नफा तोटा उदाहरणे शेकडा नफा शेकडा तोटा । PROFIT LOSS
नमस्कार मित्रानो स्पर्धापरीक्षा च्या दृष्टिकोनातून नफा तोटा ,शेकडा नफा शेकडा तोटा यावरची उदाहरणे आपल्याला परीक्षेत विचारली जातात तर नफा तोटा म्हणजे काय शेकडा नफा शेकडा तोटा कसा काढतात हे आपण पाहणार आहोत .
![]() |
नफा आणि तोटा |
नफा
नफा म्हणजे विक्री किंमत हि खरेदी किमतीपेक्षा जास्त असते त्यावेळी जो फायदा होतो त्याला नफा म्हणतात .
म्हणजे आपण एखादी वस्तू विकत घेत असू किंवा आपला प्रॉडक्शन असेल तर त्यावेळी विक्री किंमत हि खरेदी पेक्षा जास्त असायला हवं त्यावेळीच नफा होतो .
नफा सूत्र
उदा .१ विशालने एक सायकल ५००० रुपयाला विकत घेऊन ,७५०० रुपयाला विकली तर त्याला किती नफा झाला
नफा =विक्री किंमत -खरेदी किंमत यामध्ये खरेदी किंमत हि ५००० रुपयेआहे व विक्री किंमत ७५०० आहे सूत्रानुसार
नफा सूत्र =विक्री किंमत -खरेदी किंमत
नफा =७५०० -५०००
नफा =२५०० म्हणजे नफा हा २५०० रुपये झाला आहे .
उदा .२ विशाल ने एक वस्तू १,५०,००० रुपयाला विकली असता .त्याला ३५००० रुपयाचा नफा झाला .तर विशाल ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल
यामध्ये आपल्याला नफा व विक्रीची किंमत दिली आहे .तर आपल्याला खरेदी किंमत काढयाची आहे .
नफा =विक्री किंमत -खरेदी किंमत
३५०००=१,५०,०००-खरेदी किंमत
खरेदी किंमत =१,५०,००० -३५,०००
खरेदी किंमत =१,१५,००० खरेदी किंमत .
शेकडा नफा .
शेकडा नफा सूत्र
शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
शेकडा नफा काढताना एकूण झालेल्या नफ्याला १०० ने गुणायचे आपापल्या शेकडा काढायचा म्हणून त्याला खरेदी किमतीने भागायचं .
उदा. एका व्यक्तीला एक वस्तू विकल्यास त्याला १५०० नफा झाला असता त्या वस्तूची खरेदी किंमत हि ५००० तर त्या व्यक्तीला शेकडा झाला
शेकडा नफा =१५०० * १००/५०००
शेकडा नफा =३० %
तर त्या व्यक्तीला ३० %
शेकडा तोटा
शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × 100/ खरेदी
शेकडा तोटा काढताना प्रत्यक्ष तोट्या ला १०० ने गुणावे भागिले १०० असता आपल्याला शेकडा तोटा मिळेल .
उदा. एक वस्तू ५००० तोट्याने विकली त्या वस्तूची खरेदी किंमत हि ५०००० आहे तर शेकडा किती तोटा झाला .
शेकडा तोटा =५०००*१००/५००००
शेकडा तोटा =१० %
नफा तोटा सूत्र
नफा = विक्री – खरेदी
विक्री = खरेदी + नफा
खरेदी = विक्री + तोटा
तोटा = खरेदी – विक्री
विक्री = खरेदी – तोटा
खरेदी = विक्री – नफा
शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × 100/ खरेदी
विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100
विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100
खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box