Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षेतील तारीख पे तारीख | लांबत चाललेल्या नोकरी भरतीने विद्यार्थी नाराज

स्पर्धा परीक्षेतील तारीख पे तारीख | लांबत चाललेल्या नोकरी भरतीने विद्यार्थी नाराज 

सध्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्ष महोत्सवी 75000 सरकारी नोकर भरती केली जाणार ही चर्चा आणि यावर अनेक हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वनविभाग सारख्या अनेक विभागात भरपुर नोकरभरती येणार असल्याच्या बातम्यांचा भडिमार सुरू आहे. अनेक दिवसापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या जागांची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. माझ्या जवळच्या मित्रांपैकी असे अनेक विद्यार्थी हे या परीक्षेची तयारी अनेक दिवसापासून करत आहेत. आता भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याच्या बातम्या आणि चर्चेमुळे त्यांच्यात याविषयी ओढ व आतुरता आहे. आणि त्याच गतीने अभ्यास व तयारी सुध्दा गतिमान केली आहे. पण, एक शोकांतिका आहे की नेमकी जाहिरात आणि या जागा निघणार केव्हा ❓ 

मी किंवा कोणीही सहजपणे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक जणांकडून असे सांगितले जाते की, जाहिराती किंवा जागा कधी येतील हे विसरून जायचं आणि आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा. प्रत्येक वेळी आपण हेच वाक्य सकारात्मक बाबीने मांडत असतो. पण आपण त्यांना किती वेळा सांगणार की तुम्ही अभ्यासच करत बसा ❓ शेवटी एक वेळ अशी येते की जिथून अनेकांच्या सहनशीलतेचा बांध फुटू लागतो. आता माझ्याच एका परिचयातील विद्यार्थ्याचा मी या ठिकाणी संदर्भ देतो, अतुल.. हा तीन वर्षापूर्वीच घरापासून बाहेर पडला शिक्षण व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी. हा विदयार्थी दुर्गम भागातील असल्याने त्याला तिकडे शैक्षणिक किंवा स्पर्धा व अभ्यास याविषयी गावाकडे काही होणार नाही या उद्देशाने तो तालुक्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करतोय. तो फेब्रुवारी महिन्यात जहिरात येईल म्हणून गाव सोडून इकडे संघर्षमय जीवन जगतो आहे आणि आता जून महीना लागणार आहे पण अजूनही भरती बाबतचा अंदाज नाही. असे अनेक विद्यार्थी असतीलही निव्वळ अभ्यास, फक्त अभ्यास म्हणत. कुठेतरी आणि कधीतरी खचुही शकतात. आणि का ❓ पहा हे जे विद्यार्थी अभ्यास करतात ना त्यांनी गावाकडचे घर सोडून आलेत कशासाठी ❓ चांगला अभ्यास व्हावा म्हणून. मग इकडे कोण फुकटात राहू देणार, कोण जेवण देणार, विद्यार्थी हा अभ्यास करतो ठीक आहे पण त्याआधी एक माणूस आहे जीव आहे.. आणि जिवंत राहण्यास अन्न आवश्यक आहे. एक दोन दिवस काढेलही उपाशी पोटी पण या उपाष्या पोटाने झोप येणार का आणि अभ्यास तरी कसा होईल ❓ 

स्पर्धा परीक्षा देत असतांना अनेक विद्यार्थी आहेत जे वरील संदर्भित बाबतीत संघर्ष करत आहेत. कधी कधी तर एखादे आवेदन करायला सुद्धा खिशात पैसे नाही म्हणून त्यांना अभ्यास सोडून वाटेल ते काम करावे लागते. मग काम आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ प्रत्येकालाच झेपेल असंही नाही. आपण खूप Motivational स्टोरी ऐकलो आहोत की, परिस्थिती गरीब असलेल्या मुलाने काम करून यश मिळविले.. आणि असेलही पण प्रत्यक्षात हे खूप कठीण असते. काही जण Motivation सांगताना स्वतःचे आईवडील शिक्षक किंवा शिपाई असताना स्वतः ला गरीब आणि मध्यम असल्याचे भासवून Motivation देतात, आता हे कसले गरीब ! 

लवकरच जाहिरात येणार ! ही ओळ रोज दैनिक, साप्ताहिक आणि चॅनेल वर येत असते. नवनवीन जी आर, नवनवीन बातम्या यामुळे डोकं भांबावून जाते, तरी पण आपण स्वतःला सांगत असतो की, काही पण असो जाहिरात कधीही येवो आपल्याला अभ्यास करायचंय. याच सकारात्मक विचाराने खूप दिवस निघून चालले आहेत. एकदा निदान कळायला हवं आहे की, खरच नेमकी स्पर्धा किंवा जागा ह्या कधी निघणार आहेत. मी ह्या ठिकाणी हे वाक्य यासाठी वापरतोय की, जर जागा कधी निघतील आणि स्पर्धा कधी होईल हे जर आमच्या विद्यार्थ्यांना कळले तर त्यांना आपल्या योजना आखता येतील. स्पर्धेसाठी, अभ्यासासाठी वेळ काढता येईल. पण होते काय वेगळेच आहे. नेमकी भरती होणार कधी या प्रश्नासह आणखी एक बाब म्हणजे आवेदन करायला लागणारी फी. जिथे UPSC, MPSC सारख्या परीक्षांची फी १०० - ३०० रुपये असते. तिथेच काही परीक्षा १००० च्या वर फी हे कशासाठी? यावर शासनाने व स्पर्धा परीक्षा घेणाऱ्यांनी आम्हा गरीब विद्यार्थांचा विचार करावा आणि या कमी ठेवाव्या ही माझ्या तमाम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे विनंती. 


नुकताच शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली आहे पण यातही बराच कालावधी जातो आहे पण, अजूनही या भरतीबाबत स्पष्टपणा नाही. शासनाने कोर्टात शिक्षक भरतीचा Roadmap दिला त्यानुसार ऑगस्ट मधे भरती पूर्ण होईल पण हे आता येणारी वेळच सांगणार आहे. त्यापूर्वी ह्या भरतीचे Exam इतक्या प्रचंड वेगवान पद्धतीने घेण्यात आले की, एका एका विद्यार्थ्याला अक्षरशः घाम फुटला. परीक्षेची जाहिरात काढून १५ दिवस फॉर्म भरायला करून त्यानंतर लगेच ५ दिवसात परीक्षा आटोपली पण त्यापूर्वी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना हेच माहित नाही की, नेमक्या शिक्षकांच्या जागा किती ? आणि अजूनही ते जागा किती येतील याची वाट पाहत आहेत आणि पेपर होऊन दोन तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे हे खूप दयनियच. इतकेच काय २०१७ च्या भरतीचे शिक्षक सुध्दा अजूनही प्रतीक्षेत आहेत. 

ही झाली शिक्षक भरतीची अवस्था, यातही शासन म्हणतोय की पुन्हा एकदा शिक्षक भरती होईल आणि काही कालावधी नंतर पूर्ण होईलच पण प्रश्न इथे पडतो की, कधी ? आता पुढे पुन्हा दुसऱ्या स्पर्धा आहेत तर त्या नेमक्या कधी.. या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पोरांना वाट पाहत तातकाळत बसवत ठेऊन काय होणार हे विचार करून बघावे तर, अनेक विद्यार्थी आहेत जे आज खचून जात आहेत. त्यांनी सरकारी नोकरी किंवा स्वप्न पूर्ण करण्याचा जो मानस होता तो सोडून द्यावा काय ? भरतीचा विचार सोडून दुसऱ्या कामी लागावे काय ? असे प्रश्न त्यांना नक्कीच पडणार आहेत. पण पुन्हा आपल्या ध्येपूर्तीसाठी तो आपल्या भुकेला, आपल्या भावनेला, गरिबीला सामना करत तो टिकून उभा आहे. कृपया शासनाने आपल्या सर्व ताकदीनिशी वेळोवेळी जागा व स्पर्धा परीक्षा घेऊन आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना बळ द्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या