Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शेतात मटण खाऊन कामवितात करोडो रुपये ! हे शक्य आहे ? काय आहे प्रकार जाणून घ्या

शेतात मटण खाऊन कामवितात करोडो रुपये ! हे शक्य आहे ? काय आहे प्रकार जाणून घ्या सविस्तर.

मित्रांनो, आपण अनेक पार्ट्या केल्या असतिल, बाहेर शेतात वैगरे, थर्टी फर्स्ट किंवा एखाद्या मित्र, मैत्रिणीच्या वाढदिवसाला बाहेर नेऊन जेवण बनविले असेल. अशा पार्टीत जेवण बनवून खाल्यानंतर आपल्याला कोणीतरी पाहावे आणि त्याचे आपल्याला पैसे मिळावे असे होऊ शकते का? 

ही माहिती वाचतांना तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण हे सध्या सत्य आहे आणि यात आश्चर्य वाटायला नको असेच आहे. पण नेमके हे कसे घडते आहे चला जाणून घेऊया. यामागील तथ्य आणि माहिती कळल्यावर तुम्हाला वाटेल हे किती सहज आहे आणि कीती गंमतशीर ! उत्सुकता वाढली असेल तरीही काळजीपूर्वक वाचा कारण आपल्यालाही असे करुन पाहावे वाटू शकते त्यामुळे हि माहिती तुम्हालाही नक्कीच उपयोगी पडेल.



खरचं खुप पैसे कामवितात का ? तेही फक्त "मटण" खाऊन

काम काय तर चार ते पाच मिळायचे, खायची इच्छा झाली की, एकत्र जमा व्हायचे, मग घ्यायचे तेल, तिखट, मीठ, हळद, कांदे, मटण असो वा चिकन ! चूल पेटवायची. 

एकीकडे भात मांडले आणि एकीकडे मस्तपैकी मटण शिजवायची. आपली मटण भात, चिकन असो वा बिर्याणी झाली तयार की, मस्त पैकी खायचे. मग काय झालं आपले काम मग. बस्स इतके काम झाले की मिळाले आपल्याला पैसे.


पण, आताही तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतीलच आणि कुतूहलही वाटत असेल. भात, चिकन बिर्याणी त्यांनीच शिजविली आणि त्यांनीच खाल्ली. मग पैसे कुठून आले हाच प्रश्न पडला होय ना ? 

असे मिळतात पैसे 

आपल्याला YouTube या व्हिडिओ शेअरिंग Platform विषयी माहिती असेलच. किंबहुना बहुतेक जणांना माहिती आहेच आणि त्यावर जे व्हिडिओ येतात त्यातून जो व्हिडिओ Upload करणारा चॅनल मालक असतो त्याला YouTube कडून पैसे सुध्दा मिळतात ही गोष्ट सुध्दा आता बहुतेक जणांना माहिती आहे. याच माध्यमांतून ही मंडळी पैसे कमवितात. आहे न मित्रांनो गोष्ट गंमतशीर!


हे कसे करतात या विषयी जाणून घेऊया.

मी सुरूवातीला तुम्हाला सांगितले की, फक्त मटण खाऊन पैसे कमिवितात तर ही गोष्ट खरी आहे पण त्यामागे त्यांची मेहनत आहे. ती कशी तर पाहा, सर्वात आधी ती मंडळी जी काही शिजवून खातात ते शिजवायला आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे कोणी YouTube देत नाही. त्यांना ते स्वखर्चाने विकत घेऊन आणावे लागते. 


त्यांनी आपला चॅनल बनवून त्यावर कित्येक Videos Upload केले त्यांनतर त्यांचे Subscriber झाले. सुरुवातीला जेव्हा त्यांनी चॅनल सुरु केले असेल त्यावर कित्येक लोकं हसले सुध्दा असतील आणि वेड्यात सुध्दा काढले असतील की, कोण तुम्हाला खातांना पाहिलं ? पण आज याच पठ्यानी 20 Million पार Subscribers आपल्या चॅनलसोबत जोडून घेतले आहेत आणि एका एका विडिओला Million Views घेऊन येतात. त्यामुळे ते आज करोडो कमवीत असतात.


यामागे जी मेहनत आहे ती सुध्दा जाणून घेणे तितकेच महत्वाचे. आज Village Cooking Channel या सारखे इतरही चॅनल आहेत ज्या वेगवेगळ्या Ideas वर व्हिडिओ बनवून YouTube वर प्रसिध्दी, पैसे मिळवीत आहेत. असंख्य असे चॅनल असंख्य अशा Ideas आहेत. ज्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण, खूप मेहनतीने आणि योग्य प्रकारे सादरीकरण करून ते इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवून Upload करतात. मग यांना सुध्दा मेहनत लागते. कारण योग्य प्रकारे वेगवेगळ्या Angle नी Shoot करावे लागते. सर्व साहित्य एकत्र आणून त्यावर काम करावे लागते आणि एक म्हणजे हे करत असताना जी आपण मेहनत करतो त्यात मजा येते त्यामुळे आपल्याला कंटाळा न येता उलट मजेशीर कामातून आपल्याला पैसे मिळतात.

Village Cooking Channel प्रमाणे आणखी असे चॅनल आहेत जे, काहीतरी कलाकारी करून व्हिडिओ Shoot करतात व उपलोड करतात. जसे की, Mr. Indian Hacker म्हणून चॅनल आहे ज्यात मुले वैज्ञानिक प्रयोग करून दाखवितात व व्हिडिओ बनवितात. आजच्या घडीला त्यांचे चॅनल भारतातील नावाजलेले चॅनल आहे. पैसे तर मिळतातच शिवाय भारतात ते खूप लोकप्रिय सुध्दा आहेत. काही जण तर आपण न शिजविता निव्वळ खातात आणि खायचे चार्ज म्हणून पैसे कमवितात आणि ही सुध्दा आता आश्चर्य वाटण्याइतपत गोष्ट राहिली नाही.


आपल्याला वाटते की, निव्वळ मटण खाऊन ही लोकं पैसे कमवतात. तर, हे सपशेल चुकीचे आहे. त्यामागे मेहनत आहेच पण आपणही हे करूच शकतो किंवा शकलो असतो हे विचारच करत बसलो. आणि ते विचार न करता प्रत्यक्ष सुरुवात केली आणि ते खातात, गंमतशीरपणे कमवितातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या