Thumbnail कसा बनवायचा ? Thumbnail म्हणजे काय ? YouTube Marathi माहिती | YouTube Tips Marathi
आपल्यापैकी बरेच लोकं आज YouTube वर धडकले असालच किंवा येऊ पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची पोस्ट ही खूप महत्त्वाची असणार आहे. Thumbnail जाणून घेण्यापूर्वी तुम्ही YouTube वर व्हिडिओ Upload करणारेच असावेत असेही नाही तुम्ही YouTube वर अनेक प्रकारच्या व्हिडिओज चे आनंद घेता तेव्हा तुम्हालाही एक गोष्ट आहे जी सर्वात जास्त आकर्षित करते ती म्हणजे Thumbnail आणि याबद्दलच आज आपण या लेखात सविस्तर माहिती पाहूया. सोबतच मी या लेखात Thumbnail बद्दल जबरदस्त Ideas Share करणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील.
![]() |
Thumbnail Ideas In Marathi |
मित्रांनो, मी एक Marathi Youtuber आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून व्हिडिओज आणि ब्लॉगिंग वर पार्ट टाईम काम करतो आहे आणि मला याची आवड सुध्दा आहे. आणि आता थोडाफार अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. मला अनेक जण प्रश्न विचारतात की, आम्हाला पण एक YouTube Channel सुरू करायचा आहे. आणि त्यामागे त्यांचा हेतू अलग अलग ऐकायला मिळतो. कोणाला प्रसिद्धी हवी आहे तर कोणाला एक विरंगुळा आहे आवड आहे तर कोणाला पॉकेट मनी म्हणा किंवा एक Passive Income Source म्हणून YouTube वर काम करायचे आहे. मित्रांनो तुमचा हेतू कोणताही असो तुमचे या प्लॅटफॉर्म वर स्वागत आहे. मी माझ्या परीने नक्कीच या ब्लॉग च्या माध्यमातुन Tips शेअर करत राहीन. तेव्हा माझ्या ब्लॉग ला नक्कीच Subscribe करुन घ्या. माझ्या YouTube Channel ला सुध्दा Subscribe करू शकता चॅनल ची लिंक ब्लॉग च्या शेवटी मी देतो आहे.
YouTube Channel कसे Banvayche यावर आपल्या चॅनल वर व्हिडिओज आहेत सोबतच ब्लॉग सुध्दा आहे.
याठिकाणी आपण माहिती पाहतो आहोत Thumbnail म्हणजे काय ?
Thumbnail म्हणजे एका अर्थाने पोस्टर सुध्दा म्हणता येईल. तुम्ही YouTube वर अनेक प्रकारच्या व्हिडिओज किंवा माहिती सर्च करता तेव्हा तुमच्यासमोर अनेक व्हिडिओज दाखविले जाते पण सर्वात आधी येतो तो पोस्टर ज्यावर चित्र, मजकूर उदा. तुम्ही सर्च केले तुमचा एखादा आवडता चित्रपट समजा तो आपण RRR समजू तेव्हा तुम्हाला या Title आणि माहितीशी सुसंगत किंवा निगडित अनेक व्हिडिओज चे पोस्टर्स दाखविले जातील. खालीलप्रमाणे मी ते सर्च केले असता दाखविले गेले.
![]() |
YouTube Search Results Images |
आता तुम्हाला जे पोस्टर्स सर्वात जास्त आवडते त्यावर तुम्ही Click करता. म्हणजेच सर्वात आधी तुम्हाला आकर्षित करणारी एखादी गोष्ट जी YouTube videos शी बोलताना लक्षात येईल ती म्हणजेच Thumbnail आहे. आणि याच पोस्टर्स ला YouTube चा Thumbnail असे म्हणतात.
आता Thumbnail म्हणजे काय ते तुम्हाला कळेलच चला तर पुढे तो Thumbnail बनवायचा कसा ? Thumbnail कशाने बनवायचा ? त्यासाठी काय लागतो? Thumbnail Edit कसा करायचा? त्यावर वेगवेगळ्या प्रकारे Fonts कशे वापरायचे ? Thumbnail साठी Photos, Images कोठून Download करायचे ? Best Thumbnail Application कोणते? यावर सविस्तर माहिती पाहूया.
Thumbnail Size
YouTube Thumbnail Size हा 16:9 ह्या प्रमाणात असतो. त्यामुळे Thumbnail बनवितांना तो याच प्रमाणात बनविने आवश्यक आहे तेव्हाच तो बॅनर योग्यप्रकारे Fit होईल.
Thumbnail Colour आणि Images
Colour विषयी मी सांगणार आणि तुम्ही तोच रंग वापरा असे सांगणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या मर्जीने कोणत्याही आवडीच्या रंगांचा वापर करू शकता. पण त्यात थोडाफार लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. तुम्ही एखाद्या वनासंबंधी माहिती देत आहात तेव्हा हिरवा रंग किंवा नैसर्गिक Images वापरणे योग्य ठरेल याठिकाणी जर तुम्ही दुसरा एखादा भडक रंग किंवा दुसऱ्या गोष्टीचे चित्र लावले तर तुमच्या माहितीच्या अगदी विपरीत होईल. तेव्हा थोडक्यात तुम्हाला समजलेच असेल.
Thumbnail साठी Background, Images कोठून Download करायचे ?
Thumbnail बनवितांना शक्यतो आपण स्वतः काढलेले फोटो वापरणे अगदी योग्य राहील कारण, व्हिडिओ ज्या विषयावर आहे त्यानुसार आपण फोटोज् टिपू शकतो. किंवा घेऊ शकता. जर तुम्हाला आवश्यकच वाटत असेल तर, Download करून सुध्दा वापरू शकता फक्त ते Non Copyright किंवा Free To Use असायला हवे. यासाठी इंटरनेट वर अनेक Website आहेत. उदा. Piexl.com, Pixabay.com या सारख्या. Google वरूनही आपण Free Images Download करू शकतो यावर एक ब्लॉग आपण लिहिलेला आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यावरूनही माहिती मिळू शकेल. Photos, Images, Background मुळे Thumbnail आणखीनच वजनदार वाटतो.
Thumbnail कशाने बनवायचा ?
YouTube वर व्हिडिओज Upload करणारे जास्तीत जास्त Creator हे आपल्या व्हिडिओज साठी Thumbnail बनविण्यासाठी Pixellab या application चा उपयोग करतात. मी सुध्दा याच Application च्या मदतीने आजपर्यंत Thumbnail बनविले आहे. हे Application पूर्णपणे Free असून Play Store वरून तुम्हाला ते Download करता येईल. Pixellab Application मध्ये YouTube Channel Thumbnail प्रमाणे अनेक Social Media चे पोस्टर्स आणि Banner Size देऊन आहेत ज्याच्या साहाय्याने तुम्ही सहज एक Effective Thumbnail बनवू शकता. या Application ची लिंक मी याठिकाणी देतो आहे. 👇
Thumbnail कसा बनवायचा ?
Thumbnail हा आपल्या व्हिडिओ चा First Impression असतो. आणि First Impression is the last impression या वाक्याप्रमाने आहे. बहुतेक जण Thumbnail ला पाहून व्हिडिओज सुरू करतात. यात अनेक जण फसतात सुध्दा कारण व्हिडिओ मधे असे काहीही नसते जे व्हिडिओज मधे दाखविले जाते. त्यामुळे अनेक जण या गोष्टीचा फायदा घेतात आणि प्रेक्षक त्यावर क्लिक करणारच अशाप्रकारे ते आपला Thumbnail बनवितात. पण, याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, आपल्या व्हिडिओ मधील माहिती हा आपला आत्मा असतो त्यामुळे फक्त Thumbnail मुळे क्लिक करून येणारे प्रेक्षक व्हिडिओ सुध्दा पाहायला हवेत. फालतू शिवीगाळ करून जातील असेही आपल्याला करायचे नाही. जे व्हिडिओ मधे दाखविणार आहोत त्याबद्दलच आपण Thumbnail बनवायचे आहे. तर मग ते बनवायचे कसे ?
🔷 सर्वात आधी Pixellab Application Open करा.
🔷 Size 16:9 Retio Select करा. ( Pixellab Application मधे तुम्हाला YouTube Thumbnail हा Option दिलेला असतो. )
🔷 आता योग्य Background, Images त्यात Fit करा.
🔷 Add Text करा आणि तुमच्या विषयाशी संबंधित लिहा. तुम्ही effective वाक्य लिहू शकता. एकदम निबंध लिहू नका. थोडक्यात लिहा.
🔷 हवा असल्यास Text ला रंग द्या. आणि Save करा.
आता तुम्ही हा Thumbnail तुमच्या चॅनल वर व्हिडिओज साठी वापरू शकता.
Thumbnail साठी वेगवेगळे Fonts
Thumbnail बनवितांना त्यावर आपण Text लिहिणे आवश्यक असते काही वेळेस ते न लिहिताही काम होऊ शकते पण बहुतेक वेळा ते लिहिणे हितावह ठरते. मग प्रत्येक वेळी आपण साध्या साध्या पद्धतीने लिहिले तर ते कंटाळवाणे वाटते किंवा ते जास्त Effective वाटत नाही. काही वेळेस आपण एखादे Movie चे पोस्टर्स पाहतो त्यावर अनेक प्रकारच्या Fonts वापरून अगदी आकर्षित करून घेतो. त्याचप्रमाणे आपण सुध्दा चांगले fonts वापरून आपला Thumbnail दर्जेदार बनवू शकतो. काही वेळा हे Fonts विकत सुध्दा घेऊ शकता आणि अनेक Website आहेत ज्यावरून सुध्दा तुम्ही चांगल्या Fonts Download करून वापरू शकता. यावर आपल्या YouTube Channel वर व्हिडिओ आहे ज्यातून तुम्हाला नक्कीच मदत होईल.
Thumbnail Tips In Marathi
तुम्ही योग्य पद्धतीने Thumbnail बनविणे शिकले असाल किंवा बनवत असाल तर छान. परंतु थोड्याफार आणखी काही Effective Thumbnail Ideas In Marathi आहेत ज्या लक्षात घेणे गरजेचे आहे.
🔷 Thumbnail वर जास्त Text Add करू नका. थोडेसे पण Effective लिहा.
🔷 Trending Searches शी Related Thumbnail असल्यास नक्कीच Click येतील.
🔷 Theme Maintain करा. म्हणजेच तुमचा Thumbnail नेहमी असा unique ठेवा की, Thumbnail पाहून तुमच्या चॅनल ची आठवण रहावी
🔷 Non Copyright Images आणि Background वापरा
🔷 व्हिडिओज चालू घडामोडी शी निगडित बनवीत असाल तर, तारीख टाका त्यामुळे पाहणाऱ्यांना सोईस्कर होईल.
🔷 Real Images हे लोकांना Atract करतात त्यामुळे व्हिडिओज चे Screen Shot चा Effective वापर करू शकता
🔷 Clickbait म्हणून Thumbnail पण माहितीशी सुसंगत : ( Clickbait म्हणजे काय? याविषयी आपण ब्लॉग घेऊन येऊ. )
मित्रांनो अशाप्रकारे आपण Thumbnail विषयी माहिती पाहिली तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच दुसऱ्याला Share करा. धन्यवाद !
Sai Gedam [ Marathi Youtuber/Blogger ] My YouTube Channel
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box