राज्यात तलाठी भरती लवकरच पहा शासन निर्णय
राज्यात तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त असलेली १०१२ पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशी एकूण ४१२२ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली असून सदरील भरती प्रक्रिया राबविण्याकरिता राज्यातील महसुली विभागनिहाय तलाठी (गट-क) पदांचा जिल्हानिहाय तपशील पंधरा दिवसात म्हणजे साधारण दिनांक १५ डिसेंबर २०२२ पूर्वी पाठविण्याचे आदेश विभागीय आयुक्त, कोकण/ नाशिक/ पुणे/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर यांना राज्य शासनाने दिले आहेत.
![]() |
तलाठी भरती २०२२ |
सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
⇒ नाशिक विभागात एकूण १०३५ जागा
नाशिक- २५२ जागा, धुळे- २३३ जागा, नंदुरबार- ४० जागा, जळगाव- १९८ जागा आणि अहमदनगर- ३१२ जागा असे एकूण १०३५ जागा
⇒ औरंगाबाद विभागात एकूण ८४७ जागा
औरंगाबाद- १५७ जागा, जालना- ९५ जागा, परभणी- ८४ जागा, हिंगोली- ६८ जागा, नांदेड- ११९ जागा, लातूर- ५० जागा, बीड- १६४ जागा आणि उस्मानाबाद- ११० जागा असे एकूण ८४७ जागा
⇒ कोकण विभागात एकूण ७३१ जागा
मुंबई शहर- १९ जागा, मुंबई उपनगर- ३९ जागा, ठाणे- ८३ जागा, पालघर- १५७ जागा, रायगड- १७२ जागा, रत्नागिरी- १४२ जागा आणि सिंधुदुर्ग- ११९ जागा असे एकूण ७३१ जागा
⇒ नागपूर विभागात एकूण ५८० जागा
नागपूर- १२५ जागा, वर्धा- ६३ जागा, भंडारा- ४७ जागा, गोंदिया- ६० जागा, चंद्रपूर- १५१ जागा आणि गडचिरोली- १३४ जागा असे एकूण ५८० जागा
⇒ अमरावती विभागात एकूण १८३ जागा
अमरावती- ४६ जागा, अकोला- १९ जागा, यवतमाळ- ७७ जागा, वाशीम- १० जागा आणि बुलढाणा- ३१ जागा असे एकूण १८३ जागा
⇒ पुणे विभागात एकूण ७४६ जागा
पुणे- ३३९ जागा, सातारा- ७७ जागा, सांगली- ९० जागा, सोलापूर- १७४ जागा आणि कोल्हापूर- ६६ जागा असे एकूण ७४६ जागा
शासन आदेश 👉 Click Here
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box