You Tube काय आहे ?
फार वर्षांपूर्वी लोक आपल्या समस्या व इतर काही माहिती शोधण्यासाठी गूगल चा वापर करत आले . आणि आजही करत आहेत पण त्यात आजच्या युगात फार मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले दिसते आहे. आपण आपल्याला हवी असलेली माहिती इंटरनेटच्या द्वारे गूगल किंवा त्यासारखे सेवा पुरविणाऱ्या सर्च इंजिन च्या सहाय्याने माहिती शोधत आलेले आहोत. सर्च इंजिन मध्ये सर्च केल्यांनतर शोधलेल्या माहितीशी निगडित अनेक आर्टिकल्स आपलयाला अनेक वेबसाईट वर असलेली माहिती त्या ठिकाणी दाखविली जाते. आणि ती आपण वाचतो किंवा वाचत आलेले आहोत म्हणजेच ती माहिती दृक स्वरूपात उपलब्ध होती पण आता मात्र त्यात एक आमूलाग्र बदल झाला तो म्हणजे आपण ती माहिती दृक्श्राव्य स्वरूपात घेण्यास प्राथमिकता देतो म्हणजेच तासनतास वाचत बसण्यापेक्षा माहिती डोळ्याने पाहून ऐकून समजून घेऊ शकत आहोत. आणि जास्त कल वाचण्यापेक्षा ती माहिती विडिओ च्या स्वरूपात बघणे हे आजच्या घडीला जास्त पसंद केले जात आहे. यू ट्यूब हि एक व्हिडिओ सेवा पुरविणारी त्यातलीच एक वेबसाइट आहे आणि त्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत.
You Tube हि एक विडिओ सेवा पुरविणारी व आपणास आपले विडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करता येईल आपल्याकडील व्हिडिओस जगासमोर आणता येईल यासाठी असलेले एक माध्यम आहे. आपल्याकडील चित्रफिती आपण इतरांना दाखविता व दुसऱ्यांचे विडिओ आपणास पाहता येणे आता शक्य झालेले आहे.ते You Tube मुळे. ज्या द्वारे आपण आपली माहिती व ज्ञान वाढवीत तसेच समस्या सोडवीत आहोत त्या You Yube ची निर्मिती कशी झाली व कोणी केली असावी या बद्दल चला आपण माहिती पाहू.
You Tube च्या निर्मितीविषयी
गरज हि शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे You Tube ची निर्मिती झाली. Steve Chen, Chad Hurley आणि Jawad Karim हे You Yube चे Founder आहेत. You Tube च्या निर्मितीविषयी Jawed Karim सांगतात कि, You Tube च्या निर्मितीची प्रेरणा आधी एका वादग्रस्त विडिओ च्या शोधातून झाली. तो विडिओ म्हणजे Janet Jackson या गायिकेचा तो विडिओ होता. २००४ या वर्षीची ती घटना आहे ज्या कार्यक्रमप्रसंगी चा त्या विडिओ ची त्या काळात खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती आणि तो विडिओ TV वर सुद्धा दाखविण्यात बंदी आली होती. तो विडिओ जावेद करीम यांना वेळेप्रसंगी पाहता येईना आणि २००४ मध्ये भारतीय महासागरातील आलेले त्सुनामी. त्यांना हे प्रसंगाचे विडिओ शोधण्यास फार अडचणी आल्या यातूनच विडिओ शेअरिंग साईट ची कल्पना सुचली. स्टिव्ह चेन आणि chad hurley म्हणतात कि, You Tube ची खरी कल्पना हि Online Dating Service ची आणि Hot or Not या वेबसाईट च्या कल्पनेतून आहे.
You Tube विषयी थोडक्यात
You Tube हा एक अमेरिकन Online Video Sharing प्लॅटफार्म आहे. याचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथील सॅन बर्नो येथे आहे. Steve Chen, Chad हर्ले आणि Jawed Karim यांनी फेब्रुवारी २००५ मधे या प्लॅटफार्म चा शोध लावला तर सध्या Google नोव्हेंबर २००६ मध्ये १.६५ बिलियन अमेरिकन डॉलर ला आपला भाग म्हणून आजतायागत जोडले गेलेले आहे आणि Google Search नंतर You Tube हे लोकांच्या पसंतीचे Website आहे.
मे २०१९ नुसार You Tube मधे प्रत्येक मिनिटाला ५०० तासाचा विडिओ उपलोड होतो आणि एक बिलियन एवढे तासाचे विडिओ एका मिनिटाला पहिले जाते.
You Tube चा उपयोग आपण कसा करू शकतो ?
मित्रांनो You Tube या व्हिडीओ शेअरिंग Website च्या माध्यमातुन सगळ्यांना आपल्याकडील विडिओ जगासमोर आणण्याचे एक नवे दालन खुले झाले आहे. आपण या वेबसाईट च्या माध्यमातून जगातील कोणत्याही tv चे shows बघू शकतो, ज्याप्रमाणे google च्या माध्यमातून अनेक वेबसाईट चालकांनी आपल्याला अनेक प्रकारची हवी असलेली माहिती उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे You Tube मध्ये सुद्धा अश्याच वापरकर्त्यानी अनेक प्रकारचे विडिओ त्याठिकाणी समाविष्ट करून आपनास हवी असलेले विडिओ उपलब्ध करून देत आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे google वर अनेक प्रकारची माहिती समाविष्ठ करणारे वापरकर्ते आहेत त्यांना त्याबदल्यात आनंद व आपली ओळख व ख्याती जगासमोर आणता येत आहे. आपल्या अंगी असलेली कला आणि कौशल्ये यास वाव मिळण्यास मदत होत आहे यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे You Tube या website च्या माध्यमातून अनेक मंडळीं आपला उदरनिर्वाह व स्वप्ने साकार करत आहेत.
मित्रांनो अशाप्रकारे आपण You Tube ची थोडक्यात माहिती आपण पाहिली पुढच्या लेखात आपण You Tube वर आपण कशा प्रकारे आपले एक चॅनल बनवून त्यात व्हिडीओस उपलोड करून आपली कला जगासमोर आणू शकतो त्यासाठी काय काय करावे लागते आणि त्यातून आपल्याला कशाप्रकारे व काय काय मिळते या विषयी सविस्तर माहिती पाहू.
धन्यवाद !
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box