करिष्माला ते मान्य नव्हते. काहीही झाले तरी मी भरती देणारच हा तिचा दृढनिश्यय होता. आधीच पायातला त्रास त्यात आणखी ही भर काय करावे ह्या प्रश्नांसोबत बाबांनी परत हॉस्पिटल मध्ये तिला दाखल केले यावेळी तिला  Appendicitis असल्याचे निष्पन्न झाले. ह्यामुळे रोज पोटात सतत दुखत असायचे अभ्यासात आणि शारीरिक कसरत करताना अगदीच त्रास व्हायचे यावर गोंधळलेल्या करिष्मा व तिच्या बाबांना धिर देत "चिंतन" सर यांनी करिष्मा चे लवकरात लवकर दुखणे थांबावे व त्यामुळे भरतीत बाधा येऊ नये म्हणून शस्त्रक्रियेद्वारे अपेंडिक्स काढून टाकणं हा एकमेव उपाय आहे आणि तो आपल्याला आताच करावा लागेल हे सुचविले व तितक्याच ताकदीने प्रतिसाद देत करिष्माने तीही शस्त्रक्रिया करून घेतली. परत डॉक्टर यांनी करिष्मा ला काही दिवस आराम आणि शारीरिक कसरत यापासून दूर राहावे व खाण्याच्या अशा अनेक बाबतीत सूचना दिल्या.


ज्या प्रकारात आपण मागे आहो असे तिला वाटायचे आणि आताच खरी वेळ होती की त्यात जम बसवायचे म्हणजेच तिला शारीरिक चाचणीत कमी पडण्याची भीती होती आणि ती आता सध्या तरी शारीरिक चाचणीच्या तयारीपासून दूर राहणार होती. मनोमनी एकच ध्येय होते मी धावणार आणि मी करून दाखविनारच!. 


एका बाजूला पायात असलेले घाव, दुसरे शस्त्रक्रियेचे. पण म्हणतात ना, "जिद अगर जीत की हो तो घाव मायने नहीं रखते". ती मैदानात उतरली या वाघिणीने डरकाळी फोडली, पळत सुटली सुसाट मनात फक्त एकच ध्येय होते. आईवडिलांचे स्वप्न उराशी होते. त्या शिकविणाऱ्या सरांचे विश्वास होते. या सर्व सकारात्मक विचाराने धावण्याच्या आणि चाचणीत असलेल्या प्रत्येक इव्हेण्टला मात देण्याच्या प्रखर प्रकाशात तिच्या पायांच्या आणि पोटाच्या दुखण्याने सुध्दा धूसर होऊन नतमस्तक झाले असावे. कुण्या एका लेडीज पोलीसनी तिला जवळ ओढून लाड करत विचारले की, तू इतुकशी असून खूप जिद्दी आणि ध्येयनिष्ठ कशी ?

शारीरिक चाचणी संपली होती. आणि आपले काम तमाम करून ही बातमी न सांगताच ती बाबांजवळ आली डोळ्यातील पाणी बाहेर न काढता बाबांनी अगदीच प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सरांनी सुद्धा " शेवटी तू करून दाखविले" या इतक्याशा वाक्यातच संपूर्ण संघर्ष आणि विजयाचा जल्लोष उद्गारला. तिने युद्ध तेव्हाच जिंकले होते. लिस्टवर नाव येणे फक्त Formalities होती.

तरीही स्वच्छंदी आनंदी

सध्या अकोला येथे आपले पुढील कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आणि मूल्ये शिकण्यास  प्रशिक्षणास असलेली "करिष्मा पुडो"  धैर्यशील, तत्पर आणि आपली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणिव असणारी एक महिला पोलीस आपल्या गडचिरोली पोलीस दलाला प्राप्त झाली. 


ती कधीही आपल्या समस्या अथवा दुःखांचा कारण समोर करत आपल्या ध्येयातून भटकली नाही, ना माघार घेतली. नेहमी वागताना हसतखेळत जणू काही कुठलाच टेन्शन अथवा वेदना नसव्यात अशी वागण्याची सवय, काही जण म्हणत ही, काय लागणार पोलीस मधे ? ही तर धावत नाही. अभ्यास नाही, या संभ्रमात एकदा वॉर्डन ने चक्क कशी लागली देव जाणे ? हे शब्द वापरले. यावर वाटले त्याला एक थोबाडीत हाणून, ते क्षण दाखवावे जे करिष्माच्या प्रत्यक्ष जीवनात आलेले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या