संगणक क्षेत्रात नेहमीच अमेरिका आणि चीन यांचे वर्चस्व राहिले आहे. हि अमेरिका आणि चीनची गेल्या दशकभरात निर्माण झालेली मक्तेदारी मोडून काढत जपानने अकरा वर्षानंतर अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
जपानच्या 'फुगाकु ' संगणकाने अमेरिकेच्या आयबीएम संगणकरवर मात करून जगातील सर्वात वेगवान संगणक म्हणून मान मिळविला आहे. 'फुगाकु ' संगणक अमेरिकेच्या आयबीएम कंपनीच्या समिट संगणकापेक्षा २.८ पट अधिक वेगवान असल्याचे सिद्ध झाले आहे. जपानमधील तंत्रज्ञान कंपनी फुजित्सु आणि रिकेन इन्स्टिटयूट यांनी संयुक्तपणे हा संगणक विकसित केला आहे. त्यासाठी सहा वर्ष इतका कालावधी लागला. जपानमधील प्रसिद्ध ' माउंट फुजी ' ला फुगाकु या नावानेही ओळखले जाते. तेच नाव संगणकाला देण्यात आलेले आहे. सर्वसाधारण संगणकापेक्षा एक हजार पट वेगवान असलेल्या संगणकाला महासंगणक म्हणतात. हा संगणक कोरोना बद्दलच्या रिसर्च साठी वापरला जाणार आहे. संगणकाचा वेग हा तो संगणक एका सेकंदात किती प्रक्रिया करू शकते यावरून मोजले जाते.
You Tube काय आहे ? ↴
माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हा वेग पेटोफ्लॉप्स या एककात मोजतात.पेटाफ्लॉप्स म्हणजे एक या अंकापुढे १६ शून्य. फुगाकु ने ४१५.५३ पेटाफ्लॉप्स इतक्या वेगाची नोंद केली आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box