Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लिहिण्याची आवड असेल तर, या सोप्या पद्धतीने कमवू शकता.

लिहिण्याची आवड असेल तर, या सोप्या पद्धतीने कमवू शकता.

मित्रांनो, आपल्या बऱ्याच जणांना लिखाणाची आवड असतेच. आपण आपल्या फावल्या वेळेत काही तरी तासंतास लिहीत बसतो. त्यावेळेस आपल्याला कोणी जर उपदेश दिला की, या इतक्या लिखाण कामाच्या मोबदल्यात आपल्याला काही पैसे सुद्धा कमविता येतील तर आश्चर्य वाटायला नको. पण प्रश्न पडणारच कारण आपण जे लिहितो ते आपल्या कामाचे लिहितो मग त्यासाठी स्वतः कोण आपल्याला पैसे देणार? तर मित्रांनो आपण आपल्या आवडीचे लिखाण जे कोणत्याही विषया संदर्भात असो त्याबदल्यात आपल्याला पैसे कमवू शकतो आणि ते देणारा एक प्लॅटफॉर्म आहे. आश्चर्य वाटले ना! आणि आपल्यापैकी बरेच जण आहेत ज्यांना थोडीफार कल्पना आलीच असेल की, आपण कोणत्या विषयवार माहिती पाहणार आहोत. चला तर मग या विषयसंदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया.




मित्रांनो आपण माहिती पाहतो आहोत तो प्लॅटफॉर्म म्हणजे Blogger. पण नेमका काय आहे ज्याच्या साहाय्याने आपण कमवू शकतो. सर्वात आधी आणि महत्वाचे म्हणजे आपण आपली माहिती ज्या ठिकाणी टंकलिखित स्वरूपात जतन करून ठेवू शकतो. आणि आपली माहिती इतरांपर्यंत पोहचवू शकतो. असा एक माध्यम आहे तो म्हणजे Blogger. याविषयी आपण मुद्देसूद चर्चा करूया.


काय आहे Blogger?

Blogger ही एक Google ची सेवा आहे. इंटरनेट चे वापरकर्ते रोज Google या सर्च इंजिन मधे अनेक प्रकारची माहिती शोधत असतात जसे, एखादी बातमी, योजना, शासकीय कामकाजाची माहिती, शहरांची, स्थळांची माहिती, हवामान, खेळ, मनोरंजाबरोबरच इतर विनोदी व सण व उत्सव यास आपल्या मित्र मंडळीना पाठवण्यास संदेशापर्यंतच्या अनेक प्रकारच्या बाबी तसेच समस्या सोडवित असतात. मग ही इतकी माहिती उपलब्ध कोठून होत असते? तर ही माहिती उपलब्ध होण्यास मदत होते ती Bloggers कडून. इंटरनेट चे वापरकर्ते आपल्या कडील माहिती इतरांशी शेअर करतात. त्यासाठी त्यांना एका मध्यामाची गरज असते तीच मदत त्यांना blogger मार्फत होते. म्हणजेच ते वापरकर्ते आपल्या कडील माहिती लिहितात आणि इतरांशी शेअर करतात. ज्या स्वरूपात ते शेअर करतात त्यास ब्लॉग असे म्हंटले जाते. 

कशासाठी Blog?

मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस आपल्या आवडीचे विषयावर लेखन करत असतो. कोणाला कथा तर कोणाला कविता लिहायची आवड असते. कोणी वेगवेगळ्या विषयावर आपले लेखन करत असतात. आपण वर्तमापत्राद्वारे अनेक प्रकारच्या माहिती वाचत असतो. तुम्ही संपादकीय लेख वाचतच असाल त्यात अनेक लेखन करणारे आपले विचार त्याठिकाणी मांडत असतात. तसेच आपण या ब्लॉग च्या माध्यमातुन आपले लेख, कविता, कथा व इतर लेखन डिजिटल स्वरूपात लिहून प्रकट करू शकतो. आणि Google च्या माध्यमातुन ते आपणास जगभर प्रसिद्ध व प्रकट करता येतात.


पैसे कसे काय मिळतील? Earn From Blogger

आपल्या या पोस्ट लिहिण्यामागे खरा हेतू हाच आहे की, आपण आपल्या लेखनातून पैसे सुध्दा कमवू शकतो. ते कसे पुढे आपण पहणारच आहोत. पण सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लेखनात आवड असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच आपल्याला कोणत्या विषयी लिहायला व आपले लेखन करायला पाहिजे हे आपल्या आवडीनिवडी वर आहे. 

आपल्याला ज्या विषयी आवड असते त्याविषयी आपण जास्त चर्चा करू शकतो किंवा जास्त काळ व जास्त प्रमाणात तसेच प्रभावी लिहू शकतो. हे आधी ठरविल्यानंतर येतो तो विषय की, पैसे कसे कमवायचे. आधी मनात निव्वळ पैसेच मिळवायचे म्हणून मी ब्लॉग वैगेरे लिहिणार हा विचार आधी मनातून काढून टाकला ते योग्य ठरते. सर्वात आधी आपल्याला आवड असणे महत्वाचे आहे. मग जसे जसे आपण या ठिकाणी लिखाण करत जातो आपले विचार म्हणा की लेखन लोकांपर्यंत पोहोचत राहतील आणि त्यांना एकदा का आपल्या पोस्ट आवडत राहिल्या की पुढे ते नक्कीच आपल्या ब्लॉग का भेटी देत राहतील. 

मग अशा प्रकारे आपल्या ब्लॉग साईट वर अनेक मंडळी जुळतील आणि तुमच्या पोस्ट वर भेटी देणारे खूप लोक येतच राहतील आणि त्यांना परत तुम्ही नवनवीन माहिती येथे उपलब्ध करत राहाल. मग यातूनच तुम्हाला पैसे मिळण्यास मार्ग खुले होतील. आता ते नेमके कसे? चला पुढे सविस्तर चर्चा करूया.


Google AdSense ने कमविण्याची संधी.

एकदा का तुमच्या ब्लॉग ला भेटी देणारे लोक वाढले की, तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर जाहिराती दाखवून त्याबदल्यात पैसे कामविता येतात. तुमच्या ब्लॉग वर एका विषयावर आणि योग्य प्रकारे लिहिलेले पोस्ट आणि त्या ब्लॉगची योग्य प्रकारे ठेवण या सर्व छोट्या पण महत्वाच्या बाबी राहिल्या की तुम्ही आपला Google AdSense चा खाता तयार करून  Google चे Adsence Approval घेऊ शकता. आणि तुमच्या ब्लॉग ला जाहिराती प्रसिद्ध होत राहतात. ज्याद्वारे तुमच्या ब्लॉग वर भेटी देणाऱ्या मंडळीमार्फत चांगीलच कमाई होऊ शकते. आता प्रश्न पडला असेल की, हे कसं सुरू करायचे? तर खूप सोपी पद्धत आहे. पुढे आपण पाहणारच आहोत.


असे बनवा ब्लॉग. Create Blog

सर्वात आधी ब्लॉग बनविण्यासाठी तुमचे एक Google Account म्हणजे एक Email असणे गरजेचे आहे. Google द्वारे एक मोफत ब्लॉग साठीची सेवा आहे ती म्हणजे Blogger. यात आपण आपली नोंदणी करून घ्या. 

मी समोर एक लिंक दिली आहे त्यामधून सुध्दा तुम्ही Blogger वर जाऊ शकता. Create Blog या ठिकाणी जाऊन तुम्हाला Create Blog वर क्लिक करून नवीन Blog बनविता येईल.

त्यामधे काही बेसिक गोष्टी भराव्या लागतात जसे कंपनी नाव वैगेरे सर्व भरून तुमचा ब्लॉग तयार होईल.


काय काय लागणार ?

मित्रांनो सर्वात आधी आपल्याला आवड असणे महत्वाचे. मग काही साध्या गोष्टी आहेत. जसे एक मोबाईल पुरेसा आहे. तिथेही तुम्ही लिहू शकता. किंवा कॉम्पुटर असल्यास फारच छान. मी तर ही पोस्ट सुध्दा मोबाइलद्वारे लिहीत आहे. त्यानंतर लागणार इंटरनेट ते तर असतेच. कारण तुम्ही ही पोस्ट वाचत आहात तर इंटरनेट आहेच.

नसेल तर मित्रांकडून काही वेळ WiFi शी जोडून घ्या. आणि पुढे एक आपला Domain Name घेऊ शकता. इतके झाले की, तुम्ही दिवसाचे एक दोन तास फावल्या वेळेत काहीतरी लिहून आपला छंद जोपासू शकता आणि पैसेही कमवू शकता. 

आणखी काही तांत्रिक बाबी आणि माहिती असणे आवश्यक आहे जर तुम्हीही ब्लॉगर बनू इच्छित असाल तर पुढे या विषयी मी माहितीपूर्ण लेख घेऊन येत राहणार आहे. तुम्ही या ब्लॉग शी जुडून राहू शकता.

धन्यवाद.


Sai Gedam ( Gadchirolikar )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या