Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

नवोदय विद्यालय संपूर्ण माहिती, Navodaya Vidyalaya Information In Marathi

नवोदय विद्यालय संपूर्ण माहिती 

Navodaya Vidyalaya Information In Marathi

आम्ही हा लेख जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशा आणि परीक्षेसंदर्भात लिहीत आहोत. आजच्या घडीला अनेक पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा व त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी अनेक वेळा प्रयत्नशील असतात. अनेक पालक व विद्यार्थी ग्रामीण, दुर्गम भागात असतात ज्यांना या परीक्षेसंदर्भात माहिती नसते किंवा प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हा लेख उपयोगी पडेल. आपण आमचे वाचक म्हणून हि माहिती वाचत असाल तर आपल्या शेजारील, आपल्या ओळखीच्या व्यक्तींना हि माहिती नक्कीच शेअर करा. 

    नवोदय विद्यालय काय आहे ? What Is Navodaya Exam ?

    या लेखात आपण जवाहर नवोदय विद्यालय नेमके काय आहे ? येथील शिक्षण, सुविधा व प्रवेशासाठी द्यावी लागणारी परीक्षा या विषयी संपूर्ण माहिती पाहूया. 

    Navodaya Vidyalaya चे उद्दिष्ट 

    प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार न करता - संस्कृतीचा मजबूत घटक, मूल्यांचा संवर्धन, पर्यावरणाची जाणीव, साहसी क्रियाकलाप आणि शारीरिक शिक्षण यासह उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण प्रदान करणे.

    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पात्रता निकष  Eligibility Criteria For Javahar Navodaya Vidyalaya In Marathi 

    विद्यार्थी ५ वि उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

    पाचवीत शिकत असणे किंवा असणारे या परीक्षेस बसू शकतात. 

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पद्धती 

    👉 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २ तास दिले जातात. 
    👉 परीक्षा दोन भागात घेतली जाते. 
    👉 परीक्षा हि ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असते प्रश्न व चार पर्याय अशा प्रकारची घेतली जाते. 
    👉 एकूण ८० प्रश्ने व १०० गुणांची परीक्षा 
    👉 प्रत्येक योग्य उत्तरासाठी १.२५ गुण दिले जातात. 
    👉 नकारात्मक ( Negative Mark ) गुण पद्धती नसते. 

    अभ्यासक्रम 

    परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी , अंकगणित आणि भाषा या विषयावर प्रश्न असतात. 

    १. बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये ५० गुणांसाठी ४० प्रश्न विचारले जातात. आणि यासाठी ६० मिनिटे वेळ असतो. 
       
        खालील दहा भागावर ४ प्रश्ने विचारली जातात. 
       👉 वेगळा घटक ओळखा  - ४ प्रश्न 
       👉 तंतोतंत / जुळणारी आकृती - ४ प्रश्न 
       👉नमुना पूर्ण करणे  - ४ प्रश्न 
       👉आकृती मालिका पूर्ण करणे - ४ प्रश्न 
       👉समानता - ४ प्रश्न 
       👉 भौमितिक आकृती पूर्ण करणे - ४ प्रश्न 
       👉आरशातील प्रतिमा - ४ प्रश्न 
       👉अवकाश गुणधर्म - ४ प्रश्न 

    २. अंकगणितावर २५ गुणांसाठी २० प्रश्न विचारले जातात. त्यासाठी ३० मिनिटे वेळ दिले जाते. 
      👉 संख्या आणि संख्यावरील क्रिया 
      👉 संपूर्ण संख्येवर चार मूलभूत क्रिया 
      👉 अपूर्णांक आणि चार मूलभूत क्रिया 
      👉 लसावि / मसावि 
      👉 दशांश आणि त्यावरील मूलभूत क्रिया 
      👉 अपूर्णांक प्रकार व रूपांतरण 
      👉 लांबी, वस्तुमान , क्षमता, वेळ, पैसे इ. मोजमाप 
      👉 अंतर, वेळ, वेग 
      👉 सरळीकरण 
      👉 टक्केवारी 
      👉 नफा व तोटा 
      👉 सरळव्याज 
      👉 क्षेत्रफळ, परिमिती, खंड 
      
     ३. भाषा या भागावर २५ गुण व यासाठी २० प्रश्न व त्यासाठी ३० मिनिटांचा वेळ दिला जातो. 

      👉 या भागावर चार परिच्छेद दिले जातात व प्रत्येक परिच्छेदावर ५ प्रश्न विचारले जातात. 

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या