१५ सप्टेंबर पासून पंचायत समिती, एटापल्ली येथील ८६ कंत्राटी शिक्षक बेमुदत कामबंद संपावर | रखडलेला पगार, एरियस साठी कामबंद आंदोलन !
जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे येणाऱ्या पंचायत समिती एटापल्ली येथील ८६ कंत्राटी शिक्षक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कामबंद आंदोलन हे मागील शैक्षणिक सत्रातील मार्च आणि एप्रिल माहे व वाढीव ५०००/- मानधन यासंदर्भात असणार आहे. पंचायत समिती एटापल्ली येथे जिल्हा परिषदेतील विविध शाळेवर ८६ कंत्राटी शिक्षक कार्यरत असून काहींना मागील शैक्षणिक वर्षाचे मार्च महिन्यांचे व एप्रिल महिन्याचे मानधन अजूनही मिळाले नाही परिणामी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे.
यासोबतच चालू शैक्षणिक सत्र सुरू होवून तीन साडेतीन महिने पूर्ण झाली तरीही एकही पंचायत समिती मधील कंत्राटी शिक्षकांचे मानधन प्राप्त झाले नाही. या आधी मानधन संदर्भात पाठपुरावा करूनही मानधन अजूनही मिळाले नाही त्यामुळे आम्ही पंचायत समिती एटापल्ली येथील कंत्राटी शिक्षक कामबंद आंदोलन अत्यंत शांततेने व कायद्या व सुव्यवस्थेचे पालन करून सुरू करतो आहोत अशी माहिती पं. स. एटापल्ली येथील कंत्राटी शिक्षक तिलेश मोहुर्ले यांनी दिली.
कंत्राटी शिक्षकांच्या काय आहेत मागण्या?
१) मागील सत्रातील सत्र २०२४-२५ माहे मार्च व एप्रिल महिण्याचे वेतन त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे.
२) चालु सत्र २०२५-२६ मधील माहे जुन ते चालू महिण्यापर्यंतचे वेतन दिवाळी पूर्वी एकत्रित देण्यात यावे.
३) मागील सत्रातील वाढीव रुपये ५०००/- एरीयस स्वरुपात दिवाळी पुर्वी अदा करण्यात यावे
४) सामुहीक रजा कामबंद आंदोलन सुरु असतांना रजाचे वेतन अदा करण्यात यावे
५) चालू महिण्याचे वेतन पुढील महिण्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान अदा करण्यात यावे
६) पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना विमा सुर
क्षा देण्यात यावे
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box