Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (REDP), Mitcon Gadchiroli

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती ( SC) प्रवर्गातील सुशिक्षित युवक, युवतींसाठी मोफत.. 



निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (REDP)

▶️ आयोजक : मिटकॉन कन्सल्टन्सी अँन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि., पुणे

▶️ प्रायोजक : उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई


विषय

🔴 उद्योजकतेकरिता आवश्यक असलेले गुण व उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास

🔴 शासकीय, निमशासकीय संस्थांच्या यंत्रणांच्या विविध कर्ज योजना, सोयी, सवलती आणि कार्यप्रणाली

🔴 विविध क्षेत्रातील उद्योग संधीबाबत मार्गदर्शन, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहाणी, सर्वेक्षण तंत्र, उद्योग व्यवसायाशी निगडित कायदे व ते अंमलबजावणीची

कार्यपद्धती

🔴 सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनांच्या किमती, हिशोब व इतर लेखाविषयक बाबी, प्रकल्प अहवाल तयार करणे


🔴 मनुष्यबळाचे व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन, उद्योग आधार


निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता

🔴 प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल

🔴 उमेदवार हा अनुसूचित जाती / अनुसूचित- जाती प्रवर्गातील किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र

🔴 राज्यातील रहिवासी असावा. तसेच जातीचे

🔴 प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.


शैक्षणिक पात्रता

🔴 किमान ७वी पास विशेष कौशल्य असल्यास पात्रता शिथील करण्याचे अधिकार महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांना राहतील (१० वी पास उमेदवारांना तसेच महिलांना प्राधान्य)


वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्षे

▶️ उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे

प्रशिक्षण कालावधी : १८ दिवस (निवासी)


वरील प्रवर्गातील युवक/युवतींनी सदर मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा


उद्योजकता परिचय मेळावा : दि. 20/11/2023 रोजी सकाळी 11.00 वा.


स्थळ :  गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली.


उद्योजकता परिचय मेळाव्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक


नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. देविचंद मेश्राम, प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, गडचिरोली मो.क्र. 8698948786

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या