Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

' तुझे रूप गोजिरे ' HK Production You Tube च्या गाण्याने गाठला 1M चा टप्पा ; Tuze Rup Gojire Crossed 1M views on You Tube

' तुझे रूप गोजिरे ' ह्या  HK Production You Tube च्या गाण्याने गाठला 1M चा टप्पा 

डचिरोली जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात झाडीपट्टी रंगभूमी म्हणून म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षातील हिवाळा ऋतू मध्ये नाटकांचे आयोजन प्रत्येक गावागावात केले जाते. त्यामुळे नाटक या संबोधांशी परिचित नसणारा व्यक्ती गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात सापडणे कठीणच त्यामुळे नाटकांशी असलेले प्रेम हे  सध्या YouTube वर गाजत असलेल्या Tuze Rup Gojire च्या लोकप्रियतेतून आपणांस दिसून येत आहे.

HK Production YouTube च्या 'Tuze Rup Gojire' गाण्याला अल्पावधीतच 1M Views 

Hk Production YouTube Channel हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वत्र गाजलेला YouTube Channel. सध्या या You Tube चॅनल ची ख्याती संपुर्ण महाराष्ट्रात होते आहे. नुकताच Hk Production या यु ट्युब चॅनेल वर Upload असलेले ' Tuze Rup Gojire ' ह्या गाण्याने 1M Views चा आकडा पार केलेला आहे.

Tuze Rup Gojire Song विषयी

HK Production YouTube Channel आणि त्यांच्या Team ने मेहनत करून बनविलेला अतिशय सुंदर असा गीत आहे. तो आपल्याला या YouTube Channel वर पाहता येईल. या गाण्याचे गायक निकेश खोबरे हे आहेत. Nikesh Khobare हे गडचिरोली जिल्ह्यातील नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले ' झाडीपट्टी रंगभूमी ' या क्षेत्रातील गाजलेले गायक आहेत त्यांनी शेकडो गाणे गायलेले आहेत आणि पूर्व विदर्भात असलेल्या प्रत्येक नाट्य रसिक त्यांच्या गाण्याला पसंती करतो. 

' तुझे रूप गोजिरे ' हे गाणे nikesh khobare यांनी अतिशय सुंदर अश्या आवाजात गायलेले आहे आणि युवकांना अक्षरशः या गाण्याची भुरळ पडली आहे. ' विजय गेडाम ' यांचे जबरदस्त लेखन शैलीतून आणि नीकेश खोबरे यांच्या मधुर आवाजातून नटलेले हे सुंदर गीत आपण एकदा ऐकावेच आणि म्हणूनच अल्पावधीतच या गाण्याने You Tube वर 1M Views चा कळस गाठलेला आहे. 


हे गाणे जितके मधुर तितकेच या गाण्यासाठी केलेले चित्रीकरण सुध्दा तितकेच आकर्षक आहे. Hk Production चे Founder आणि संचालक ' होमदेव कोसमशिले ' यांनी घेतलेली मेहनत या गाण्याच्या यशामागील एक न दिसणारी चंद्राची बाजू. एकीकडे गाण्याचे सर्व चित्रीकरण, त्या चित्रीकरणासाठी लागणारी सर्व अभिनय कलाकार, कॅमेरामॅन, त्यासाठी लागणारी माणसं आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी निवडलेले ठिकाण हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात अतिशय निसर्गरम्य ठिकाण.


HK Production

Tuze Rup Gojire चे असे झाले चित्रीकरण


कुरखेडा तालुक्यातील ' अरततोंडी ' या ठिकाणी ' तुझे रूप गोजिरे ' या व्हिडिओ गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. २६ ऑक्टोंबर २०२१ ला या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. सूर्य उगविण्या आधी Homdev Kosamshile आणि त्यांची टीम यांनी Arattondi हा स्थळ गाठला. 

दरम्यान नकळत येणाऱ्या अडचणी काहींना वेळेवर गाडी न मिळताही कसेबसे Destination ला वेळेवर पोहचण्याची पूर्णपणे खात्री घेतली. एकाच दिवसात संपूर्ण चित्रीकरण करण्याची आणि दुपारची उन दरम्यान अरत्ततोंडी डोंगर चढून त्यावर चित्रीकरण हे सर्व आव्हान स्वीकारत Hk Production नी हे भव्यदिव्य करून दाखविले याचे कौतुक तर होणारच. 


Tuze Rup Gojire Zadipatti Songs 2022

Tuze Rup Gojire च्या यशातील सहकारी

झाडीपट्टी रंगभूमी मधील नाटकांत अभिनय करणारी ' रुपाली राऊत ' ही ह्या गाण्यातील मुख्य अभिनेत्री म्हणून आपला अभिनय योग्य पद्धतीने केलेला आहे. सोबतच त्यांच्या सह महिला कलावंत म्हणून ' करिश्मा टेंभुर्णे ' यांनी आपली भूमिका बजावली.

यात मुख्य अभिनेते जे या गाण्याचे गायक आहेत निकेष खोबरे यांनी सुंदर अभिनयाची छाप पाडली आहे. त्यासोबतच सहकलाकार साई गेडाम आणि साहिल जुंजळकर यांनी आपली भूमिका योग्य रित्या पार पाडली. या गाण्यात अनेक प्रसिद्ध Youtubers ना आमंत्रित केले होते त्यामधे ' Vines Of Ganya ' या गडचिरोली जिल्ह्यातील गाजलेल्या You Tube चॅनल चे कलाकार ' Goutam Barsagade ' आणि ' Vines Of Ganya ' या यू tube चॅनल चे Editor, Writer आणि वेळेप्रसंगी अभिनय करणारे ' Ganesh Kolhe ' यांनी आपल्या अनुभव आणि सहकार्यातून व मार्गदर्शनातून या गाण्यास वजनदार बनविण्यास महत्वपूर्ण योगदान दिले. 

या गाण्याचे चित्रीकरण टीपण्याचे कार्य dhamdeep lade, Sonu Sahu आणि Pawan Naitam यांनी सांभाळले. ' Ganesh Jarate व अन्य इतर मंडळी यांनी सुध्दा आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 



सध्या हे गाणे YouTube शिवाय Gana.Com, Saavn, wynk, resso, Amazon Music या ठिकाणी आपल्याला Audio स्वरूपात ऐकायला मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या