Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

YouTuber आहात ? जाणून घ्या Title, Tag, Description विषयी ; You Tube Information In Marathi


YouTuber आहात ? जाणून घ्या Title, Tag, Description विषयी संपूर्ण माहिती 

जच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत Title म्हणजे काय ? YouTube Title कसे दिले जाते? YouTube Tags काय आहेत? YouTube tag कसे लावायचे आणि Description म्हणजे काय यासोबतच ते you tube description कसे लिहायचे ? किती ओळीत लिहायचे व कसे लावायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. 

मित्रांनो, बरेच जण YouTube वर व्हिडिओस अपलोड करतात. पण, मी बरेच व्हिडिओच्या description मध्ये पाहतो तर काहीच लिहिलेले दिसत नाही. Description हे SEO ( Search Engine Optimizations ) चा एक भाग आहे. त्यामुळे विव्हर्स यांना बऱ्याच वेळा काही गोष्टी किंवा माहिती शोधणे सोईस्कर होते.  

    काय आहे You Tube Title ? 

    मित्रांनो, आपण दिवसातून कित्येक वेळा You Tube ओपन करून विडिओ पाहत असतो. YouTube App ओपन केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे Videos दाखविले जातात. किंवा आपण एखाद्या विशिष्ट्य विडिओ ला सर्च करतो तेव्हा त्या सर्च केलेल्या माहितीशी निगडित आपल्यासमोर व्हिडिओस येतात. YouTube व्हिडिओस पाहतांना आपल्याला विडिओ चा पोस्टर म्हणजेच Thumbnail दिसतो त्या खालीच जे नाव लिहलेले असते तेच त्या व्हिडिओचे Title असते. हे Title किंवा शीर्षक आपल्याला आपले विडिओ Youtube वर रँक करण्यास किंवा Viewers समोर आपला विडिओ दाखविण्यास मदत करत असते. दाखविण्यास सहाय्यक ठरते. उदा. समजा एखाद्या You Tube वापरकर्त्याने सर्च केले कि, How To Create YouTube Channel आणि समजा तुम्ही तुमच्या व्हिडिओचे Title सुद्धा How To Create YouTube Channel असेच ठेवले तर तुमचा विडिओ हा त्या सर्च करणाऱ्यासमोर दाखविला जाईल. 

    Free Blog बनवा आणि लाखो कमवा Click Here

    मित्रांनो, समजा एकाच प्रकारचे Title बहुतेक लोकांनी ठेवले तर मग काय ? आणि साहजिकच YouTube वर आज अनेक युवक किंवा Content Creator आहेत जे अनेक विषयावर व्हिडिओस बनवितात आणि एका विषयावर अनेक जण व्हिडीओस बनवितात व ते Title सुद्धा एकसारखेच ठेवतात मग  YouTube कोणत्या व्हिडिओ ला सर्वात आधी किंवा वर दाखवेल ? तर अगदी मिळता जुळता जो title आहे किंवा सर्च करणाऱ्याने ज्या प्रकारे लिहून सर्च केले त्याच प्रकारे आपण Title लिहिले असेल तर, आपलाच व्हिडिओ सर्वात आधी दाखविला जाण्याची खूप शक्यता आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपला व्हिडिओ सुध्दा तितकाच महत्त्वाचा घटक आहे आणि तो परिपूर्ण माहिती देणारा आणि योग्य असला पाहिजे त्यामुळे Viewers संतुष्ट होऊन व्हिडिओ जास्त काळ पाहिलं आणि व्हिडिओ ची Engagement वाढेल व व्हिडिओ टॉप ला राहिण्यास मदत होईल.

    YouTube Video Title कसा लिहायचा 

    Video YouTube च्या सर्च लिस्ट मध्ये येण्यासाठी Title खूप महत्वपूर्ण आहे हे आपण पाहिले आता आपणास माहिती असायला हवी की, नेमके YouTube व्हिडिओज साठी Title कसे लिहायचे? हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्या जिल्हयाची सरकारी नोकरी भरती सुरु आहे. आणि त्या संबंधी तुम्ही माहिती वर व्हिडिओ बनविला आहे आता लोकं किंवा विद्यार्थी सर्च मरतील की, समजा तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा तर सर्च मारणारे सर्च मरतील " गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२" किंवा " गडचिरोली जिल्हा पोलीस भरती वैगेरे तेव्हा आपला व्हिडिओचा Tile सुध्दा तसाच असायला हवा तेव्हा नक्कीच तुमचा व्हिडिओ तेथे दाखविला जाईल याउलट जर तुम्ही पोलीस भरती असेच लिहिले तर फारच चांस कमी असणार की, तेथे तुमचा व्हिडिओ दाखविला जाईल.

    You Tube Video Title kasa lihaycha महत्वाच्या बाबी 

    🔷 YouTube Title लिहितांना आधी त्या व्हिडिओशी संबंधित YouTube वर कोणते title किंवा लोक काय सर्च करत आहेत कशाप्रकारे सर्च करत आहेत त्या Title किंवा सर्च Result ना आधी एका वहीत नोंद करून ठेवा. 

    🔷 लिहितांना लेटर म्हणजेच spelling कडेही लक्ष देणे महत्वाचे ठरते. 

    🔷 तुमचा Title हा तुम्ही बनविलेल्या विडिओ शी संबंधित असायला हवा. 

    You Tube Video Title kiti Letters मध्ये लिहू शकता 

    YouTube विडिओ title हे तुम्ही १०० Letters पर्यंत लिहू शकता.  शक्यतो कमीत कमी शब्दात जास्त Express करणारे शब्द वापरून Title लिहिण्याचा प्रयत्न करा. 

    त्यानंतर आता आपण Description विषयी माहिती पाहूया .

    What Is YouTube Video Description ( Video Description काय आहे )

    तुम्ही जेव्हा YouTube चे व्हिडिओ पाहत असता तेव्हा एखादा व्हिडिओ बनविणारा Youtuber तुम्हाला त्याचा Description Check करण्याविषयी सूचना देत असतो. म्हणजेच त्याने त्याच्या Description ला काही सूचना लिहून ठेवल्या आहेत. Video Description म्हणजेच एकंदरीत व्हिडिओचा सारांश. Title च्या खाली जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी आपल्याला Description लिहिलेले दिसेल. त्यालाच व्हिडिओ Description असे म्हणतात.

    Video Description लिहिण्याचा फायदा 

    आता बहुतेक लोकं व्हिडिओज तर अपलोड करतात पण, त्यांच्या व्हिडिओज ला अजिबातच Description लिहिलेले नसते. Video Description लिहिण्याचा फायदा किंवा उपयोग काय तर व्हिडिओ Description लिहिल्याने व्हिडिओ पाहण्यासाठी आलेल्या विवर्स यांना एकंदरीत तुमच्या व्हिडिओ बद्दल माहिती होत असते की, हा नेमका व्हिडिओ कशा संदर्भात असेल. व्हिडिओ Description लिहिल्याने काय फायदे होतात व किती महत्वाचे आहे ते आपण पॉइंट टू पॉइंट समझुन घेऊ.

    🔷 व्हिडिओ Description लिहिल्याने तुमच्या व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तुम्ही लिहू शकता.

    🔷 तुमच्या व्हिडिओ मधील काही त्रुटी किंवा सूचना तुम्ही description मधे सांगू शकता.

    🔷 तुम्ही जर Affiliate Marketing करत असाल म्हणजेच एखाद्या वस्तू किंवा सेवेची लिंक त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. उदा. Amazon किंवा ब्लॉग साठीची Hosting Affiliate Link

    🔷 एखाद्या Website ची लिंक देऊ शकता.

    🔷 तुमच्या Social Media Accounts च्या links त्या ठिकाणी देऊ शकता.

    🔷 एखादे PDF Files सुध्दा जोडता येईल.

    🔷 तुमचा एखाद्या दुसऱ्या चॅनल ची लिंक जोडण्यास मदत घेऊ शकता.

    🔷 तुम्ही जर मनोरंजन किंवा कॉमेडी व्हिडिओ बनवीत असाल एखादे शॉर्ट फिल्म बनविले असाल तर त्यांची नावे व संदर्भ सुध्दा लिहू शकता.

    YouTube Description किती लिहू शकतो 

    आपण आपल्या चॅनल वर YouTube Description हे 5000 Letters मधे लिहू शकतो. त्यामुळे YouTube Channel चालवणाऱ्या सर्वांनी या Features चा चांगला उपयोग करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनल ला योग्यप्रकारे SEO करून घ्यायचं आहे.

    हे सुद्धा वाचा : How To Add Bank Account For AdSense Payment

    You Tube Description कसे लिहायचे 

    मित्रांनो, You Tube विडिओ Description लिहितांना अनेक बाबी त्यात आपण अंतर्भूत करू शकता. YouTube शी निगडित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला Descriptions मध्ये Mention करणे अगत्याचे ठरते. You Tube Description हे विडिओ च्या बाबतीत तर आपण सांगू शकतोच आपण त्यातून Income सुद्धा कमवू शकतो या बाबतीत आपण चर्चा केलीच आहे. आता आपण पाहूया नेमके You Tube Description कसे लिहायचे ते सुद्धा आपण पॉईंट To पॉईंट समझून घेऊया. 

    🔷 सर्वात आधी लक्ष्यात घ्यावयाची गोष्ट म्हणजे तुम्ही You Tube Video Description हे ५००० letters मध्ये लिहू शकता आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे. 

    🔷 आधी तुम्हाला लिहायचा आहे कि, तुमचा विडिओ Title काय आहे. 

    🔷 त्यानंतर About Video तुम्हाला लिहायचा आहे. थोडक्यात तुमच्या विडिओ मध्ये तुम्ही कोणती माहिती दिली आहे. तुमचा विडिओ कशा संदर्भात आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे आहे. उदा. समजा तुमचा कूकिंग चा चॅनेल असेल आणि तुम्ही फिश कशी बनवायची असा विडिओ बनविला आहे तेव्हा त्याची संपूर्ण रेसिपी थोडक्यात तुम्ही Description ला लिहू शकता. आणि सोबत त्याला लागणारे साहित्य यांची यादी सुद्धा तुम्ही Description ला लिहू शकता. 

    🔷 त्यानंतर Disclaimer सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या Description मध्ये लिहू शकता. 

    🔷 Description ला ( # ) Hashtag तुम्ही वापरू शकता. त्यामुळे सुद्धा आपला विडिओ योग्य प्रकारे Optimize होईल. 

    🔷 तुमचे कोर्सेस किंवा Affiliate लिंक सुद्धा जोडू शकता. 

     आपण Title आणि Description विषयी माहिती पहिली आहे हे जितके महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचे आहेत ते म्हणजे Tags आणि ते You Tube ला जोडणे आवश्यकच आहेत. बऱ्याच जणांना Tag कसे जोडायचे व कोठे लिहायचे आणि ते कोठे शोधायचे हेच समजत नाही. त्या विषयीची माहिती आता आपण पाहणार आहोत. 

    Tag म्हणजे काय ?

    टॅग्स म्हणजे असे शब्द किंवा वाक्य जे आपल्या कन्टेन्ट शी निगडित असतात आणि You Tube च्या सर्च result मध्ये आपला विडिओ रँक करण्यास मदत करतात. 

    You Tube टॅग्स कसे लावायचे 

    मित्रांनो, तुम्ही विडिओ upload केले योग्य असा Title पण दिला आणि व्यवस्थित Description पण लिहिले त्यानंतर आणखी एक गोष्ट त्यात Add करावी लागणार ती म्हणजे टॅग्स आणि हे जोडल्या नंतरच तुमचा SEO पूर्ण विडिओ Publish करण्यास तयार असेल आता हे टॅग्स लावायचे कसे तर जेव्हा आपण विडिओ Upload करतो तेव्हा आपण You Tube Desktop Mode वर आणून त्यास Title , Description लिहितो त्याच ठिकाणी आपल्याला आपल्या You Tube Video ला Tags जोडण्यास Option दिलेला असतो. हे Tags तुम्हाला जवळपास ८ ते १० टॅग्स लावू शकता. You Tube टॅग्स लावतांना ते तुमच्या विडिओ आणि दिलेला Title व Description मध्ये आलेले शब्द किंवा वाक्य याच्याशी मिळते जुळते असल्यास ते एकदम Match होतील व आपला व्हिडीओ You Tube वर Rank होण्यास मदत होईल. 

    मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण You Tube Video चे Tag, Title व Description याविषयी माहिती पहिली याविषयी काही सूचना अथवा अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या Social Media अथवा Contact मधून संपर्क करू शकता. 

    माहिती आवडल्यास Subscribe करू शकता  अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या Site वर Update होत असते. 

    धन्यवाद. 

    Sai Gedam (  Marathi Blogger & Youtuber )

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या