Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सहशिलतेचा अंत पाहू नका | राज्यात ५५,००० शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता धारकांचे ठिकठिकाणाहून निवेदन

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सहशिलतेचा अंत पाहू नका | राज्यात ५५,००० शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता धारकांचे ठिकठिकाणाहून निवेदने



पूर्वी "मास्तर", "सर", "गुरुजी" हे शब्द शाळेतील शिक्षक नसूनही आपणास आदर मिळतोय असे वाटायचे पण, आता मात्र कोणी सर म्हंटले की थट्टा, मस्करी केल्यासारखे का वाटते. मुळात बर्फा सारखा थंड असणाऱ्या, शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या, विद्यार्थ्यांसाठी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज काय ? प्रत्येक अभियोग्यता धारकास नातेवाईक, मित्र, मैत्रीण कडून विचारणा केली जाते, काय झालं तुमच्या शिक्षक भरतीच? यांचे उत्तर कशाही प्रकारे देऊन मोकळा होणारा आज तो अभियोग्यता धारक स्वःताही प्रश्नात पडलेला दिसतोय. आणि जेव्हा घरचे आई बाबा यांच्या स्वप्नांना साकार करण्याची आता खरी वेळ आली आहे. जो स्वप्न दहा वर्षापासून रोज बघत ज्या अभियोग्यता धारकांनी ही परीक्षा पास केली आहे त्या स्वप्नाना आणि आई वडील यांना काय सांगणार ? शाळा सुरू होवून सुध्दा काही शाळांना शिक्षक नाही, मग त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे काय ? हे वास्तविक आज वर्तमानत्राद्वारे आपण ऐकतो, पाहतो मग का शिक्षक भरती का केली जात नाही ? 
राज्यात इतिहासातील सर्वात मोठी शिक्षक भरती होत आहे या शीर्षकाखाली तात्काळ TAIT नावाची भयानक परीक्षा पार पडली पण, नेमकी किती जागेसाठी पार पडली हे सुध्दा कोणास माहीत नाही. नेमक्या जागा किती ? पंधरा दिवसात फॉर्म भरून परीक्षा घेतली जाते. पण, आधीच दहा दहा वर्षे भरतीची वाट पाहणारा विदयार्थी काहीही न बोलता आपल्या भावना न व्यक्त करता गुमाण परीक्षेला सामोरे गेले या उद्देशाने की, एकदाची भरती होत आहे यात आता Arguments नकोत. एकदाची परीक्षा झाली, त्यात Syllabus काय होता ? ना आपले प्रश्न कोणते होते हे कळले ? अशा अनेक बाबींना दूर सारून प्रत्येक अभियोग्यता धारक फक्त भरती व्हावी मग आपला कोणताही बांधव त्यात शिक्षक लागावा या उद्देशाने प्रत्येक गोष्टी निमूटपणे सहन करत आला.

शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांच्या सहन करण्याचा विषय याठिकाणी आलाच तर, प्रत्येक बाबी तो सहन करत इथपर्यंत आलेला आहे. मग TET परीक्षा असो जी, सहा महिन्यातून एकदा घेतली जाणार होती ती दोन दोन वर्ष घेतली जात नाही. त्यातही हजारो मुले घोळ करून लाखो रुपये देऊन पास होऊन बसतात. तरीही आमचा विदयार्थी गुमानं परीक्षेला सामोरे जातो. कधी काळी D.T.Ed केलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असावा की, जर B.ed प्राथमिक साठी जमत असेल तर आम्ही D.T.Ed का केले असावे? अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जात जेव्हा हेच विद्यार्थी आधी TET मग TAIT यासारखे भव्यदिव्य पार पाडून सुद्धा आज तो घरी बसून असतो तेव्हा त्याला त्याचीच विनाकारण लाज वाटायला लागली आहे, शिक्षक भरती होणारच नाही आणि त्यावरच अवलंबून असणाऱ्या पोरांनी आपली जिंगदी खराब झाली म्हणून हाताला मिळाले ते काम करत आज नैराश्य विसरू पाहत आहेत. पण, त्यांची ही चूक समजावी का ? की , त्यांनी शिक्षक बनण्याचा निर्णय केला तो चुकीचा निर्णय होता, मग यापुढे शिक्षक बनण्याचे स्वप्न कोणीही बाळगावे की नाही. असे प्रश्न भावी शिक्षकांना उद्भवणार नाहीत हे कशावरून.

कोणतीही स्पर्धा परीक्षा घेतांना निदान जागा माहीत असतात पण शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही. मग आमच्या एकही जागा नाहीत तरी आम्ही परीक्षा देतो. आपल्याला मिळालेले मार्क्स यावर साधारणतः अंदाज बांधता यावे की, आपली वर्णी शिक्षक पदी होणार हे सुध्दा विचार किंवा गृहीत कोणत्या आधारावर करावे हा मोठा गंभीर प्रश्न. इतके सर्व करूनही प्रश्न अजून संपत नाहीत " संच मान्यता " होणे बाकी आहे. मग संच मान्यता आधीच करून नंतर परीक्षा घ्यायला हवी होती. मग त्या विषयावरून तारीख पे तारीख लांबत चालली आहे.


बिहार सारख्या राज्यात दीड लाखाच्या वर शिक्षक भरती घेतली जाते. आणि आपल्या समृद्धीच्या मार्गावर असलेल्या राज्यात निदान ५५,००० हजार शिक्षक भरती करण्यास काय हरकत आहे ? वित्त विभागाने ८०% पदभरतीचे परवानगी दिली असता. राज्यात अनेक शाळा शिक्षकांविना असता, शिक्षक परीक्षा पार पडली असता, अभियोग्याता धारक इतके तोंड फाडून मागण्या मागत असता, शिक्षक भरती करण्यास कोणती अडचण येत आहे हे समजण्या पलीकडचे आहे.

शिक्षण मंत्री, यांचेकडून अनेकवेळा ५०००० शिक्षक शाळा सुरू होण्यापूर्वी भरली जातील असे ऐकण्यात आले. याबद्दल अभियोग्यता धारकांना खूप आनंद वाटते खरा पण, यात सुध्दा त्यांच्यात एकवाक्यता राहत नाहीत. कधी ५५,००० तर कधी ३०,००० हजार तर कधी दोन टप्प्यात ५०,००० हजार जागा भरणार हे वक्तव्य येतात. यातून आणि नियुक्तीसाठी वाढत चाललेली तारीख आणि वाढत असलेले वय यामुळे अभियोग्यता धारकांच्या सहनशीलतेचा बांध फुटतो आहे.

आता त्यालाही रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही. यातूनच इतिहासातील सर्वात मोठी भरतीची आठवण तरी होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या