Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Vlog काय आहे ? , Vlogging ने पैसे कसे कमवायचे

Vlog काय आहे ? , Vlogging ने पैसे कसे कमवायचे ?





आज पुन्हा तुमच्यासोबत काहीतरी नवीन महिती वाटणार आहे. जसे की, Vlog म्हणजे काय ? Vlogging ने पैसे कसे कमवू शकतो
काही वर्षापूर्वी जेव्हा JIO नव्हता त्यावेळेस Vlog बद्दल कोणी बोलतांना किंवा त्याबद्दल विचार सुध्दा करत नव्हते. आणि त्याविषयी ऐकूनही घेत नव्हते. पण आता मात्र Vlogging चा युग आलेला आहे आणि तुम्हाला सुध्दा याविषयी जाणून घेणे खूपच आवश्यक आहे.

Vlog kay aahe?


मित्रांनो, Vlog ला Video ब्लॉग सुध्दा म्हणू शकता, आता ब्लॉग म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल. ज्याप्रमाणे ब्लॉग मधे आपण आपल्या मनातील गोष्टी किंवा लेखन लिहितो आणि तर आपल्या वाचकांना उपलब्ध करून देत असतो, त्याचप्रमाणे Vlog हा सुध्दा आपण आपल्या मनातील गोष्टी व्हिडिओ द्वारे दाखवीत असतो.
आपण काही काही व्हिडिओ मधे पाहत असतो की, काही जण खूप फेमस असतात आणि ते आपल्या प्रत्येक गोष्टी त्यात तो कोठे फिरतो, कोणते कपडे घालतो, बोलतो कसा अशा अनेक त्याच्या जीवनातील क्षण तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीत असतो आणि बहुतेक जण ते पाहत असतात आणि अर्थातच आपल्याला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीविषयी आवड आणि जाणून घेण्याची कुतुहलता असते. आणि तो जे काही व्हिडिओज व क्षण शेअर करतो एकंदरित यालाच vlog असे म्हणू शकतो.

Vlogging ne paise kase kamvave ?


मित्रांनो, लोक vlog खूप का बर पाहतात कारण, त्यांना तुमच्याकडून म्हणजेच जो Vlogging करतो त्यांच्याकडून काहीतरी नवीन अनुभवायला मिळते, जसे तो एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी गेला की, तो त्याविषयी माहिती सांगतो, एखादे दुर्गम क्षेत्र असेल, प्रसिद्ध हॉटेल अथवा प्रसिद्ध सण असेल याविषयी लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आजच्या काळात खूपच वाढली आहे. Vlogging करण्यासाठी आधीच खूप प्रसिद्ध असणे हे सुध्दा गरजेचे आहे असा मी म्हणत नाही, तुम्ही एखाद्या खेडेगावात राहत असाल तिथून तुम्ही Vlog बनवू शकता, त्या ठिकाणची माहिती देऊ शकता. तुमची दैनंदिनी, तुमच्या गावातील रीतिरिवाज, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील काही वैशष्ट्यपूर्ण गोष्टी अशा नवनवीन माहितशी निगडित Vlog तुम्ही बनवू शकता. यात अनेक Influencers नी Vlog सुरू केलेले आपण पाहतो आहोत.
एखादा Vlog video टाकणारा एकदा का त्याचे व्हिडिओ चालायला लागले की, त्यांचे Viewer त्यांच्याबद्दल कुतूहलाने पाहतात की, तो काय खातो, त्याचे जीवनमान कसे आहे, आणि त्याचप्रमाणे त्याला follow करणारे viewer तसेच कपडे, त्याने वापरत असलेले Product अशा अनेक प्रकारच्या बाबी आहेत ज्या त्यांच्याकडूनही वापरल्या जातात. 
आता या गोष्टीचा फायदा अनेक ब्रँड  कंपन्या  घेतात त्या अशाच Influencer च्या शोधात असतात. आणि त्यांना ते त्याबदल्यात लाखो रुपये देतात. Vlogger ला तर कोणतेही प्रॉडक्ट तर वापरणे आहेच अशा वेळेस तो ज्या कंपनीशी Collab करतो त्यांचेच प्रॉडक्ट सुद्धा वापरतो. आता तुम्हाला समजलेच असेल की आपण कसे कमवू शकतो सोबत Adsence मधून मिळणारे पैसे असतीलच.

काही जण पैसे आता मिळतातच म्हणून कोणतीही विचारपूस न करता विश्वासार्ह नसलेल्या वस्तू बद्दल सांगून आपल्या Viewer ची फसवणूक करत असतात आणि सोबतच अप्रत्यक्षपणे आपलीच फसवणूक करतात. हे तुम्ही कधीही करू नको कारण जे तुम्ही आज आहात ते त्यांच्यामुळेच त्यामुळे तुमची पण एक जिम्मेदारी आहे की, त्यांना योग्य व विश्वासार्ह असलेल्या गोष्टी आपल्या Vlog द्वारे दाखवावित.

Vlog Camera 


मित्रांनो, तुम्हाला Vlogging करायची असेल तर आधी एक चांगला कॅमेरा असणे आवश्यक आहे, चांगला म्हणजे खूपच महागडा अशातली गोष्ट नाही पण आपण योग्य प्रकारे दिसू या प्रकारे असावा आणि सोबतच एक Mic सुध्दा आवश्यक आहे. Mic साठी मी समोर लिंक देतो आहे, तो Vlogging साठी योग्य राहील. 👉🏻 Boya Mic : For Vlogging

मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि ही माहिती शेअर करा आणि दुसऱ्यांची मदत करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या