#Tadoba #TadobaAndhariTigerReserve #MaharashtraTimes
ताडोबाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दररोज गर्दी करत असतात.तेथील प्राणी, पक्षी यांच्या करामतीने अनेकांचे मनोरंजनही होतं.मात्र सध्या सोशल मिडियावर खास करून वॉट्सॲपवर ताडोबात खतरनाक जीव आढळल्याची सनसनी पसरली आहे.पण खतरनाक जिवाची अद्याप ओळख पटलेली नाही.ताडोबात जावू नका,असा संदेश समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.संदेशा सोबत अक्राळविक्राळ असा एका जिवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या संदेशाबाबत महाराष्ट्र टाइम्स या वर्तमापत्राद्वारे ही माहिती खोटी असल्याचे बातमी आहे व याबाबत चंद्रपूर येथील पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांना या व्हायरल संदेश आणि व्हिडीओबाबतची सत्यता विचारली.हा संदेश खोडसाळपणा असून असा कुठलाच जीव ताडोब्यात नाही.पर्यटनासाठी ताडोबा सूरक्षित असल्याचे चोपणे यांनी म्हटलं आहे अशी सुद्धा माहिती महाराष्ट्र टाइम्स मधे आहे.
त्यामुळे पर्यावरप्रेमींनी व ताडोबा पर्यटकांनी तसेच जनतेनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. व अशा प्रकारे खोडसाळपणा कोणीही यापुढे न करावी अशी आशा आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box