Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Free ब्लॉग कसा बनवायचा? By Gadchirolikar

 Free ब्लॉग कसा बनवायचा? By Gadchirolikar

मस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आपली नवीन वेबसाईट कशी बनवायची ? हे शिकणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपली नवीन Website बनवावी असे वाटते. आणि बऱ्याच Youtube किंवा इंटरनेटवर तुम्ही माहिती शोधात असाल तर हा आजचा लेख तुमच्यासाठी उपयोगी नक्कीच ठरणार आहे. 
IMAGE - pixabay.com

सर्वात आधी आपण  जाणून घेऊया ब्लॉग  म्हणजे काय ? आणि Website म्हणजे काय ? खरं तर हे दोन्ही एकसारखेच वाटतात पण ब्लॉग बद्दल सांगायचे झाल्यास ब्लॉग हे अशा व्यक्तीकडून चालविले जाते. जो रोज काही ना काही माहिती share करत असतो. ब्लॉग वेगवेगळ्या विषयाला अनुसरून किंवा वेगवेगळ्या हेतूसाठी बनविले जाते. ज्यात कोणी आपल्या लिहिलेल्या कथा, कविता, लेख यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी माहित्या लिहीत असतो. ब्लॉग हे दैनंदिन Update होतांना आपण पाहतो म्हणजेच ब्लॉग चालक जर ऍक्टिव्ह  असेल तर तो रोजच्या रोज आपल्या ब्लॉगवर माहिती टाकून ब्लॉग Update करत असतो. Website  च्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही कारण, Website हि एका कार्यालय किंवा संस्था यांच्या असू शकतात. त्यामध्ये काही ठराविक गोष्टी अंतर्भूत करून ते बनविले असते. त्यामध्ये दररोज माहिती मिळेलच असे नाही. उदा. समजा एखादा रोजच्या चालू घडामोडी विषयी ब्लॉग लिहीत असेल तो रोज आपल्या ब्लॉग वर नवीन माहिती टाकेल पण जर एखादी कार्यालय किंवा संस्था यांची Website असेल ते रोज नवनवीन माहिती न टाकता एकदाच माहिती भरून ती चालवतील क्वचितच काही नवीन माहिती ते अंतर्भूत करतील. एकंदरीत तुम्हाला  समजलेच असेल कि, website कशा प्रकारच्या असतात आणि आपल्याला ब्लॉग बनवायचे आहे ज्यातून आपण दररोज माहिती Share करू शकू कि, अशी Website बनवायची आहे जी फक्त आपल्याला कार्यालय visit किंवा Profile म्हणून वापरायची आहे. 


ब्लॉग बवायला पैसे लागणार का ? कोणत्या गोष्टी साठी पैसे लागणार ? Free Blogging कशी करायची ?

हा प्रश्न साहजिकच आहे. कोणीही सुरुवातीला ह्याच प्रश्नाने श्रीगणेशा करतील. Blog बनवायला पैसे लावायचे कि नाही हे  सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवायचे आहे कि पैसे लावायचे कि नाही, आता पैसे लागणार तर कोणत्या गोष्टीसाठी पैसे लागणार हा प्रश्न आहे. सर्वात पहिली गोष्ट आपण ज्या माध्यमाने ब्लॉगिंग करणार आहोत तो माध्यम आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजेच कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाईल कारण ह्या शिवाय ब्लॉगिंग होणारच नाही. मोबाईल तर सर्वाकडे असतो त्यामधुनच तुम्ही सुरुवात करू शकता. मोबाईलच्या तुलनेत कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर Blogging सोपे होऊ शकते पण पर्यायाने मोबाईल सुद्धा पुरेसा आहे. थोडीफार जास्त मेहनत होईल. मी मोबाईल मधूनच सुरुवात केली आहे. आणि आताही काही ब्लॉग मी मोबाईल मधूनच लिहून काढतो. त्यानंतर तुम्हाला लागेल इंटरनेट जो आज सर्वांकडे उपलब्ध असतो. नसल्यास मित्रांमधून किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणाहून ब्लॉग लिहिण्यासाठी काही वेळासाठी घेऊ शकता. ब्लॉगिंग साठी आणखी म्हणजे डोमेन नेम आणि  वेब होस्टिंग साठी तुम्हाला थोडेफार खर्च करावे लागतील त्याला आपण या Business मधील Investment समजू शकता पण तुम्हाला Free म्हणजे एकही पैसे न लावता ब्लॉगिंग करायची आहे तर तेही सुद्धा करू शकता पुढे त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत. 

ब्लॉगिंग विषयी  बोलतांना ........ 

मित्रांनो ब्लॉगिंग करतांना सुरुवातीला फार जास्त वेळ देऊ नका. तुमच्या फावल्या वेळेचा तुम्ही उपयोग करू शकता. तुमच्या दैनंदिन कोणताही काम करत असाल किंवा अभ्यास, शिक्षण सुरु असेल तर शिक्षण तर त्यासाठी वेळ काढून उरलेल्या फावल्या वेळेत एक दोन तास वेळ काढून हे सर्व करू शकता. 

Free Blog Kasa Banvaycha ? फ्री ब्लॉग कसा बनवायचा ?

* सर्वात प्रथम Browser वर Blogger.com हि site open करा. 
* त्यानंतर 

Blogger.com - Create a unique and beautiful blog easily.

 हि वेबसाईट तुमच्यासमोर येईल ती ओपन करा. 
* Create Blog वर Click करा. 
* Create Blog वर क्लीक केल्यानंतर तुम्हाला ज्या Google Account ने ब्लॉग अकाउंट बनवायचे आहे ते अकाउंट Sign in करून घ्यायचे आहे. 
* त्यानंतर Choose a name for your blog अशा प्रकारे डॅशबोर्ड असेल तेथे तुम्हला तुमच्या हे नाव तुमच्या ब्लॉग च्या शीर्ष डिस्प्ले होणार आहे जे तुम्ही १०० Letters पर्यंत लिहू शकता. 
* त्यानंतर  तुमच्या Blog साठी URL निवडायचा आहे. म्हणजेच ब्लॉगर तर्फे दिला जाणारा blogspot.com  हा  फ्री Url आपल्याला निवडायचा आहे. उदा. gadchirolikar.blogspot.com हा मी घेतला आहे. त्यासाठी Availability तिथे दिसेल आणि आपण निवडलेला url उपलब्ध असल्यास तो आपल्याला दिला जाईल. आणि खालीलप्रमाणे available to use असा option येईल. 


* पुढे नेक्स्ट केल्यानंतर आपला ब्लॉग Successfuly तयार होईल. 

आता तुम्ही तुमच्या ब्लॉग वर तुम्हाला हवी त्या प्रकारची माहिती Share करू शकता. 

पुढे ब्लॉग कसा लिहायचा ? त्याला Domain Name कसा जोडायचा? Theme काय आणि कशी इन्स्टॉल करायची ? याबद्दल व आणखी सविस्तर माहिती पाहूया. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या