You Tube व्हिडीओ अपलोड करायचे पैसे का देतो ?
You Tube विषयी
You Tube हा एक सार्वजनिक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे ती एक google ची एक वेब सेवा आहे. या website मधे कोणीही आपल्याकडील विडिओ अपलोड करून आपल्याकडील माहिती जगासमोर आणू शकतो या विषयी तर तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेलच. पण आपण आज माहिती पाहतो आहोत की You Tube आपल्याला आपण जे विडिओ YouTube या Website वर विडिओ टाकतो त्या व्हिडिओस चे पैसे देत असतो ते का देतो याविषयीची चर्चा करणार आहोत.
व्हिडिओस च्या बदल्यात मिळणारे पैसे कशासाठी?
You Tube हि Google या कंपनीची वेेब साईट आहे. ज्यामध्ये सर्व जनतेसाठी आपल्याकडील विडिओ जगासमोर share करता यावे म्हणून एक दालन उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वात आधी youtube हा google चा भाग नव्हता पण काही कालावधीनंतर google ने you tube ला आपल्या कंपनीचा एक भाग म्हणून समाविष्ट केला आहे. अर्थातच google ला आपल्या कंपनीच्या अनेक प्रकारच्या हेतू यातून साध्य होने अपेक्षित आहे. जसे आर्थिक बाबीतही वाढ व्हावी हा एक त्यातला हेतू. जगात आजच्या घडीला अनेक कंपन्या बाजारात आल्या आणि यांचा आवाका इतका अफाट वाढला कि कोण्यात्याही देशातील वस्तू आज आपण खरेदी करू शकतो आणि विक्री करू शकतो. आणि याला एक कारण म्हनजे आजचे वाढलेले जागतिकीकरण.
अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या YouTube चॅनेल ला भेट द्या खालील लिंक वर
Gadchirolikar YouTube Channel
आता या जागतिकिरण झालेल्या जगात टिकण्यासाठी प्रत्येक कंपनीला अशा काही योजना आखाव्या लागत आहेत की ते या स्पर्धेत टिकाव धरू शकले पाहिजे आणि आपला व्यापार म्हणा कि, उद्योग वा आपली उत्पादित वस्तू विकण्याकरीता अनेक योजना आखतांना त्यात मुख्य व अग्रेसर असलेले पाऊल म्हनजे जाहिरात! आता सर्व कंपन्या जाहिराती करतात आणि ते करणे अत्यावश्यक आहे. मग या जाहिराती कोठे करायच्या तर यासाठी असलेले माध्यम म्हणजे पूर्वी रेडिओ हा माध्यम होता. कालांतराने दूरदर्शनचा शोध लागला व कंपन्या आपल्या जाहिराती दूरदर्शन वर करू लागल्या. आणि प्रत्येक घराघरात व व्यक्तीपर्यंत पोहचण्यास हा उपाय सोईस्कर ठरत गेला. आणि आजच्या घडीला यातही आमूलाग्र बदल झाला आणि इंटरनेटच्या युगात YouTube सारख्या सेवांनीं जाहिरातिचे नवे व जलद तसेच प्रभावी दालन उपलबद्ध झाले. कंपन्या आपल्या जाहिराती देण्याकरिता आता google च्या You Tube ला प्रभावी पर्याय म्हणून पाहू लागले कारण You Tube द्वारे प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्ती पर्यंन्त पोहचणे व आपली सेवा विषयी व वास्तूविषयी माहिती देणे सोईस्कर आणि अत्यावश्यक वाटू लागले मग आता जेव्हा कंपन्या आपला प्रचार अथवा जाहिरात You Tube करतील तेव्हा Google द्वारे हि सेवा देण्याच्या बदल्यात ह्या कंपन्यांकडून काही आर्थिक मोबदला घेतील हि बाब तर प्रत्येकालाच समजली असेल.
जेव्हा जेव्हा एखादी कंपनी आपला प्रचार करण्यासाठी आपल्या जाहिरात You Tube वर देत असतो तेव्हा Google कडून त्या कंपनीचे जाहिराती चॅनेल वर दाखविल्या जातात आणि या बदल्यात जी कंपन्यांकडून आकारणी केली जाते त्यापैकी काही हिस्सा google कडून You Tube चॅनेल मालकास देत असतो. मित्रानो अशा प्रकारे ज्याने एखादा चॅनेल बनवून त्यात विडिओ अपलोड केले आहेत आणि You Tube कडून जी काही पात्रता ठरविली आहे ती पूर्ण करत असेल त्यास त्या विडिओ च्या माध्यमातून पैसे कमविण्याची संधी प्राप्त होते.
मित्रानो अशा आहे हि माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला पण योय You Tube सेवेचा उपयोग याविषयीची माहिती मिळवावी असे वाटत असेल तर या विषयावर एक विस्तृत माहितीचा लेख लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईन.
धन्यवाद!
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box