Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत संपूर्ण माहिती ; Grampanchayat Mahiti By Gadchirolikar

ग्राम पंचायत संपूर्ण माहिती  ( Grampanchayat Mahiti )

भारतातील जास्तीत जास्त जनसंख्या हि खेड्यात वास्तव्य करते. महाराष्ट्रातही खेळात असणाऱ्यांची संख्या हि जास्त आहे. त्यामुळे पंचायत किंवा ग्रामपंचायत हा प्रत्येकालाच माहिती असणारा विषय आहे. बहुतेक जणांना आपल्या ग्रामपंचायतीची माहिती असेलही पण काही जणांना याविषयीची माहिती नसतेच आणि स्थानिक स्वराज्य संस्था या विषयी अनेक स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा एक महत्वाचा विषय आहे. आणि एक गावातील नागरिक म्हणून ग्रामपंचात विषयीची माहिती आपल्याला असायला हवी.  आपण ज्या गावात राहतो तिथे ग्रामपंचायत असते, छोट्या छोट्या गावात गावातील कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते. त्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या प्रमाणेच प्रशासकीय असलेले सचिव यांच्या तर्फे किंवा साहाय्याने गावातील कामकाज पाहिले जाते. आणि ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात शेवटचा महत्वाचा भाग असून तो खूप महत्वाचा आहे. आज आपण या लेखात ग्राम पंचायत विषयी, म्हणजेच ग्रामपंचायत काय आहे? ग्रामपंचायतीचे कामे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांची कामे आणि त्यांची निवड कशी होते. सचिवांची कामे कोणती ? या सर्व बाबीवर चर्चा करू.  

Grampanchayat Mahiti 


Gram Panchayat Information In Marathi 

    ग्रामपंचायत माहिती 

    महाराष्ट्र राज्याची निर्मिती हि १ मे १९६० ला  झाली. त्यापूर्वीपासूनच म्हणजेच १९५८ पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ५ नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. यानुसार प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असा उल्लेख करण्यात आला. ज्या गावाची लोकसंख्या ६०० पेक्षा जास्त असेल त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन केली जाते व ज्या गावाची लोकसंख्या ६०० पेक्षा कमी असेल तेथे गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.  

    लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य संख्येचा तक्ता खालीलप्रमाणे : Grampanchayat Mahiti 

                        लोकसंख्या         

     सदस्य संख्या 

                        ६०० ते १५००

     ७ सदस्य 

                        १५०१ ते ३०००    

     ९ सदस्य 

                        ३००१ ते ४५००

     ११ सदस्य 

                        ४५०१ ते ६०००    

     १३ सदस्य 

                        ६००१ ते ७५००    

     १५ सदस्य 

                        ७५०१ पेक्षा जास्त 

     १७ सदस्य 


    एखाद्या गावाची लोकसंख्या किंवा त्या गावाची सदस्य संख्या किती हे आपण अनुक्रमे सदस्य किंवा लोकसंखेवरून ओळखू शकतो. आपल्या गावाची लोकसंख्या यानुसार सदस्य संख्या असते. जर गावाची लोकसंख्या ६०० ते १५०० असेल तर त्या गावामध्ये ७ सदस्य असतात. जर गावाची लोकसंख्या १५०१ ते ३००० या दरम्यान असेल तर त्या गावाची सदस्य संख्या हि ९ अशी असेल जर गावाची लोकसंख्या ३००१ ते ४५०० अशी असेल तर त्या गावी ग्रामपंचायत सदस्य संख्या हि ११ असते. 

        जर गावाची सदस्य संख्या १३ असेल तर त्या गावाची लोकसंख्या हि ४५०१ ते ६००० या दरम्यान असणार आहे. आणि जर गावामध्ये ६००१ ते ७५०० लोकसंख्या असेल तर त्या गावामध्ये १५ ग्रामपंचायत सदस्य असतील आणि जर गावाची लोकसंख्या ७५०१ पेक्षा जास्त असेल तर या गावामध्ये १७ ग्रामपंचायत सदस्य असतात. महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ ग्रामपंचायत सदस्य असतात. 

    ग्रामपंचायत निवडणूक माहिती ( Grampanchayat Election Information In Marathi )

    ग्रामपंचायत निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून  जाते.  ग्रामपंचायत निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने केली जाते म्हणजेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदान करता येते त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. 

    ग्रामपंचायत निवडणुकीत काही जागा विशिष्ट् प्रवर्गासाठी राखीव असतात. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे 

    १. महिलांसाठी एकूण सदस्यसंख्येच्या ५०% जागा राखीव असतात. ( अनुसूचित जाती - जमाती व मागास प्रवर्गात महिलांना ५०% जागा राखीव असतात. ) 

    २. संबंधित ग्रामपंचायतीतील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जाती - जमातींचे प्रमाण यानुसार जागा राखीव ठेवल्या जातात. 

    ३. एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा मागास प्रवर्गाच्या नागरिकांसाठी राखीव असतात. ( 50%  महिला )

    ग्रामपंचायत उमेदवारीविषयी पात्रता 

    १. ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उमेदवारीसाठी म्हणजेच निवडणूक लढविणेसाठी वयाची २१ वर्षे पूर्ण असावी. 

    २.  तो भारताचा नागरिक असावा.

    ३. स्थानिक मतदार यादीत नाव असावे. 

    ४. ग्रामपंचायत सदस्य साठी किमान ७ वी पस असणे आवशयक आहे. 

    ५.  या व्यतिरिक्त निवडणुकीसाठी आवश्यक पात्रता. 

    How To Create Blog In Marathi

    मतदान पद्धत 

    ग्रामपंचायत मतदान हि प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते.

    ग्राम पंचायतीचे कार्य 

    • गावातील रस्ते बांधणे व  दुरुस्ती करणे. 
    • गावात दिवाबत्तीची सोय करणे. 
    • जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे. 
    • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे/राखणे. 
    • सांडपाण्याची व्यवस्था करणे. 
    • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. 
    • शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे. 
    • शेती विकास व पशुशन विकास सुधारणा योजना अमलात आणणे. 
    • गावात बाजार, जत्रा, उत्सव या संबधी व्यवस्था ठेवणे. 

    ग्राम पंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा 

    • पाणी पुरवठा, विद्युत, वैद्यकीय सुविधा व इतर 
    • शाळा, पोस्ट कार्यालय, बँक सुविधा, वाचनालय, व्यायाम शाळा, दूध संकलन केंद्र व इतर 
    • माहिती संगणीकीकरण व सेवा व वितरण 
    • शासनाच्या विविध सेवा व शासकीय योजना गावातील प्रत्येक कुटुंबात व प्रत्येक नारीकांस देणे किंवा मिळवून देणे. 

    ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारे विषय 

    • भूविकास 
    • जमीन सुधारणांची अंमलबाजवणी 
    • जमिनीचे एकीकरण 
    • मृदुसंधारण 
    • लघु पाट बंधारे
    • सामाजिक वनीकरण 
    • घर बांधणी 
    • खाडी ग्रामद्योग 
    • कुटीर उद्योग 
    • रस्ते, नाले, पूल 
    • पिण्याचे पाणी 
    • दळण वळण 
    • ग्रामीण विद्युतीकरण 
    • अपारंपरिक ऊर्जा साधने 
    • दारिद्र्य निर्मूलन 
    • प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण 
    • बाजार व जत्रा 
    • रुग्णालय व कुटुंब कल्याण 
    • महिला आणि बालविकास 
    • प्रौढ शिक्षण 
    • सांस्कृतिक कार्यक्रम 
    • सार्वजनिक वितरण 
    • उत्पादन 

    ग्राम पंचायतीचा कार्यकाळ 

    ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा ५ वर्षाचा असतो. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार ग्राम पंचायत विसर्जित करू शकते. 

     सरपंच ( निवड व कार्ये ) 

    सरपंचाची निवड हि सध्या प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने होते संबंधित ग्रामपंचायतीतील सर्व १८ वर्षावरील सर्व व्यक्ती ( जे गावच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत आहेत ) ते सर्व सरपंच पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. 

    सरपंचाचे कर्तव्ये व अधिकार : 

    महाराष्ट्र्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३८ नुसार सरपंचाची अधिकार व कर्तव्ये आहेत त्यानुसार ग्रामसुचीत नमूद केलेली कामे व जबाबदाऱ्या सरपंचांना पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये खालीलप्रमाणे सरपंचाचे अधिकार व कार्ये आहेत. 

    • ग्रामपंचातीच्या सभा बोलाविणे व त्या सभेचे अध्यक्षस्थान भूषविणे. 
    • ग्रामसभेत मंजूर ठरावांची अंमलबाजवणी करणे. 
    • ग्रामपंचायतीचे मालमत्तेचे संगोपन व संरक्षण करणे 
    • ग्रामपंचायतीचे अभिलेख, नोंदवह्या यांची सुव्यवस्था व देखरेख ठेवणे. 
    • ग्रामसभा व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने नियोजन करून ग्राम विकास आराखडा, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. 
    • ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे. 
    • शासकीय योजनांचा लाभ वंचित, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना मिळवून देणे. 
    • महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. 
    • ग्रामपंचायतीच्या कर्मचारी , नोकरवर्ग यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. 
    • ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे व सदस्याचे प्रवास भत्ता व देयक मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास असतात. 
    • ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश याची सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी असते. 
    • ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. 
    • प्रमाणपत्रे व दाखले आपल्या सहीने आणि ग्राम पंचायतीच्या सिक्का सोबत देणे ( शासनाच्या कोणत्याही निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे ) 
    • नेमणूक केलेल्या कर्मचारी याना निलंबित करण्याचे अधिकार सरपंचास असतात. 
    • ग्रापंचायत अधिनियमात प्रदान केलेले अधिकार तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी सरपंच हे पूर्णपणे जबाबदार असतात. 
    • आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे ( त्यांचे वेतन ग्रामनिधीतून  देण्यात येते ) अधिकार सरपंचास असतात. 

    सरपंच राजीनामा 

    सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात. अकार्यक्षम, गैरवर्तन सारख्या कारणावरून जिल्हा परिषद स्थायी समिती सरपंचास पदमुक्त करू शकते. 

    उपसरपंच : कार्ये व अधिकार 

    सरपंचानंतर उपसरपंच हे एक महत्वपूर्ण पद आहे.  सरपंचाची कार्य आणि कर्तव्य सुरळीतपणे पार पडावीत म्हणून उपसरपंचाला महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमात सूचित करण्यात आलेली कार्य उपसरपंचाला पार पाडावी लागतात. 
    • उपसरपंच : अधिकार व कार्ये सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच हा त्यांचे कार्यभार संभाळत असतो. 
    • सरपंचाने सोपविलेली कार्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे. 
    • मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ नुसार उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल  करता येतो. 
    • सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंचाने पुरेशा कारणाशिवाय आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या सभा बोलविण्यास कसूर केल्यास असा उपसरपंच पदासाठी अपात्र ठरतो. याबाबत जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम निर्णय ठरतो. 
    • उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे देऊ शकतो. 
    • अकार्यक्षमता, गैरवर्तणूक, भ्रष्टाचार, सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभा न घेणे ;या कारणामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. 
    • सरपंचाच्या गैरहजेरीत ग्रामपंचायतीचे सभा व ग्रामसभेचे आयोजन व अध्यक्षस्थान भूषविणे. 
    • सरपंच गावात सलग १५ दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असल्यास सरपंचाचे अधिकार व कर्तव्य पार पाडणे. 
    • सरपंचाचे पद रिक्त असल्यास नवीन सरपंच निवड होईपर्यंत सरपंचाच्या अधिकाराचा व कर्तव्यांना पार पाडणे. 

    उपसरपंच राजीनामा 

    उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात. अकार्यक्षम, गैरवर्तन सारख्या कारणावरून जिल्हा परिषद स्थायी समिती उप सरपंचास पदमुक्त करू शकते. 

    ग्राम पंचायत सदस्य 

    ग्राम पंचायतीत निवडणुकीत निवडून आलेले सर्व उमेदवार हे ग्राम पंचायतीचे सदस्य असतात. ग्राम पंचायत सदस्य यांचे अधिकार व कार्य खालीलप्रमाणे आहेत. 
    • ग्राम पंचायतीकडून मासिक सभेची नोटीस, सभेपूर्वी किमान तीन दिवस अगोदर सदस्यांना प्राप्त करण्याचा अधिकार असतो. 
    • सभेची नोटीस मिळाल्या नंतर त्यातील विषयाचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवून आणण्यास सहभागी होणे. 
    • सभेतील चर्चेमध्ये आवर्जून भाग घेणे. संबंधित विषयावर/ठरावावर आपली मत मांडण्याचा अधिकार ग्राम पंचायत सदस्यांना असतो. 
    • सभेतील ठरावाच्या मंजुरीसाठी मत देणे किंवा मतावर तटस्थ राहणे. 
    • आवश्यक असल्यास ग्राम पंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी/तपासणी करण्यासाठी मागणी करणे. 
    • ग्रामपंचायत मालमत्ता व निधी यांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे, चुकीच्या कारभारास विरोध करणे. 
    • ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कार्यास, मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या, ग्राम पंचायतीत भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायतीच्या ठरावाची पूर्णपणे अंमलबजावणी न करणाऱ्या पदाधिकाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्षांकडे किंवा जिल्हाधीकारी यांच्याकडे तक्रार/अर्ज करणे. 
    • सरपंचाने/उपसरपंचाने आपली जबाबदारी व कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पंचायत मंजूर करून घेऊन त्याला पदावरून काढून टाकणे. 
    Grampanchayat Gramsabha

    ग्राम सेवक 

    ग्रामसेवक हा ग्राम पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. त्याला ग्रामपंचायत सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा ग्राम चिटणीस सुद्धा म्हणतात. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून असलेले सर्व कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.  

    ग्रामसेवकाची निवड 

    ग्राम सेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधीकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्यांचे वेतन जिल्हा परिषद निधीतून होते. त्यांच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते. 

    ग्रामसेवकाची कार्ये 

    • ग्राम पंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. 
    • ग्रामपंचायतीचे दफ्तर/कार्यालय सांभाळणे. 
    • गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास बाबतील सल्ला देणे. 
    • लोकांना ग्राम विकासाच्या वेगवेगळया योजनांची माहिती देणे. 
    • करवसुली करणे. 
    • जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे. 
    • जन्म - मृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे. 
    • बालविवाह प्रतिबंध अधीकारी म्हणून काम पाहणे. 
    • मजूर नोंदणी अधिकारी चे कार्य 
    • बांधकाम कामगार नोंदणी चे कार्य 
    • जनमाहिती अधिकारी चे कामकाज 
    • जैव विविधता सचिव म्हणून कार्य सांभाळणे. 
    • विवाह नोंदणी 
    • आपत्कालीन समिती सचिव म्हणून काम पाहणे. 
    • वृक्षरोपण, शौचालय व स्वच्छता याबाबत जागृती व कामे करणे. 
    • ग्रामसभेला सचिव म्हणून कार्य करणे. 
    Sai Gedam ( Marathi Blogger / Youtuber ) Visit Our You Tube Channel Click Here

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या