Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

...कोमेजल्या त्या आठवणी ! कविवर्य स्वप्निल जुवारे यांची कल्पक कविता

Copyright image©️ made with pixellab 

कविवर्य स्वप्निल जुवारे यांच्या कल्पक लेखणीतून अनेक कविता साकार झालेल्या संग्रहातून निवडक कविता आपल्या  वाचकांसमोर घेऊन येत आहोत त्यामधील ...कोमेजल्या त्या आठवणी ! ही आठवणी जिवंत करणारी कविता..

                       ..कोमेजल्या त्या आठवणी !

 पूर्वीच्या रमणीय आठवणी कोमेजल्यासारखं वाटतयं...
कामानिमित्य पडलो घराबाहेर, 
लागल्या होत्या पावसाच्या धारा 
छत्रीविना तर कुठ जावसचं वाटत नाही, 
ऐरवी, बाहेर असतोय सोसाट्याचा वारा 
बालपण तर अगदी हरवल्यासारख वाटतंय, 
पुर्वीसारख नकळत काय पावसात भिजलं तरी मलेरिया झाल्यासारखं वाटतंय 
ज्याप्रमाणे गोठ्यातली गाय वासरला चाटतंय, 
खरंच, पूर्वीच्या रमणीय आठवणी कुठेतरी कोमेजल्यासारखं वाटतंय...

जीव होत लहानगं, वय होती पोरकी, 
राजा राणी, पच्चीस टोच, बायको बेंदा खेळायचं 
जे भेटेल ते, शिळी भाकर सुद्धा गिळायचं, 
अप्पु-गप्पु, गिली-गिली, छु म्हणून एकमेकांचे भोवरे फोडायचं 
ऐरवी, आधुनिक आयुष्य जगताना आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटतंय, 
खरंच, पूर्वीच्या रमणीय आठवणी कुठेतरी कोमेजल्यासारखं वाटतंय...

आजी माझी लई सुगरण, 
गव्हा-ज्वारीच्या भाकरी थापायची 
नकळत तोंडातून निघलं पिज्जा, बर्गर तर गप्प बसं भाड्या म्हणायची, पूर्वीच्या भाकरींची चव सातासमुद्रापार गेल्यासारखं वाटतंय 
खरंच, पूर्वीच्या रमणीय आठवणी कुठेतरी कोमेजल्यासारखं वाटतंय...

पूर्वीची राम-राम, नमस्कार म्हणायची परंपरा कायमचीच जणू मिटली, ऐरवी, Hii.., Hello.., How are you...? एखाद्या प्रियसीप्रमाणे चिकटली 
राम-राम, नमस्कार या शब्दाचा साज रोमांरोमात थाटतंय, 
खरंच, पूर्वीच्या रमणीय आठवणी कुठेतरी कोमेजल्यासारखं वाटतंय...

ऐरवी, बालपणचं अगदी हरवल्यासारखं वाटतंय, 
पुर्वीसारख काय पावसात भिजलं तरी टायफॉईड-मलेरिया झाल्यासारखं वाटतंय 
ज्याप्रमाणे गोठ्यातली गाय वासराला चाटतंय,
खरंच, पूर्वीच्या रमणीय आठवणी कुठेतरी कोमेजल्यासारखं वाटतंय...


-कवीवर्य स्वप्नील प्रमोद जुआरे
मो.न. 7038746980



टीप :- ह्या कविता इतरस्त्र प्रकाशित अथवा कवितेचे संदर्भ उपयोगाकरीता आमच्या संकेतस्थळारील Contacts मधे अथवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या