Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

ई श्रम नोंदणी ; ई श्रम कार्ड कोणी काढावे ? ; ई श्रम कार्ड योजना नोंदणी

आपण पाहतो आहोत की, भारत सरकारच्या वतीने श्रमिक नोंदणी सुरू आहे आणि बहुतेक नागरिक त्यात आपली नोंद सुध्दा केलेली व करीत आहेत. पण बहुतेक जणांना याविषयी अद्याप तरी परिपूर्ण माहिती मिळाली नाही की, यामधे आपण कशा प्रकारे नोंदणी करू शकतो, यातील नोंदणी नंतर काय फायदे आहेत किंवा कोण कोण यात नोंदणी करू शकतात? यावरच आज आपण रीतसर माहिती मिळविण्याचा प्रयत्न करूया. 

खालील प्रमाणे टप्याटप्याने माहितीची नोंद केली आहे. त्यामुळे माहिती समजण्यास सुलभ होईल.👇🏻

➡️ई श्रम पोर्टल काय आहे :- भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालय या खात्याच्या वतीने कामगाराच्या हितासाठी अनेक प्रकरच्या योजना राबविल्या जातात, व त्यांच्या कल्याणासाठी कार्य केले जाते. त्यानुसारच श्रम व रोजगार मंत्रालय मार्फत राष्ट्रीय पातळीवर असंगठीत कामगारांचा एक डेटाबेस तयार करण्याकरिता ई - श्रम पोर्टल विकसित केले आहे. ज्यामध्ये नाव, पत्ता, शिक्षण, कौशल्य, कामाचा अनुभव, बँक डिटेेल, वारसदार माहिती असणार आहे. 

➡️सुरुवात :- कार्ड बनविण्याची प्रत्यक्ष सुरुवात २६ ऑगस्ट २०२१ ला झाली. यासाठी शासन मार्फत व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे, असंघटित क्षेत्रातील कामगार यांसाठी ही योजना राबविल्या जात आहे. त्यामधे सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा समावेश होणार आहे.



➡️ ई श्रम कार्ड कोण बनवू शकतो :- असंघटित कामगार - देशातील कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम साठी नोंदनी करू शकतात. जसे, बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, घर कामगार, फेरीवाले, पेंटर, रोजंदारी कामगार, शेतमजूर अशा प्रकारे कामगार यात नोंदणी करू शकतात.

➡️ नोंदणीसाठी वय :- ई श्रमिक नोंदणी साठी वय हे १६ वर्ष पेक्षा जास्त आणि ५९ वर्षापर्यंत वय असलेले व्यक्ती यामधे पात्र आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या