आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात '' कमलापुर " हा हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी असलेल्या हत्तींची देखरेख व सोय वनविभागामार्फत केली जाते. त्याठिकाणी ७ हत्ती होते नुकताच एका पिल्लाचा आगमन झालं असे एकूण ८ हत्ती त्याठिकाणी आहेत.
अनेक वर्षापासून या ठिकाणी हत्ती आहेत तसेच हा एक गडचिरोली जिल्ह्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व पर्यटकांच्या आवडीचा ठिकाण असून त्या हत्तींद्वारे वनविभागास अनेक प्रकारे मदत होत असते. त्यामुळे गडचिरोली जिल्हा, तसेच बाहेर जिल्ह्यातील हत्ती प्रेमी व पर्यटक आणि कमलापुर येथील लोकांचे " कमलापुर हत्ती कॅम्प " शी स्नेह पूर्वीपासूनच आहे.
नुकताच याच कमलापुर हत्ती कॅम्प मधील हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आहे तर्फे बनविले जात असलेल्या खाजगी प्राणी संग्रहालयात नेणार असल्याची माहिती जनमानसात पसरली आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्राणी प्रेमी, स्थानिक नागरिक व पर्यटकांनी संताप व नाराज व्यक्त केला. अनेक सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांनी ही नाराजी व संताप व्यक्त केला. परंतू, गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या ' कमलापुर हत्ती कॅम्प' मधील हत्ती बाहेर न नेण्यात यावे ही जनभावना लक्ष्यात घेऊन यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व त्याच ठिकाणी भव्य एलिफंट पार्क तयार करण्याची मागणी करणारे पत्र विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असल्याची माहिती प्राप्त झाली. यामुळे स्थानिक नागरिकांतील हत्ती बाहेर न नेऊ देण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box