Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

मी आणि ब्लॉगिंग प्रवास ( Marathi Blogger )

मी आणि ब्लॉगिंग प्रवास  ( Marathi Blogger )

नमस्कार,  मी गडचिरोलीकर आपल्या या साईटवर सर्वांचे स्वागत !  हा ब्लॉग  लिहिण्याची मला प्रेर णा मिळाली ती तुमच्यासारख्या माझ्या प्रिय वाचकांकडून  आणि ज्यांना सुद्धा वाटते कि, आपणही ब्लॉगिंग करून आपले विचार, आपल्याकडील माहिती जगासमोर आणावी तर तुम्ही योग्य ब्लॉग्स वर आहात आणि हा ब्लॉग पूर्ण वाचणारच  हे नक्कीच आणि शेवटपर्यंत वाचलेत तर तुम्ही पण याही पेक्षा सुंदर ब्लॉग्स बनवून, आपले विचार Google या मोठ्या प्लॅटफॉर्म वर मांडू शकता आपली  ख्याती जगभर पसरवू शकता आणि मानसिक, आर्थिक समाधान विळवू शकता. एके दिवशी तुम्ही नसणार पण तुम्ही तयार केलेले ब्लॉग्स, तुम्ही लिहिलेली माहिती सदैव राहील. अप्रत्यक्ष तुम्ही कोणाला तरी ब्लॉग्स च्या माध्यमातून मदत करणारे व्हाल. पण त्यापूर्वी मी ब्लॉग का सुरु केला आणि त्यासाठी कोणते प्रयत्न कोणत्या अडचणी आल्या या सर्व बाबी मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणार आहे. 

Canva 


२०१७ - १८ चे साधारणतः वर्ष होते मी एका जनसंपर्क मेळाव्याच्या कार्यक्रमात त्या काळातील गडचिरोली जिल्ह्याचे माहिती व जनसंपर्क अधिकारी यांच्या कार्यक्रमात त्यांना ऐकत होतो. ते करिअर या विषयी बोलत होते. शासकीय नोकरी विषयी खूप विस्तृत माहिती देत त्यांनी त्यापुढील माहिती सांगताना ब्लॉगिंग या शब्दाचा उच्चार केला. ब्लॉगिंग हा शब्द माझ्या कानावर पडले ती पहिली वेळ. पण अजूनही ब्लॉगिंग हा शब्द फक्त तोंडपाठ होण्यापूर्तीच मी आत्मसात केला पण नेमका ब्लॉगिंग हे संबोधच मला कळलेलं नव्हते. कारण, मी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांप्रमाणे एक होतो त्यामुळे अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, अभ्याक्रम, पात्रता या बाबीतच मी जास्त भर दिला होता. पण त्यांनी जे सांगितले कि, आपण शिक्षण घेत असतो, अनेक स्पर्धा परीक्षा देतो. मग त्यासाठी आपल्याला लागणारे पैसे सर्वांना अनुकूल प्रमाणात मिळतातच असे नाही. मग ज्यांना  हे सर्व खर्च झेपू  शकत नाही, ज्यांची घरची परिस्थिती नाजूक आहे त्यांनी काय करावे ? स्पर्धा परीक्षा नंतर जे संभाव्य धोके निर्माण होतील तेव्हा काय ? या सर्व बाबतीत चर्चा मी ऐकत होतो. जेव्हा त्यांनी परत त्यांच्या कठीण काळात कशाप्रकारे ब्लॉगिंग करून खर्च भागविला आणि तेव्हा मी पण त्या परिस्थितीशी समोरा जात होतो. आणि ब्लॉग हे लिखाणाशी संबंधित आहे हे ऐकून याविषयी थोडीशी उत्सुकता निर्माण झाली. महिन्याचा  लाख पगार बाजूला ठेवत उच्च पदस्थ माणूस आपल्या व्यस्त वेळेत काही तास काम करून परत  इतकेच पैसे ब्लॉगिंग मधून मिळवितो तेही आपला विरंगुळा पूर्ण करत या वाक्याने तर मी त्या सरांना लगेच वेड्यात काढत असतील असेच मनात विचार करू लागलो. 

पण हि गोष्ट जर मी तेव्हाच ऐकली असती तर मी आज ब्लॉगिंग क्षेत्रात बराच समोर गेलो असतो. पण योग्य वेळी कळायला आपल्याया आधी त्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची आवड पाहिजे किंवा परिस्थिती उद्भवली पाहिजे. मधल्या काळात कोविड १९ ने जी परिस्थिती उद्भवली आणि त्यातून लॉकडाऊन च्या काळात फक्त घरी बसून राहणे आणि अभ्यास  या दोन्ही गोष्टीत माणूस अडकलेला होता. घरची बेताची परिस्थिती असल्याने आणि वाढत चाललेले वय पुढे काय होईल या भयंकर विचाराने ग्रासत दोन पैसे कसे कमवीता येतील हा विचार बळकावू लागला. वाटेल ते काम करण्याची तयारी तर होतीच पण आपण शिकलेलो आहोत तर, शिक्षणाचा उपयोग करून नव्या पद्धतीने कसे कमवीता येईल हा सुद्धा विचार तितकाच मी स्वतःहून करत होतो आणि त्या काळात परिस्थितीच तशी होती कि, बाहेर कोठे काम करणे हे कठीण होते. त्यामुळे सर्वात आधी You Tube ने मनात घर केले. कालांतराने मी वेगवेगळ्या सोशल मीडिया च्या साधनाने कमविता येतील याची माहिती शोधू लागलो. बराच काळ मला आधी हेच समजून घ्यायला लागला की, नेमका हा ब्लॉगिंग प्रकार काय आहे?

ब्लॉगिंग करायचेय तर Patience पाहिजेच


आपण स्पर्धा परीक्षा देतोच किंवा एखादे शिक्षण घेतो तर ते एक वर्षाचे, दोन वर्षांचे किंवा त्यापेक्षा अधिक काळ आपल्याला Degree किंवा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागतोच. त्याचप्रमाणे ब्लॉगिंग हा एक तशीच Learning process आहे. काही वेळ आपल्याला द्यावेच लागते. कालांतराने आपण शिकतो त्यानंतर मग आपल्याला योग्य प्रकारे ब्लॉगिंग करता येईल. Patience जर नसेल तर ब्लॉगिंग हा क्षेत्र तुमच्यासाठी नाहीच. दोन चार वेळा Google AdSense Appraval मिळाले नाही म्हणून ब्लॉगिंग सोडणारे मी पहिले आहेत. 

Blogging कठिण प्रसंग, अडथळे आणि वेळ


Blogging द्वारे आपण खूप सारे पैसे कमवूच शकतो पण, सर्वात आधी आपला धेय जर असेल की, मला आता या मधून पैसेच कमवायचे आहेत तर, हे सांगणे जरा कठीणच आहे की या मार्गाने Day One पासूनच पैसे मिळतील. आणि मिळणार सुध्दा नाही. बघा ब्लॉगिंग ही एक process आहे ज्यातून प्रत्येक ब्लॉगिंग करू पाहणाऱ्या साठी लागू पडते आणि त्या प्रोसेस मधून जावेच लागते. तुम्ही म्हणाल की आता ब्लॉगिंग ही काय process आहे? Blogging ही गोष्ट आधी आपल्याला शिकविच लागते त्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सर्वसाधारण कोणीही शिकु शकतो. फक्त आवड असणे गरजेचे आहे.

सर्वात आधी आपण चर्चा करू ती वेळेबद्दल. वेळ ही सर्वात मौल्यवान वस्तू, गोष्ट किंवा अशी अमूर्त संकल्पना आहे जी अस्तित्वात आहे पण क्षणातच निघून जाते. आता मी वरील वाक्य लिहिले त्यात काही वेळ निघून गेली ती आता कधीच परतणार नाही पण मी त्या वेळात एक वाक्य लिहिले ते या ब्लॉगच्या माध्यमातून साठवण किंवा जतन करून राहील हा वेळेचा मी उपयोग केला. आता मी हा ब्लॉग केव्हा लिहितोय हे तुम्ही किंवा कोणीच सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाची वेळ ही सारखी नसते. त्याचप्रमाणे ब्लॉगिंग साठी केव्हा आणि किती वेळ द्यायची ही ज्याची त्याने ठरवायची असते. मी हे ब्लॉग रात्री 3 वाजता लिहितोय पण त्याशी कोणालाच काही देणं घेणं नाही. खरं तर ब्लॉगिंग ला कोणत्या वेळेत आर्टिकल लिहावे याबद्दल काहीही सांगू शकत नाही तुम्ही तुमच्या मिळालेल्या वेळेनुसार लिहू शकता. तुम्ही कोणत्या वेळेत लिहिता हे यात महत्वाचे नाही. तुम्ही बसून लिहीत आहेत कि, झोपून. तुम्ही वॉश रूम मध्ये लिहीत आहात कि अंगणात तुम्ही कधीही लिहू शकता. कोठेही लिहू शकता. पण तुम्हाला काढावीच लागते. ती म्हणजे वेळ. आता हीच खरी तारेवरची कसरत आहे जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग करता कारण, पूर्णवेळ ब्लॉगिंग हे तर कोणालाच शक्य नाही म्हणजे दिवसभर बसून काही ना काही लिहीतच राहावे हे सर्वांच्या फायद्याचे किंवा उपयोगीच असणार असे नाही. याव्यतिरिक्त दुसरे कामे असतात. अभ्यास असतो, शिक्षण असतो, कामे असतात. त्या कामातून आपण किती वेळ आणि कोणत्या क्षणी काढतो. हे ज्याचे त्याला काढावे लागते कारण, मी आधीच सांगितले सगळ्यांची जीवनपद्धती वेगळी आहे. एखाद्याच्या वेळेचा टाईमटेबल दुसऱ्याला उपयोगी पडेलच हे सांगता येत नाही. मग ब्लॉगिंग साठी वेळ आपण काढतच आहोत तर काढलेल्या मौल्यवान वेळेचा सदुपयोग करणे हे आपल्या हातात आहे. 

मला उद्भवत असलेले कठीण प्रसंग व अडथडे 


मी आता तुमच्याशी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणीला भाव देत सावध करतील. सर्वात प्रथम माझी चूक झाली ती सुरुवात करायला केलेला उशीर, कारण मला आवड असूनही मी ह्या गोष्टीकडे आधी लक्ष्य दिले नाही. त्यानंतर परत एक चूक म्हणजे ज्या गोष्टी सुरुवात करण्याआधी मी चांगल्याप्रकारे शिकून घ्यायला हव्या होत्या त्या न शिकता हवेत गोळीबार करत सुटलो त्यामुळे नेम लागला नाही या Expectation ने ब्लॉगिंग केली. आता नैराश्य तर येणारच. पुढे हळूहळू शिकत गेलो पण त्यात खूप वेळ खर्ची गेला ज्याला मी  वाचवून दुसऱ्या कार्यात खर्ची लावू शकलो असतो. त्यानंतर पुन्हा एक महत्वाची पण विनाकारण डोकं दुखविणारी गोष्ट म्हणजे लोकांचे ताने. आता कसे ते पहा आपण जे लिहितो ते प्रत्येकालाच उपयोगी येतील असे नाही किंवा प्रत्येकालाच पटतील असेही नाही मग ज्यांना तुमचे विचार पटतात किंवा लिहिलेले तुम्ही करत असलेले कार्य आवडत असेल तो तर तुमचे गुणगान गाणार नाही पण ज्यांना तुमचे विचार पटत नाही व मात्र वेळोवेळी तुम्हाला टोकत राहील असे व्यक्ती तुमचे खच्चीकरण करण्याचा प्रयन्त करतील पण ते आपल्यावर अवलंबून आहे कि, आपण त्याच्या गोष्टींना किती मनावर घेतो. त्याला आपण काय करतोय काय नाही हे अजिबात समजतच नाही त्यामुळे तो या गोष्टींना चांगले वाईट समजूच शकणार नाही. मग अशा व्यक्तीचे बोलणे मनावर घेण्याचे प्रश्नच उद्भ्वत नाही.  ज्यांना खरच तुम्ही करत असलेले काम आवडते ते तुम्हाला आणखी प्रेरणा देतील किंवा तुम्हाला Follow सुद्धा करतील. लक्षात ठेवा आजचे बोलणारे उद्या नक्कीच तुम्हाला येऊन म्हणतील कि, मी बोललो नसतो तर, तुला प्रेरणा मिळाली नसती. 

सर्वात आधी मला हे सुद्धा माहित नव्हते कि, नेमका Domain Name म्हणजे काय ? मी Free Blogging सुरु केली आणि आताही फ्री ब्लॉग्स करतो आहे कारण अजूनही मी शिकतो आहे. पण मी आपल्या ब्लॉग साठी एक Domain Name घेतला आहे जो gadchirolikar.in असा आहे. याविषयी सुद्धा मला खूप अडचणी आल्या त्या कशा पहा. जेव्हा Domain Name घ्यायचे होते त्यावेळेस ते घ्यायचे कोठून आणि कसे  घ्यायचे याविषयी शून्य माहिती होती, मी Articles व विडिओ पाहून Domain कसा घ्यायचे हे शिकून घेतले पण ते डोमेन नेम कोणते घ्यायचे हि सुद्धा एक कला आहे. कारण डोमेन नेम एकदम नीटनेटके असावे. मी एक Youtube चॅनेल सुरु केला आहे जो कि, गडचिरोलीकर याच नावाने आहे. त्यामुळे डोमेन नेम सुद्धा त्याच नावाने घ्यायचे हे ठरविले. ज्या ज्या पोर्टल मार्फत आपण डोमेन नेम घेऊ शकतो त्या त्या वेबसाईट ला भेटी देत मी हे डोमेन नेम शोधत होतो. सर्व ठिकाणी हे डोमेन जवळपास ७००,८०० रुपयाला होते. सर्वात आधी याचे महत्व माहिती नसल्याने हा खर्च करणे मी टाळत होतो. पण एकदा एका नवीन सुरू झालेल्या वेबसाईट वर हे डोमेन फक्त १० रुपयाला मी आपल्या नावाने केले. त्यांनतर अधेमधे मी आर्टिकल लिहीत होतो. थोड्याच काळात आपोआप वेबसाईट वर ट्राफिक म्हणजे वाचक येऊ लागले आहेत. हि बाब निदर्शनास आली. तेव्हा डोमेन घेकाढण्यात ऊन जवळपास १ वर्षाचा कालावधी जात होता. आता मी दुसऱ्या कामात किंवा  वेळ काढू शकत नसल्याने आर्टिकल्स लिहीत व प्रकाशित करत नव्हतो. आणि डोमेन नेम जो घेतला होता त्याची व्हॅलिडिटी असते. ती संपत आली होती. पण हि गोष्ट माझ्या ध्यानात नव्हती. त्यासंदर्भात एक कंपनीकडून ई-मेल सुद्धा होता. आणि एक दिवस हा डोमेन Expire झाला साईट एकदम ठप्प, सर्व काम बंद त्यानंतर मी एक आर्टिकल लिहून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पण तो पब्लिकली जात नव्हता. संपूर्ण साईट बंद पडली. आता कळून चुकले कि, डोमेन Expire झाल्याने हे सर्व गोंधळ झाले. आता तर काय करावे सुचत नव्हते. एका वर्षाची मेहनत आणि मेहनतीने या साईट ला मिळालेली Google ची AdSense Approval या सर्व गोष्टी वाया जाणार कि, काय ? असे वाटू लागले पण हे डोमेन परत Renew होऊ शकते. हि गोष्ट माहित झाली. मी डोमेन परत Renew कारण्याबात कंपनी शी कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी साडेपाच हजार renew चार्जेस लागणार असे सांगितले. आधीच आपल्याला काही मिळाले नव्हते. परत पुन्हा इतके पैसे देऊन Renew करणे हि गोष्ट मला परवडणारी नव्हती. त्यामुळे मी खूप दिवस Renew करू शकलो नव्हतो. पण साईट पूर्णपणे ठप्प असल्याने साईटला google वर सर्च करणारे यांना साईट अजिबात मिळत नव्हती या संदर्भात अनेकांनी मला विचारणा केली. तेव्हा कळून चुकले कि, आपले साईट व्हिसिटर आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते डोमेन परत मिळवून साईट पुन्हा सुरु करावेच लागेल आणि पुन्हा काळजावर दगड ठेऊन डोमेन परत  मिळविला आणि पुन्हा साईट सुरु केली. आता यातून तुम्हाला हे सांगायचे होते कि, तुम्ही डोमेन घेने आवश्यक तर आहेच आणि त्याला Renew सुद्धा वेळेवर करणे आवश्यक आहे. आणि या विषयी मला बरीच माहिती आहे. त्यामुळे मी तुमची नक्कीच योग्य प्रकारे मदत करू शकतो. आणि तुम्ही सतर्क व्हावे म्हणूनच हि माहिती या ठिकाणी मी तुम्हास देतो आहे.
 
Typing आणि  Content  या दोन गोष्टी आहेत ज्या ब्लॉगिंग  करतांना Must आहेत, कारण आपण जे लिहितो ते आपल्याला टायपिंग करून लिहिणे आहे. आपण आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या टायपिंग न करता. ऑटोमॅटिक पद्धतीने करता येतात. पण काही शब्दरचना काही वाक्ये हि आपल्याला Type करून लिहाव्याच लागतात. कधीकधी टायपिंग हि कंटाळवाणी गोष्ट वाटते. पण आपल्याला सहनशीलतेने ते लिहावंच लागते. का लिहावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यालाच Content म्हंटले जाते. आणि हा आपल्या ब्लॉगिंग चा आत्मा आहे. आणि आपण कोणत्या विषय संर्दभात ब्लॉग्स लिहिणार आहोत हे आपल्याला आधी ठरवावे लागते कारण त्यावरच तुमच्या साईट वर वाचक येत असतात. यात घडत असलेला एक भयानक प्रकार सांगतो , मी एकदा एका विषयावर खूप लेखन केले खूप विचार करून कल्पक असा एक ब्लॉग लिहिला. पण शेवटच्या टप्प्यात वीज गेल्याने तो सर्व आर्टिकल वाया गेला कारण मी तो सेव करून ठेवला नव्हता त्या दिवशी खूप वाईट वाटले कि सर्व सोडून द्यावे. पण एक गोष्ट मनात होती कि, मी हे का सुरु केले? तेव्हा सोडण्याचा प्रश्नच उद्बवत नाही. 

शिक्षण, आवड आणि ब्लॉगिंग 


मित्र आणि मैत्रिणींनो सर्वात आधी महत्वाचे आहे ते शिक्षण, तुम्ही शालेय विद्यार्थी असाल, एखाद्या प्रवेशासाठी अभ्यास करत असाल किंवा शासकीय नोकरीची तयारी करत आहात त्यासाठी शिक्षण व त्या परीक्षेच्या बाबतीतील अभ्यास महत्वाचा आहे. आणि आवडही तितकीच महत्वाची आहे. कारण तुम्हाला आवडच नसेल तर तुम्ही ती गोष्ट मनातून करणारच नाही. शाळेत असतांना गणित आवडत नाही म्हणून गणितात कच्चे लिंबू असलेले आजही आहेत. त्याचप्रमाणे शासकीय नोकरीची म्हणा MPSC , UPSC सारख्या स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच असेल वेळ कशी असते. त्यामुळेच शिक्षण किंवा आवड जितकी महत्वाची आहे. तितकीच वेळ सुद्धा महत्वाची आहे. याविषयी मी आधीच चर्चा केली आहे. तरीही तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात लेखन करू शकता. परत इथे मुद्दा येतो तो आवड आणि वेळेचा ते नियोजन तुम्हालाच करायचे आहे. विषय ब्लॉगिंग चा असल्याने इथे सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारावे कि, मला का ब्लॉगिंग करायची आहे. आणि त्यामागील हेतू काय आहे? 

या सर्व बाबतीत तुम्हाला प्रश्न पडतील , अडथळे येतील , यातून काय फलनिष्पत्ती होईल किंवा तुमचे काय साध्य होईल या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात येऊ शकता. मी तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. 

आउटपुट काय ?  

सर्वात शेवटी हेच आपण लक्षात ठेवणे आहे कि, आपण का लिहितोय का करतोय याच्याशी कोणाला काहीही करायचे नसते. आपण  जे कार्य करतो ते कोणाच्यातरी उपयोगी येईल हि काळजी घ्या. आपल्यामुळे कोणाला आनंद, प्रेरणा मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल हेच महत्वाचे आहे. आपण किती मेहनत करतो, काय Result देतो, हे कोणीच पाहत नाही शेवटी आउटपुट काय येतो हेच सर्वाना दिसत असते. अगदी स्पर्धा परीक्षेत सुद्धा तसंच. कोणाला किती मार्क्स आहेत कोण किती मेहनत करतो याविषयी कोणीच चर्चा करणार नाही. फक्त निवड झाली का हेच विचारणार. त्यामुळे आपल्या ब्लॉगवर किती  वाचक येतात? किती पैसे खर्च होतो? तुम्ही ब्लॉगर म्हणुन कशी मेहनत करता हे कोणी विचारणार नाही. त्यामुळे ह्या सर्व बाबी आपल्याला आपणच करायच्या आणि आपल्यापुरतीच मर्यादित ठेवायच्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या