Mutnur ( मुतनुर - तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली )
गडचिरोली जिल्हा वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आणि संस्कृतींनी नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सौन्दर्यात आणखी भर घातली आहे ती चामोर्शी तालुक्यातील मुतनूर गावातील पहाडीने...!!
चामोर्शी या तालुक्यातील हे ठिकाण तालुक्याच्या पूर्वेस 20 किमी अंतरावर हे ठिकाण आहे आणि गडचिरोली मुख्यालयापासून दक्षिणेकडे 50 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण जिल्ह्यातील पूर्वेकडील उंच व टेकड्यांच्या प्रदेशात येणाऱ्या भागात आहे. पूर्वी फारशी ओळख नसलेल्या ह्या ठिकाणची महती व महानता आज संपुर्ण महाराष्ट्रात व देशात पोहचते आहे, सोबतच विदेशी नागरिकांनी सुद्धा ह्या ठिकाणास भेट दिल्याचे स्थानिकांकडून गौरवोद्गार ऐकण्यास मिळाले..!
अगदी निसर्गाच्या सानिध्यात जाता जाता निसर्गातुन मान उचलून आपल्याला न्याहाळण्यासाठी येणाऱ्या लोकांकडे पाहतो आहे हा प्रसंग मुतनूर पहाडीच्या जेव्हा आपण जवळजवळ जातो त्यावेळेस वाटत असते. मुतनूर या गावाच्या पायथ्याशी एक पहाडी आहे, जेथे एका पहाडीवरून दुसऱ्या पहाडीवर चालत जावे लागते अशा प्रकारचा हा हिल स्टेशन आहे.
सुरुवातीस 100 पायऱ्या चढल्या की दुर्गा माता मंदिर, त्यानंतर च्या 100 पायऱ्या चढल्या की भगवान शंकराचे मंदिर व मूर्ती आणि त्यांनतर मग फक्त दगडी पहाड आणि त्या पहाडावर चढण्यास एक बाजूस पायवाट...जिथून चढताना थरारक व हर्ष क्षण अकल्पनियच!!
हा दगडी मार्गातील प्रवास पूर्ण करत पहाडीच्या शीर्षभागावर जेव्हा आपण पोहचतो तेव्हा तो डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा पाहताच माणूस गदगद होऊन जातो..! पाहडीच्या शीर्ष स्थानी शिव - पार्वती मंदिर आहे.
पाहाडीच्या एका बाजूस छोटीसी पायवाट व दुसऱ्या बाजूस एकदम 90 अंशाच्या अँगल नि सपाट खोल दरी आहे आणि पाहाडीच्या वरून आजूबाजूला पाहिल्यास अनेक लहान मोठे डोंगर दिसतात. चामोर्शी तालुक्याचे दर्शन या टेकडीवरून घेता येईल इतकी उंच आणि ढगात लपलेले डोंगर असा एकंदरीत शीर्ष भागाचा व्यू.
मुतनूर आणि जवळच्या पुसेर या भागातील पाहाडीच्या परिसरात खूप विपुल प्रमाणात आणि उच्च दर्जाचे लोहसाठे आहेत असे सांगले जाते. मुतनूर या ठिकाणी गुडीपाडव्याला 3 दिवसाची खूप मोठी जत्रा भरते. त्या दिवसांत जेवण व इतर कार्यक्रम यांची रेलचेल असते, इतर दिवसात शनिवारी व रविवारी या दिवशी या स्थळास भेटी देणाऱ्यांची गर्दी असते.
एकंदरीत हृदयाच्या कप्प्यात आनंदाची हुडहुडी भरणारा हा मुतनूर भेटीचा प्रसंग जीवनात एकदातरी अनुभवा..
ही माझी म्हणजे एका गडचिरोलीकरांची सदिच्छा.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box