मित्रांनो, नमस्कार!
आज आपण पाहतो आहोत की, समाज माध्यमातुन अनेक व्यक्ती, ज्यात युवक व युवती वेगवेगळ्या प्रकारे काही का काही ऑनलाईन कामे करून पैसे कमावत आहेत.
ज्यात अनेक सामाजिक माध्यम आलेत. जसे, facebook असो Instagram असो किंवा Amazon Affiliate Marketing असो असे अनेक माध्यम आहेत ज्यात युवक थोड्याफार SKILL आणि थोड्या वेळच काम करून पैसे कमावत आहेत. तसे तर आपण दिवसातून तीन, चार असेच या सारख्या SOCIAL MEDIA वर मित्रांशी बोलण्यात, मनोरंजन करण्यात किंवा इतर कारणांनी वेळ घालवतो. समजा जर याच काळात आपण टाईमपास करता करता जर पैसे कमवू शकलो तर किती छान होईल? याच उद्देशाने मी आज तुम्हाला माझ्याकडील काही माहिती सांगणार आहे. सोबतच असे अनेक प्रकरचे माध्यम आहेत ज्यातून आपण टाईमपास करत पैसे कमवू शकतो असे उपाय पाहू आजपासून त्यांची एक वेगळी मालिकाच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तेव्हा पुढे अशी माहिती येतच राहील त्यासाठी या साईट ला FOLLOW करुन घ्या.
आपल्यापैकी बरेच जण YouTube वर व्हिडिओ पाहत असतीलच. तर त्या ठिकाणी इतके मोठे व्हिडिओ कसे उपलब्ध असतात? हा विचार तुम्हाला पडलाच असेल. तर ते असे आहे की, Google चा एक भाग असलेला YouTube हा व्हिडिओ Sharing चा माध्यम आहे ज्यामध्ये अनेक जण आपला खाता बनवून ( YouTube Channel ) त्यामध्ये व्हिडिओ Upload करून त्याद्वारे आपल्या छंद जोपासण्यासह प्रसिध्दी आणि सोबत काही पैसे पण कमवतात.
तुम्ही जर YouTube वर व्हिडिओ बनवू पाहत असाल तर तुम्हाला मी खालील काही Application ची थोडक्यात माहिती दिली आहे ती वापरणे आवश्यक व ती वापरणे योग्य ठरते. सोबतच त्या त्या Application ची Link सुद्धा समोरच दिलेले आहेत किंवा ते तुम्ही Google Play Store मधून सुध्दा Download करू शकता.
१) Pixellab :- मित्रांनो आपण YouTube वर व्हिडिओ पाहतो किंवा Upload करतो त्यावेळेस सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे Thumbnail ( YouTube च्या Home Page किंवा आपल्याला Screen वर दिसणारा फोटो ) हा आपण Pixellab या Application च्या मदतीने अगदी सुंदर, सहज व योग्य प्रकारे करू शकतो.
यात आपण आकार, रंग अशा प्रकारच्या बाबी ज्या Thumbnail साठी आवश्यक असतात त्या संपूर्ण बाबी या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे हा Application असावाच.
२) YT Studio :- YouTube Channel सुरू केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ Upload करण्यासाठी, आपल्या व्हिडिओ ला Thumbnail लावण्यासाठी, व्हिडिओ ची Settings त्याचप्रमाणे आपल्या Channel वर येणारे Views व आपल्या चॅनेल ची एकंदरीत आढावा घेण्याकरिता हा Application असणे आवश्यक आहे.
यात तुम्हाला तुमच्या चॅनेल च्या Account ने Log in करावे लागते त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनेल ची योग्य प्रकारे देखरेख व कामकाज या YT Studio Application च्या साहाय्याने करू शकता.
३) TubeBuddy :- YouTube चॅनेल सुरू केलेले आहे पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला काही वेळा सुचत नाही जसे कोणत्या व्हिडिओ ला कोणते नाव द्यावे किंवा त्यास शीर्षक काय द्यावे ? आणि त्या व्हिडिओला Tags कशा प्रकारे द्यावेत ? या बद्दल आपल्याला TubeBuddy या Application ची नक्कीच मदत होईल.
सोबतच या द्वारे आपल्याला आपल्या चॅनेल ची प्रगती आणि येत असलेल्या Views व Subscriber यांची वेळोवेळी अद्ययावत माहिती प्राप्त होत असते.
४) Kinemaster :- आपण व्हिडिओ तर Upload करतो किंवा ते विचार केलेच तर आपल्याला ते आधी योग्यप्रकरे बनविणे आवश्यक असते.
म्हणजेच, तुम्ही जर एखादा विनोदी व्हिडिओ बनवत असाल तर, त्यात विनोदी Effects देणे, भयपट बनवत असाल तर त्यात भितिदर्शक वाटायला हवी अशी काही कलाकृती किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या व्हिडिओ ला सजवून त्यात हव्या त्या ठिकाणी व्हिडिओ ला कापून व अनेक व्हिडिओ एकत्र जोडून फिल्म बनवायची वा एखादा प्रोजेक्ट बनवायचा असल्यास आपल्याला व्हिडिओ एडिटिंग Application ची आवश्यकता असते. त्यासाठीच हा एक बेस्ट Application आहे. आणि बहुतेक जण हा Application वापरत आहेत. आणि Play Store मधून तो आपल्याला अगदी मोफत उपलब्ध सुध्दा आहे, त्याचप्रमाणे काही प्रमाणात आपण फी भरून अधिक चांगल्या सेवेचा लाभ या Application मधून घेऊ शकतो.
५) Open Camera :- व्हिडिओ Upload करण्यासाठी आपल्याला आधी व्हिडिओ शूट करणे असतेच त्यासाठी आपण Open Camera या Application च्या मदतीने योग्य प्रकारे शूट करू शकतो.
कधी कधी आपल्या मोबाईल मधील कॅमेरा काही वेळेस अनेक Settings च्या बाबतीत कमी पडतो. जसे light कमी जास्त करणे, Zoom करणे, थोडाफार रंगात बदल करणे यासारख्या अनेक बाबी आहेत ज्या आपण Open Camera या Application च्या मदतीने करू शकतो सोबतच आहे External Mic सुध्दा आपण लाऊन शूट करू शकतो.
पुढील लेखात आपण YouTube साठी Non- Copyright व्हिडिओ आणि Music व फोटो कुठून व कशा प्रकारे मिळवू शकतो याबद्दल माहती पाहू.
काही सूचना व प्रश्न असल्यास खालील लिंक वरून Instagram ला message करा.
Thank You.
Sai Gedam
©️Gadchirolikar
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box