YouTube चॅनेल बनविण्यापासून तर बँकेत पैसे येण्यापर्यंतची संपुर्ण माहिती | YouTube सुरू करताय मग हे वाचाच!
"सर्वात आधी आपण हा लेख वाचत आहात म्हणजे हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि तो शेवटपर्यंत वाचणार हा माझ्यासाठी पुरस्कारच!"
आपण ह्या लेखात वाचक म्हणून आहात आणि जो वेळ देत आहात नक्कीच हा अमूल्य वेळ काहितरी शिकण्यासाठी आणि आपण ह्यात निर्णय घेऊ शकता म्हणजे उद्या तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन आपला वेळ केवळ खर्च करायची की खूप मोठे व्हायचे हे ठरवू शकता. चला तर मग आपल्या ह्या YouTube विषयी प्रवासाला सुरुवात करूया.
नमस्कार, मी Sai Gedam ( Gadchirolikar) या नावाने एक YouTube Channel चालवतो आहे. आणि जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त काळ आज YouTube वर काम केल्याचा अनुभव आहे. YouTube वर काम करतांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि काय करू नये हे मी नक्कीच सांगू शकतो. कारण बराच काळ मी थोडा थोडा का असेना ह्यात घालविला आहे त्यामूळे YouTube Channel कसा बनवायचा, नाव कसा द्यायचं, Subscribers कशे मिळवायचे? Channel ची Settings कशाप्रकारे करायची ?, Thumbnail काय आहे, Title, Tag आणि Description कशाप्रकारे लिहायचे ? Video Upload कसे करावे , व्हिडिओ कसे Viral होतात?, त्यानंतर Google AdSense Account कसे बनवायचे ? त्याला आपल्या YouTube ला कसे जोडायचे ? Google AdSense Account काय? त्याची पिन कधी येते ? त्याला आपल्या बँक खात्याशी कसे जोडायचे ? वैगेरे ची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देणार आहे. तेव्हा आपला Website ला subscribe नक्की करा. आणि आपल्या YouTube Channel पण Subscribe करायला विसरू नका. त्या ठिकाणी सुध्दा या बद्दल मी व्हिडिओज आणि माहिती देतच असतो. YouTube Channel ची लिंक या लेखाच्या खाली मिळेल किंवा YouTube अथवा Google वर Gadchirolikar असे Search करा.
YouTube Channel कशासाठी ?
मित्र आणि मैत्रिणींनो हा प्रश्न जेव्हा मला विचाराल तेव्हा सर्वात आधी मला YouTube चॅनल सुरू करावे वाटले ते थोडेफार काहीतरी पैसे कमविता यावेत म्हणून आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी जी माहिती शोधत असायचो ती माहिती मला YouTube ला फारच कमी मिळायची. सर्वात महत्वाचे म्हणजे मला शिक्षक बनायचे असल्याने शिक्षक भरती Regular होत नसल्याने YouTube हा एक शिकविण्यासाठी सुध्दा उपयोगात येईल व हीच आपली शाळा समजू लागलो. त्यामुळे एकंदरीत मी माझा YouTube Channel सुरू केला. तुम्ही सुध्दा YouTube Channel वेगवेगळ्या कारणांमुळे सुरू करू पाहत असाल, कोणी आपली कला जगासमोर यावी म्हणून YouTube Channel सुरू करू पाहत असेल तर कोणी फक्त पैसे कमवायचे म्हणून आणि साहजिकच पैसे कोणाला कमविणे आवडणार नाही. तुमचा उदेश काही पण असो पण त्यामागचा हेतू चांगलाच असावा जेणेकरून तुमच्या YouTube Channel ने दुसऱ्यांचा फायदा किंवा दुसऱ्यांना काहीतरी शिकता येईल किंवा मनोरंजनाबरोबरच काही तरी Value मिळेल. तेव्हा तुम्ही तुमचा YouTube Channel सुरू करू शकता.
पैसे कमविण्यासाठी YouTube Channel
बरेच जण आहेत जे YouTube वर अनेकांचे Videos पाहत असतात. YouTube वर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात ते खूप पैसे कमविले जातात किंवा कमवीत आहेत असे सांगत असतात आणि तर खरही आहे. आज भरपूर युवक, युवती आहेत ज्या YouTube वर काम किंवा Content Upload करून बऱ्यापैकी Income मिळवत आहेत. पण त्यांचा मुख्य हेतू फक्त पैसाच मिळविणे हा असेल का? मित्र आणि मैत्रिणींनो पैसे कमविणे कोणाला आवडणार नाही. आणि आजची स्थिती पाहता इतरत्र कोठेही जॉब मिळविणे अधिकच स्पर्धेचे झाले आहे. आणि सर्वांनाच वाटत असते की, आपल्याला पण एक चांगला जॉब मिळावा. कोणी जॉब करत असेल तर त्याला आपल्या मिळत असलेल्या पगारात काही गोष्टी किंवा तो पगार कमी पडत असेल तर, असे काम पहावेसे वाटते की, त्यातून पुन्हा काही Income मिळू शकेल. अनेक गरीब विद्यार्थी असतात जे शाळेत,महाविद्यालयात किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांना सुध्दा वाटत असते की आपल्याला थोड्याफार प्रमाणात आपला खर्च व गरज भागविण्यासाठी काही पर्याय मिळावा. अशा अनेक गृहिणी, माता आणि बहिणी आहेत ज्यांना सुध्दा वाटत असते की आपण सुध्दा घरबसल्या काहीतरी कामे करून थोडेफार पैसे मिळवावे आणि घरी हातभार लावावं. असे जण आहेत ज्यांना पैशांच्या बाबतीत विचार करायला भाग पडतच असतो. अशा सर्वांना YouTube ही एक पैसे कमविण्याची संधी म्हणून पाहता येईल.
YouTube मुळे नवीन ओळख
मुझे कूछ नया कर दिखाना है. मुझे कूछ करणे का जूनून अंदर से तो आ रहा है पर कैसे करू ? मला काहीतरी आगळेवेगळे करायचे आहे. मला काहीतरी नवीन करायचे आहे. असे बहुतेकांना वाटत असते ते मनोमनी विचारच करत बसतात. पण मात्र ते करावे काय आणि कसे करावे यातच फार विचार करत बसतात. आपले कर्तब व प्रतिभा दाखविण्याचे अनेक मार्ग आणि पर्याय आहेत. तुम्ही एक चांगले खेळाडू असाल तर अनेक खेळात भाग घेऊन तुमचे खेळ दाखवू शकता. तुम्ही एक चांगले कलाकार असाल किंवा तुम्हाला आवड असेल तर नाटकांत, किंवा चित्रपटात काम करू शकता. तुम्ही एक चांगले स्वयंपाक बनवीत असाल तर एक मोठ्या हॉटेलात तुम्ही भरपूर पैसे घेऊन शेफ होऊ शकता. तुम्ही एखादा विषय शिकविण्यास पारंगत असाल तर शिकवून आपली वेगळी ओळख निर्माण करू शकता पण, तुम्हाला चित्रपटात कोण काम देणार? कोण तुम्हाला शेफ म्हणून ठेवणार ? तुम्ही चांगला नृत्य करताय हे लोकांना कसे कळणार अशा अनेक बाबी आहेत ज्या लोकांच्या नजरेत येणे आवश्यक असते. तेच काम नेमके YouTube मार्फत केले जाऊ शकते. Youtube मुळे आज अनेक जण आहेत ज्यांची प्रतिभा लोकांसमोर येऊन ती मंडळी आज प्रकाशझोतात आली आहेत परिणामी त्यांची ख्याती देशभर, जगभर पसरली आहे एकंदरीत त्यांना YouTube मुळेच नवीन ओळख मिळाली आहे.
Be Creator Not A Viewer
अनेक युवक आज तासंतास Reels किंवा YouTube ला Video's पाहत असतात. काही जण आपल्या कामातून, अभ्यासातून रिलॅक्स किंवा थोडा वेळ घालवण्यासाठी येतात तर काही जण YouTube मधे वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी शिकण्यास येतात. मग हे सर्व लोकं असतात Viewers. याउलट आपण जे व्हिडिओज पाहतो ते ज्यांनी Uplad केले आहेत ते आहेत Creator! ते आपल्या विडिओतून लोकांना Value देऊन त्याबदल्यात नाव व पैसे कमवीत असतात. मग आपल्याला तो Creator व्हायचं आहे म्हणून तुम्ही YouTube वर काम करू शकता.
YouTube Channel कसा बनवायचा ? How To Create YouTube Channel In Marathi
YouTube Channel चे फायदे आणि महत्व आपण पाहिले आता आपण प्रत्यक्ष आपल्या YouTube Channel Free Course ला सुरुवात करूया. यात सर्वात आधी आपण पाहू की, आपल्याला समान कोणकोणते लागणार.
YouTube Channel सुरू करण्यासाठी काय काय लागणार?
1. मोबाईल किंवा लॅपटॉप/कॉम्पुटर
2. इंटरनेट
3. मोबाईल स्टँड ( Tripod )
4. Mic
मित्रांनो मी वर फक्त चारच अशा वस्तू दिल्या आहेत ज्या तुमच्याकडे असतील तर फारच छान होईल आणि जर त्या नसतील तरी काम चालू शकते, आता ते कसे ? तर तुमच्याकडे फक्त मोबाईल फोन आणि त्यात internet असेल तर झाले इतकेच पुरेसे आहे. पण एक गोष्ट यात लक्ष्यात घ्यायची म्हणजे लोकांना किंवा Subscriber ना तुमचा आवाज योग्य पद्धतीने जावे यासाठी Mic वापरले तर फारच छान पण सुरुवातीला तुमचा बजेट नसेल तर तुम्ही फक्त मोबाईल नेच सुरुवात करू शकता किंवा Headphones चा सुध्दा वापर करू शकता. तुमचा कॅमेरा हलायला नको यासाठी स्टँड असेल तर ठीकच आणि नसेल तरी चालेल. या गोष्टी नंतर आपण घेऊ शकतोच आधी सुरुवात करणे फार महत्त्वाचे. आणि हवी असल्यास हे तुम्ही मी वर दिलेल्या लिंक वरून घेऊ शकता अगदी योग्य असे वस्तू आम्ही निवडलेल्या आहे.
यूट्यूब चॅनल कसा बनवायचा? ( YouTube Channel Kasa Banvaycha )
सर्वात आधी आपल्याला एक आपला Gmail Account बनवायचे आहे. कारण YouTube हा एक Google चाच Platform आहे. Gmail Account कसा बनवायचा ? यावर आपण एक लेख लिहिला आहे तो पाहून बनवू शकता. खाली Step By Step माहिती दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा.
1. Gmail Account बनवा
2. Gmai Account Open केल्यानंतर तुम्हाला YouTube.Com Search करायचं आहे.
3. आता YouTube हे Application किंवा Desktop Mode वर तुमचा YouTube ओपन झाले असेल तेव्हा उजव्या बाजूस Create Channel असा Option दिसेल तिथे क्लिक करा नंतर YouTube Channel साठी नाव कोणता द्यायचं याबद्दल Option दिसेल तिथे नाव लिहा बस झालं तुमचं YouTube Channel तयार.
मित्र आणि मैत्रिणींनो आतापर्यंत आपण शिकलो की, YouTube चे महत्व आणि ते तयार कसे करायचे, कोणकोणत्या बाबी लागतात वैगरे.
आता आपण पाहूया की YouTube Channel बनवितांना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. मित्रांनो मी ज्या गोष्टी इथे सांगतोय त्या तुम्ही आधीच स्पष्ट आत्मसात आणि अंगीकृत करून घ्या कारण पुढे खूप अडचणी आणि प्रश्र्ने निर्माण होतात त्यामुळे आताच तुम्ही जर त्या अडचणी आणि प्रश्नावर अभ्यास करून ठेवलात तर नक्कीच पुढील अडचणींचा सामना करू शकाल. एक म्हण आहे, " पुढच्याला ठेच, मागचा शहाणा." तसच समजा. आपण पुढे पाहणार आहोत की कोणत्या तांत्रिक गोष्टी YouTube वर काम करतांना शिकाव्या लागतील पण तत्पूर्वी काही आवश्यक बाबी खाली दिलेल्या आहेत त्या आवर्जून वाचा.
YouTube सुरू करतांना ह्या बाबी लक्षात ठेवा.
१) संयम :
तुम्ही उद्या चॅनल सुरू केले आणि परवा व्हिडिओ Upload केले मग चौथ्या-पाचव्या दिवसापासूनच तुमच्या चॅनल वर खूप Views येतील. असे कधीच होणार नाही सर्वात आधी तुम्ही Channel सुरू केलात हेच कुणाला माहिती नसेल तर कसे Views येणार? तुम्ही सर्वात आधी व्हिडिओज Upload करता ते आपोआप कुणाला जात नाही कारण, तुम्ही नुकताच नवीन चॅनल सुरू केलात आणि तुमचा अजूनही एकही Subscriber जुडलेला नाही तर मग YouTube चा व्हिडिओ कोणाला जाणार ? एक चांगली गोष्ट ही आहे की YouTube कडून नवीन चॅनल अथवा नव्या YouTube Creators यांना चांगले वाव दिले जाते. त्यांना समोर नेण्याचा प्रयत्न केला जातो. समजा तुमच्या चॅनेल वर आज शून्य Subscriber आहे व तुम्ही आज एक व्हिडिओ Upload केला. तर सर्वात आधी तुमचा व्हिडिओ तुमच्या Subscriber जवळ Notification व्दारे पाठविले जाते पण इथे तुमचा Subscriber हा एकही नाही म्हणजे कोणालाच Notification जाणारच नाही तर मग Notification ने येणारा तुमचा Views एकही नाही म्हणजे शून्य Views. आता राहिली गोष्ट YouTube ची तर YouTube हा तुमचा व्हिडिओ तुम्ही YouTube ला Upload केले म्हणजे ते सर्व जगासमोर पाहायला Uploaded आहे. पण इथे काय होते की तो व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या ज्या विषयाला धरून तो व्हिडिओ Upload केला गेलेला आहे अशा काही लोकांना तो व्हिडिओ Suggest करतो म्हणजे दाखवीत असतो मग ते भाषा, विषय, स्थान, वय अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे जेव्हा त्या Suggested व्यक्तींनी तुमचा व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ पुन्हा अधिक लोकांना पाहायला Suggest केला जातो. अशा वेळेस जर प्रथमतः ज्या व्यक्तीसमोर तुमचा व्हिडिओ दाखविला गेला त्यानेच जर तुमचा व्हिडिओ पाहिला नाही तर पुढे तुमचा व्हिडिओ जास्त लोकांना दाखविला जात नाही याउलट तुमचा व्हिडिओ सर्वप्रथम Suggest केलेल्या लोकांनी पाहिला तर पुन्हा तो व्हिडिओ पुढे जास्त लोकांना दाखविला जातो. ही पुढे Suggest करण्याची YouTube ची एक वेगळीच कला आहे त्यात त्या Suggested लोकांनी किती वेळ तुमचा व्हिडिओ पाहिला, Like केले की Deslike, कीती लोकांनी Share केला अशा खूप मानके व मोजमाप आहेत. त्यामूळे ह्या बाबी लक्षात घेऊन आपण YouTube ला पदार्पण करावे. मित्रांनो ह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की, पूर्वी मी अपलोड केलेल्या विडिओसवर एक दोन views यायचे आज पाच मिनिटांत हजार views पण आरामात येऊन जातात.
२) शिकण्याची तयारी :
कोणतेही काम करण्यासाठी आधी ते काम शिकण्याची तयारी असावी लागते. त्याचप्रकारे YouTube वर काम करणे ह्यासाठी सुध्दा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील. त्यात लेखण, वाचन हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. YouTube पाहिजे तेवढे कठीण नाही पण ह्यात अनेक प्रकारच्या बाबी आहेत ज्या आपल्याला शिकुन घ्याव्याच लागतील.
३) सहनशीलता :
आपण YouTube असो वा इतर काहीही काम करत असूद्या जगात अनेक नमुने आहेत जे आपल्याला नमुना समजतील. तुम्ही जे YouTube Channel वर व्हिडिओ टाकलं त्यांबद्दल काहीही बोलतील, पण तुम्ही तुमचा काम करत रहा. एखादा आपलाच Subscriber किंवा फॅन आपल्या विडियोबद्दल काहितरी वेगळे बोलतो त्याचे आपल्याला अजिबात वाईट वाटायला नको कारण होऊ शकते त्याला ते व्हिडिओ कदाचित आवडले नसेल इन फॅक्ट त्यातूनच आपण आपल्या व्हिडिओ मधे सुधारणा शिकू शकतो म्हणून त्याचे वाईट वाटून न घेता ते स्वीकारा दुरुस्त करा अथवा तुमच्या मते योग्य असेल तर, You Should Go Ahead.
४ ) First Learn :
हा Point मी सांगितलेल्या दूसऱ्या पॉइंट शी समंधित आहे तो म्हणजे शिकण्याची तयारी. मित्रांनो आपल्याला ह्यात काम करायचे आहे आणि जे तुमचे ध्येनिश्चिती आहे ते पूर्ण करतांना आधी तुम्हाला शिकणे आणि त्याबद्दल जाणून घेणे खूप आवश्यक आहे. सर्वात आधी तुम्हाला हे माहित असायला हवे की आपण का? आणि कीती वेळासाठी करतो आहोत. एखाद्या वेळी किंवा सुरुवातीस तुम्हाला अनेक वाईट प्रसंगातून पुढे जावे लागेल आणि हे प्रत्येक कामात ते काम करताना अनुभवता येईल सेम आपला फोकस टिकून राहावे आणि संभाव्य धोके व प्रसंगाला सामोरे जाण्यास आपल्याला आधी ते शिकून घ्यावे लागेल म्हणजेच आपली Mistakes समजून ती सुधारून पुढे जाण्यास मदत होईल.
५ ) Nieche :
थोडक्यात सांगतो, nieche म्हणजे आपला YouTube channel कशासंबधी असणार म्हणजे आपण त्यात कोणते व्हिडिओज uplad करणार आहोत तो विषय. स्पष्ट असला पाहीजे. म्हणजे Right Way ने काम करायला मदत होईल.
YouTube ला नाव कोणते आणि कसे द्यायचे ?
मित्रांनो हा काही तेवढा महत्वाचा विषय नाही पण त्याचा पुढे जाऊन आपल्याला अनेक मार्गांनी फायदा होईल असा नाव ठेवण्यास मी तुम्हाला Suggestion देतो. YouTube वर केवळ चांगला नाव ठेवल्यास लोकं आपल्याशी जुळतील असे नाही. शेवटी आपले Content हेच King बनवतात. आणि आपल्या कामावर आपले म्हणजे आपले YouTube चे नाव बनते. उदा. तुमच्या YouTube Channel चे नाव "XYZ" असेल सुरुवातीला तुमच्या ह्या नावाला कोणी ओळखणार नाही पण, जेव्हा तुमचे व्हिडिओज खूप चालतील आणि लोकांना ते valuable वाटतील तेव्हा आपसूकच तुमच्या YouTube Channel चे नाव आपोआप प्रसिध्द होईल. किंवा एक असा नाव शोधा जो तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व करतात त्याचे प्रतिबिंब त्यात दिसेल. शेवटी नाव हे आपल्या कामावरच बनत असते, तरीही तुम्ही एक दृष्टी ठेवून आपल्या चॅनल चे नाव ठेऊ शकता.
Subscriber कशे मिळवायचे ?
Subscriber कशे मिळवायचे ? या आधी आपण जाणून घेऊ की Subscriber म्हणजे काय ? Subscriber सरळ जे असतात जे आपल्याला Follow करतात. म्हणजेच आपल्या Content चे उपभोक्ते असतात. आपल्या Videos चे मनोरंजन, शिक्षण अशा गोष्टी ऐकतात, शिकतात व काही जण अनुसरणही करतात. आणि ते नियमित आपल्याकडून अशा गोष्टी, मनोरंजन व शिक्षण मिळत राहावे ह्याकरिता Subscribe करत असतात.
मग आता हे Subscriber कसे येतात आणि ते मिळवायचे कसे ? मित्रांनो, एक - एक Subscriber मिळविणे आणि तो टिकवून ठेवणे हा मोठा, सर्वात मोठा आव्हान आणि महत्वाचा घटक आहे. कारण हाच घटक आहे जो आपल्याला YouTube वर कार्य करण्यास प्रेरणा देतो ज्यास आपण Subscriber म्हणतो तोच आपल्याला पुढे जाण्यास मदत करणार आहे. आपल्या YouTube चे एकंदरित भविष्य Subscriber यांच्याचवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. आता समजा आपण एखादा गंमतशीर व्हिडिओ YouTube ला Upload केला. तुम्ही तो व्हिडिओ खूप मेहनतीने बनविला आहे. तुमच्या मते Video खूपच मजेदार आहे पण, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे आता एकही Viewer नाही कारण तुम्ही नविन YouTube सुरू केलेले आहात. मग पाहणार कोण ? समजा youtube कडून काही लोकांना तो व्हिडिओ त्यांच्या Home Page ला दाखविला जाईल पण यापूर्वी तुमचे Views कमीच असल्याने त्या विडिओवर आणखी पाहणारे येतीलच याची शाश्वती नाही कारण श्रोते बहुतेक वेळा Views अथवा Subscriber ची संख्या पाहून येऊ शकतात ह्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशावेळी सुरुवातीस आपल्याला आपल्या व्हिडिओज व आपल्या चॅनल बद्दल लोकांना सांगावे लागेल.
आता प्रश्न पडला असेल की, मी कोणाला सांगणार तर तो काय म्हणेल ? तर मित्रांनो लक्षात घ्या. आपण जर कोणाला सांगणारच नाही की आपण काय करतो आहोत ते बघायला आणि ते बघणारच नाहीत तर त्यांना आवडणार की नाही ते आपल्याला कसे कळणार. ईथे प्रश्न हा नाही की आपली मेहनत चुपचाप केली पाहिजे आणि यश गोंधळ करेल. ह्यात आपल्याला सर्वात आधी सांगावेच लागेल की आपण काय करतो आहोत. समजा तुम्ही खूप सुंदर गाणे म्हणत असाल तर ते तुम्ही Record करून YouTube वर टाकू शकता. ते लोकांना दिसेल होऊ शकते ते गीत एखाद्या नाटक, चित्रपट अथवा लघुपट बनविणाऱ्या निर्मात्या अथवा दिग्दर्शकाच्या निदर्शनात येऊन जाईल. तुम्ही सर्वात आधी आपल्या कामाबद्दल घरच्यांना सांगू शकता कारण ते आपल्याला योग्य सल्ला देऊ शकतात सोबतच जवळच्या मित्रांशी आपल्या गोष्टी शेअर करु शकता. काही वेळेस ते आपल्याला योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत करू शकतात त्यामुळे योग्य तो निर्णय व काम करणे व त्याला योग्य दिशा देऊन आपला निर्णय व काम निर्णय नियमित सुरु ठेवून त्यात यश प्राप्त करने हे आपले ध्येयच समजून काम करत राहायचे. अनेक वेळा काही लोकं आपल्याला उपदेश करतात त्यांचे आदर करून ते पाळणे जर ते आपल्या कामाशी निगडित असेल आणि त्यातून सुधारणा होत असतील तर ते चांगलेच आहे. जर आपले कार्य मग ते कोणतेही असोत ते जर प्रामाणिक असेल तर त्यास दाद देणारे, त्यातून शिकणारे अनेक आपल्याला Follow करतात आणि आपले Content चे रसिक सुद्धा बनतात.
सर्वात महत्त्वाचे आहे ते आपले Content! कारण आपले जे कंटेंट आहे म्हणजेच आपण जे व्हिडिओज, माहिती देत आहोत ते दर्जेदार किंवा Valuable असावे. आपल्या परीने आपण ते प्रामाणिक आणि Continuety रूटीन ने केले पाहिजे. अशा प्रकारे गोष्टी आत्मसात करून आपण आपले Viewer, Subscriber वाढवू शकतो.
जर, तुमचे व्हिडिओज Viral होत असतील तर नक्कीच तुमचे Subscriber झपाट्याने वाढतील. तेव्हा Videos Viral कसे होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. चला तर मग आता तेच आपण समजून घेऊया.
Videos Viral कसे होतात ?
मित्रांनो व्हिडिओज Viral कसे होतात ह्याचा एक perticular मंत्र तर नाही. कधी कधी कोणताही विषय एकदम viral होत असतो तो नशिबाचा खेळ म्हणतात येईल पण, एक खरा प्रयत्न करणारा माणूस स्वतः आपल्याला Viral करू शकतो. त्याची आवड आणि Consistency त्याला Viral करण्यासाठी रोखू शकत नाही. Viral होणे सोपे आहे पण ते होताना येणारी पुढील स्थिती कशी राहील ह्याची मात्र काळजी घेणे तितकेच विचारत घ्यावे लागते.
जसे, एखादा चर्चेतील प्रश्न अथवा व्यक्ती ह्यावर आपण कोणत्या angle ने आणि किती प्रभावी पद्धतीने प्रतिक्रिया देतो हे महत्वाचे ठरते. काही जन उगाच मोठ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत काहीही videos बनवतात जेणे करून लोकांचा लक्ष वेधून घेता येईल. कधी कधी ट्रेंड चालतो जर आपणही त्या ट्रेंड च्या प्रवाहात आपला कंटेंट दिला तर viral होता येते आणि ही stratagy अनेक creators वापरतात. ह्याला आपण "बहती गंगा मे हाथ धो लेना " असे म्हणू शकतो.
Topic जरी trending वर असला पण आपला कंटेंट कॉपी नको, तर तो आपल्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे आणि Quality पाहिजे. सुरुवातीला ज्यांना दिसेल त्यांनी एकदा सुरुवात केली तर पूर्ण बघितलाच पाहिजे. ह्याने काय होईल ? सुरुवातीला जे कोणी पाहतील ते पूर्ण पाहतील म्हणजेच YouTube चे जे Algorithm असते की हा व्हिडिओ अथवा Content पूर्ण पाहिलं जातोय म्हणजे नक्कीच दर्जेदार असणार. तो पुढे अनेक लोकांना दाखविला जाईल आणि अशाप्रकारे तुमचा कंटेंट Viral होईल अर्थातच तुम्ही Viral व्हाल.
आता Viral झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला तुमचे Content Consistency ने देत राहायचे बस्स.
पुढे जाऊन आपण पाहुया की, YouTube Channel च्या कोणकोणत्या Settings असतात? Google AdSense काय आहे? Thambnail, Title, Tag, Discription विषयी Complete माहिती पुढील लेखात पाहू.
माहिती उपयोगी वाटल्यासआपल्या Blog ला Follow नक्की करा.




0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box