महाराष्ट्र
गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तर्फे घेतली जाणारी Maharashtra Teacher Eligibility Test ही परीक्षा आधी १० ऑक्टोंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. दरम्यान देशातील UPSC ची पूर्वपरीक्षा ही त्याच तारखेला असल्याने या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होतील या गोंधळात आणि संभ्रमात विद्यार्थी असताना परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
ही Maha TET परीक्षा पुढे तारीख वाढवून ती ३० ऑक्टोंबर २०२१ ला आयोजित होती परंतु यावरही आणखी एका परीक्षेच्या तारखेने ग्रहण लावले. दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विभाग ची ग्रुप D ची लेखी परीक्षा याच तारखेला आयोजित होती. यात आणखी संभ्रम होऊन पुन्हा ही TET परीक्षा तारीख बदलण्यात आली.
आता ही परीक्षा एकाच दिवशी न व्हावी यासाठी युक्ती लढवून ती ३१ ऐवजी समोर न ढकलता ती एक दिवसाआधी म्हणजेच ३० ऑक्टोंबर २०२१ ला ठरविण्यात आली. आता पुन्हा एकदा या तारखेला ग्रहण लागले ते आणि पुन्हा एकदा ही तारीख बदलण्यात आली आहे.
MahaTET परीक्षेच्या तारखेचा खेळ संपेना असं झालं आहे. यावेळी ही परीक्षा देगलुर - बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिडणुक असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे शासनाकडून TET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या बातम्या येत असतानाच आधी हीच परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी हे शासन व परीक्षा परिषद TET बाबत गंभीर आहेत की नाही? हा प्रश्न प्रत्येक D.t.ed, B.ed. धारक भावी शिक्षक व्यक्त करतांना दिसत आहेत.
TET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक-
प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 26 ऑक्टोबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 : 21 नोव्हेंबर 2021, वेळ सकाळी साडेदहा ते एक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 : 21 नोव्हेंबर 2021, वेळ दुपारी 2 ते 4:30
Edited By - Sai Gedam
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box