Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस शिपाई भरती अपडेट, आधी लेखी परीक्षा होणार ?

महाराष्ट्र राज्य गृह विभागा मार्फत ७ हजार २०० पदांची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविणार येत असल्याची माहिती आपणास वर्तमानत्राद्वारे व इतर माध्यमाद्वारे मिळते आहे. सर्वात प्रथम कॅबिनेट च्या निर्णयात होते की, ग्रामीण भागांतील तरुणांना यात संधी मिळावी म्हणून पोलिस भरती प्रक्रिया यामधे शारीरिक चाचणी आधी व नंतर लेखी पेपर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे नियोजित होते, परंतु तो निर्णय अजूनही कागदोपत्री आलेला नसल्याने ही भरती प्रक्रिया आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक चाचणी अशा प्रकारे होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

गत काही वर्षात अनेक कर्मचारी हुतात्मा झाले. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तही झाले आहेत. बहुतेक जिल्ह्यातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय झाला त्यामुळे एकंदरीत पोलीस खात्यातील मनुष्यबळ कमी झाले आहे. तसेच उत्सव, सण,जयंती व आंदोलने यातील बंदोबस्त व्यवस्था व गुन्हे तपास यावर सुद्धा परिणाम होऊन ही मनुष्यबळ उणीव भरून काढण्याची गरज गृह विभागास भासत आहे. म्हणूनच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही मनुष्यबळ भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे सांगितले आहे. 

तत्पूर्वी २०१९ ची पोलिस भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामधील ५ हजार २०० पात्र उमेदवरांपैकी एक हजार उमेदवारांची वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी होऊन सहाशे जणांना प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. ही प्रशिक्षणे एकूण नऊ केंद्रापैकी पाच केंद्रात होत असून चार रिकामी आहेत आणि सुरू असलेले प्रशिक्षणही जून पर्यंत पूर्णत्वास येणार आहेत. करणात्सव नवीन भरती प्रक्रिया राबविण्यास अडचण नसल्याची व भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे, अशी एकंदरीत माहिती समोर येत आहे. 




संकलक 

Sai Gedam

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या