Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Online Earning, Investment न करता कमवा ; Amazon Associate, Affellliate Marketing

Online Earning, Investment न करता कमवा ; Amazon Associate, Affellliate Marketing

मित्रांनो आपण ऑनलाईन पैसे कमावण्याच्या शोधात आहात तर ही पोस्ट पूर्णपणे वाचा यामध्ये एक अत्यंत सोपा व कोणतेही पूर्ण वेळ काम न करता तुम्ही कमवू शकता.


Amazon.in

बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन खरेदी करतो. त्यात अनेक वस्तू आल्या. सकाळच्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तूपासून तर कपडे, घड्या, चपला, चस्मे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती सामान, मोबाईल, पुस्तके इत्यादी अनेक गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करतो. कधी कधी त्यात आपल्याला कॅशबॅक किंवा ऑफर म्हणा मिळते तर आपण खूप आनंदी होतो. पण हे सर्व प्रत्येकच वेळी मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या मित्रांना काही ऑफर देऊन त्याद्वारे एक चांगली कमिशन मिळवू शकता ते कसे पुढे आपण पाहू. Affiliate Marketing बद्दल आपण कधी ऐकलेच असेल त्याबद्दलच आज या पोस्ट मधे माहिती पाहणार आहोत. 

Affiliate Marketing अनेक प्रकारच्या आहेत जसे, आपण एखादी वस्तू किंवा सेवा वापरतो आणि तीच वस्तू आपण दुसऱ्यांना घेण्यास रेफर करतो किंवा सांगतो त्याबदल्यात आपल्याला काही कमिशन मिळते. एकंदरीत यालाच Affiliate Marketing म्हणता येईल. अशा Affiliate Marketing शी संबंधित अनेक कंपन्या आहेत. पण मी तुम्हाला सांगणार आहे Amazon Affiliate Marketing बद्दल. यालाच Amazon Associate Program किंवा Amazon Affiliate Marketing असेही म्हणतात.

Affiliate Marketing करण्यास काही वेळेस आपल्याला काही ना काही गुंतवणूक करावी लागते. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Amazon Associate Program मधे आपल्याला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही. एक छोटीशी गुंतवणूक करावी लागते ती म्हणजे तुमचा वेळ आणि एक मोबाईल जो तुमच्याजवळ असेलच कारण ही पोस्ट तुम्ही वाचत आहात ते त्याच्याच साहाय्याने. आणि मी सुद्धा मोाइलद्वारेच अमेझॉन affiliate Marketing करतो आहे. 

➡️ कसे सुरू करावे Amazon Affiliate Program?

सर्वात प्रथम अमेझॉन वर अकाऊट उघडा. Google वर Amazon.in Search करून सर्वात तळाशी जाऊन Become an Affiliate या पर्यायावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर काही वयक्तीक माहिती जसे, नाव, पत्ता, Pan क्रमांक, बँक डिटेल भरावे लागेल त्यानंतर आपण या Affiliate Program मधे सामील होऊ शकतो.

Amazon.in

खालील दिलेल्या लिंक वरूनही तुम्हाला Sign up करून नवीन खाते उघडता यईल.

Sign up for Amazon Associate


➡️ Amazon Associate साठी पात्रता काय ? 

या Affiliate Program साठी छोटीशी पात्रता आहे जी आपणास पूर्ण करणे आवश्यक आहे. आपला Amzon Associate Verified होऊन कमिशन मिळविण्यासाठी ६ महिन्यात कमीत कमी कोणत्याही ३ विक्री करणे आवश्यक आहे. ही पात्रता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Email द्वारे Amzon Affiliate Program Enable झाल्यासंबंधी सूचना केली जाईल.

➡️ कधी व किती मिळणार कमिशन ?

एकदा आपला अमेझॉन Affiliate खाते तयार झाले की, तेव्हापासूनच आपल्याला प्रत्येक विक्रीवर कमिशन मिळणे सुरू होते. या मार्फत आपण किती कमवू शकतो यावर आपण विचार करणे गरजेचे नाही कारण तुम्ही कल्पनाशक्तीच्या पलीकडे कमवू शकता. फक्त तुम्हाला विक्रीची योग्य व प्रभावी अंमलबजावणी करता आली पाहिजे. तुम्ही स्वतः अनेक वस्तू या साईटस मधून बोलवता त्यावर सुद्धा कमवू शकता. तुमच्या गावातील, मित्र मंडळीना सुद्धा वस्तू बोलवून देण्यास किंवा आपली स्वतःची एक सेलेक्टेड स्टोर बनवून त्यात या वस्तूवर ऑफर देऊ शकता अशा अनेक आयडिया आहेत, त्याविषयी आपण समोर पाहनारच आहोत. त्यानंतर आपण आपल्या खात्यावरील आलेली कमिशन log in करून चेक करू शकतो. त्यासाठी Amazon Associate वर Log In करा आणि Earning या पर्यायावर क्लिक करा.


Amazon Associate Earning Report




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या