Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

TET/CTET, TAIT पास पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू, काय आहे मागणी? गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन

TET/CTET, TAIT पास पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचा आंदोलन सुरू, काय आहे मागणी? गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन 



रविवार पासूनच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयासमोर गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रांतील शाळांत कार्यरत कंत्राटी शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ह्यात २५० कार्यरत कंत्राटी शिक्षक आंदोलन स्थळी येवून आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. कंत्राटी शिक्षकांची मागणी मा. आमदार साहेबांनी विशेष लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा व त्यांचा प्रश्न सोडवावा ही मागणी कंत्राटी शिक्षक करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेली पेसा क्षेत्रांतील जिल्हा परिषद शाळेची पदे रिक्त असल्याने शासनाने त्या पदांवर सध्या कार्यरत कंत्राटी शिक्षक भरती केली होती. ही भरती २०२४ मधे झाली आहे तेव्हापासून आजतागायत सेवा ह्या शिक्षकांनी दिली. 


अनेक शाळांत कंत्राटी शिक्षक आपले अध्यापन कार्य सुरळीत करीत आहेत. अनेक शाळा शिक्षकांविना राहिल्या असत्या त्या वेळी कंत्राटी शिक्षकांनी तेथे जाऊन शाळा सुरू राहण्यास खूप मोठा हातभार लावला. अनेक वेळा अनियमित मिळणारे मानधन म्हणजेच तीन चार महिने मानधन न मिळताना न खचता, खंबीर राहून, उपाशी राहून, गोटुल, ग्रामपंचायत, शाळेत, bus stop वर झोपून रात्र काढली. अशा परिस्थितीत शाळा सांभाळली आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान न व्हावे ह्यासाठी शासनाने घेतलेली भरती कशी योग्य आहे आणि कंत्राटी शिक्षक किती योग्य हे दाखवून अविरत सेवा देत आहेत. 



 दरम्यान शिकविण्या व्यतिरिक्त अनेक कंत्राटी मुख्याध्यापकांची भूमिका बजावली, BLO ची कामे, Scaaf, Udise Portal वरील माहिती Updation, Promotion ह्या सारख्या कामात मदत, MDM योजना ची daily reporting. शाळेतील अनेक फाईल्स चे संगोपन व व्यवस्थापन करून ठेवणे, जतन करून ठेवणे, शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारणे ह्या बाबतीत स्थानिक पातळीवर कंत्राटी शिक्षकांप्रती पालकांचा अभिप्राय चांगला नोंदवला जात आहे. ह्या सोबतच अनेक कंत्राटी शिक्षकांनी नवोदय, शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा, अनेक examination साठी पर्यवेक्षक भूमिका पार पाडली.


घरापासून लांब राहून कुठलाही अतिरिक्त भत्ता नाही, जंगलातून जाताना रस्त्यात हिंस्र प्राणी हल्ला अथवा होणाऱ्या अपघातास सामोरे जाण्यासाठी कुठलीही वैद्यकीय रक्षण नाही केवळ चार महिने नंतर मिळणारे मानधन ह्या एवढ्या पुरतीच शिक्षकांनी अविरत सेवा दिली आणि देत आहेत. 


आज परिस्थिती बदलताना दिसत आहे. ज्या ठिकाणी ह्या शिक्षकांनी सेवा देत शाळा सुरू राहण्यास खूप मोठा हातभार लावला, आपला खूप वेळ दिला त्यात काहींना TAIT मधे स्कोर करता आला नाही अशी व्यथा कंत्राटी शिक्षकांनी मांडली. मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या शैक्षणिक नुकसान न होऊ पाहणारे शिक्षक आता आपला किती नुकसान होईल ह्या भीतीने एकवटून लढत आहेत. 



शिक्षकांसाठी लागणारी सर्व आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता जसे, D.t Ed, B.Ed, त्यानंतर TET/CTET व जाहिराती नुसार TAIT 2022 देऊन निवड झालेले कंत्राटी शिक्षक आम्ही पूर्ण पात्र आहोत आणि तीन वर्ष सेवेचा अनुभव सोबतच येथील भौगोलिक व सामाजिक स्थितीचा अनुभव , भाषिक अनुभव प्राप्त करून सक्षम झालो आहोत असे प्रतिपादन कंत्राटी शिक्षकांनी दिले. सोबतच काही शिक्षकांनी आपले नोकरी साठी लागणारे वय ओलांडण्याचा मार्गावर आहेत. अनेक शिक्षक चक्रपाणी न करता ह्या स्वतःला झोकून दिले. काहींनी अनेक वर्षापासूनची कामे सोडून येथे कार्य करीत आहेत. त्यांना आता खूप मोठा प्रश्न उभा राहतो आहे. आता काय होईल ? ज्या परीक्षा पास होवून आम्ही सेवा दिली, त्याच परीक्षा पुन्हा देऊन त्यात मेरिट येणे येवढेच शेवटचे काम काय ? असा प्रश्न त्यांना झाला आहे.


कंत्राटी शिक्षकांनी आपल्या आंदोलनातून मागणी केली आहे की, शासनाने आम्ही दिलेली सेवा आणि केलेले प्रयत्न यांची गांभीर्याने दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून आम्हाला नियमित सेवेत सामावून घ्यावे. ज्या प्रती आम्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही त्याप्रमाणे आमचेही नुकसान होऊ नये एवढी मागणी आम्ही कंत्राटी शिक्षक करत आहेत.


काय आहे कंत्राटी शिक्षकांची मागणी ?





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या