गडचिरोली जिल्हा इतिहास व निर्मिती
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जंगलांचा जिल्हा आणि उद्योगीकद्रुष्ट्या मागास म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याविषयीची ऐतिहासिक आणि निर्मिती संबधी माहिती पाहू.
गडचिरोली जिल्हा निर्मित व इतिहास ठळक बाबी
निर्मिती
गडचिरोली जिल्हा निर्मिती आणि ईतिहास व्हिडिओ
प्राचीन काली ह्या प्रदेशावर राष्ट्रकूट यांचे राज्य होते.
त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य ह्या प्रदेशावर होते.
यानंतर गोंड राजांनी या गडचिरोली प्रदेशावर राज्य केले.
खांडक्या बल्लालशाह यांनी १३ व्या शतकात चंद्रपूर ची स्थापना करून आपली राजधानी बनविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश मराठयांच्या सत्तेखाली आला.
१८५३ मध्ये हा प्रदेश ब्रिटिशांच्या ( ईस्ट इंडिया कंपनी ) ताब्यात आला, १८५४ मध्ये ब्रिटिशांनी चंद्रपूर ला बेरार प्रांतातील स्वतंत्र जिल्हा घोषित केला.
ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निमिर्ती केली. त्यावेळी गडचिरोली व सिरोंचा हि दोन तहसिली चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होती.
२६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
जिल्हा स्थापनेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे होते.
जिल्हानिर्मिती होऊन प्रथमतः गडचिरोली, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, धानोरा, अहेरी आणि एटापल्ली हि ८ तालुके निर्माण करण्यात आले.
१५ ऑगस्ट १९९२ रोजी जिल्ह्यात देसाईगंज, भामरागड, कोरची व मुलचेरा हि चार तहसील नव्याने निर्माण करण्यात आली.
ऐतिहासिक
दक्षिण गोंडवाना ची राजधानी चंद्रपृर हि होती.
जिल्ह्यातील लोककथा जैमिनी अश्वमेधाशी मिळत्याजुळत्या आहेत.
कृत युगातील प्रसिद्ध "लोकपूर" शहर चंद्रपुर होय.
त्रेतायुगात चंद्रवंशी पुरुषांची लोकपूर येथे सत्ता होती. त्यांनी लोकपूर चे नाव इंदुपूर अशे ठेवले.
याच काळात वैनगंगेच्या पूर्वेस वैरावन नावाच्या चंद्रवंशीय राजाचे राज्य होते. त्याने वैरागड नावाचे शहर स्थापन केले.
हेमाडपंथानी कलियुगात मार्कंडा येथील देवळाची स्थापना केली.
वैरागड मध्ये माना वंशीयांचे राज्य होते व त्या वंशातील लोकांवर मत करून गोंदवंशीयांनी त्याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
कौल भिल नावाच्या गोंडवंशीयाने इत्रस्थ पसरलेल्या गोंड जमातींना एकत्र आणले.
खनिज मातीतून लोखंड काढण्याची कला कौल भिल याने गोंड लोकांस शिकविली.
भीम बल्लाळसिंग हा प्रथम गोंड राजा होता ( शिरपूर राजधानी )
खांडक्या बल्लालशाह - १० वा गोंड राजा ( चंद्रपूर राजधानी बनविली )
चांदा शहर स्थापना - १४५० ( पुराणवस्तू संशोधनातून )
ई .स. १७५१ मध्ये भोसले यांच्याकडे संपूर्ण चंद्रपूरवर सत्ता होती.
१७१८ च्या सुमारास साताऱ्याच्या अधिपतींनी गोंडवानावर स्वारी करण्यासाठी आपला सरदार कान्होजी आंग्रे यास पाठविले.
रघुजी भोसल्यांनि १७५१ मध्ये संपूर्ण गोंडवाना चा कारभार आपल्या हाती घेतला,
निळकंठशाह हे अंतिम गोंड राजा होत.
गोंड साम्राज्यपतनानंतर गोंडवन हा प्रदेश भोसले यांचे अधिपत्याखाली आला.
१८१८ मध्ये हा प्रदेश इंग्रजांच्या राजवटीखाली आला.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box