Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

जात प्रमाणपत्र ( Caste Certificate ) साठी लागणारी कागदपत्रे, जात प्रमाणपत्र कसे काढायचे ? अर्ज कोठे करायचे ? Caste Certificate Online 2024 संपूर्ण माहिती.

जात प्रमाणपत्र ( Caste Certificate ) कसे काढायचे ? अर्ज कोठे करायचे ? संपूर्ण माहिती. 


मस्कार, आज आपण आपल्या या Blog मध्ये जात प्रमाणपत्र म्हणजे काय ? जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? जात प्रमाणपत्र कशासाठी काढावा लागतो आणि जात प्रमाणपत्र कोठे काढून मिळेल किंवा जात प्रमाणपत्रासाठी कोठे आवेदन करावे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहूया.  


( Caste Certificate) जात प्रमाणपत्र म्हणजे काय ?

सर्वात प्रथम आपण आपण जाणून घेऊया  ( Caste Certificate) जात प्रमाणपत्र म्हणजे काय ? जात प्रमाणपत्र म्हणजे असे प्रमाणपत्र जे आपल्याला आपल्या जातीच्या आरक्षणविषयक,शासकीय आणि शैक्षणिक बाबतीत उपयोगी येणारे जात दर्शक अधिकृत पुरावा असतो. 

( Caste Certificate) जात प्रमाणपत्र का काढावे ?

जात प्राणपत्राचे उपयोग पाहता जास्त प्रमाणात शासकीय आणि शैक्षणिक कामात येत असतो. शिष्यवृत्ती योजना, घरकुल योजना, जातीतील आरक्षण, अनेक शासकीय नोकरीचे आवेदन करतांना तसेच निवडणूक अशा अनेक शासकीय कामासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. म्हणून जात प्रमाणपत्र काढून ठेवणे आवश्यक ठरते. 

जात प्रमाणपत्र कसे व कोठे काढायचे ?

जात प्रमाणपत्र काढण्याची सर्व प्रक्रिया आता Online झालेली आहे. ते काढण्याकरिता लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या Mahaonline CSC त्यास महा इ सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र सुद्धा म्हंटले जाते तिथे तुम्ही जाऊन आपले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. 

जात प्रमाणपत्र काढण्याकरिता लागणारे कागदपत्रे 


१) एक रंगीत फोटो 

२) वंशावळ 

३) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी.सी.) मुलाचे, लाभार्थी व अर्जदार 

४) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी.सी.) वडिलाची किंवा अशिक्षित दाखला / सातबारा /मृत्यू प्रमाणपत्र 

५) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी.सी.) आजोबा अशिक्षित दाखला/मृत्यू दाखला 

६) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९६७ पूर्वीचा OBC व SBC करिता )

७) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९६१ पूर्वीचा VJNT करिता )

८) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९५० पूर्वीचा SC व ST करिता ) 

९) अधिकार अभिलेख पंजी/पी १/कोतवाल पंजी/किष्टबंदी 

१०) रेशन कार्ड 

११) आधार कार्ड मुलाचे/लाभार्थीं/अर्जदार 

१२) आधार कार्ड वडिलांचे 

१२) गृहकर पावती 

१३) घरच्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र ( असल्यास )

१४) रहिवाशी दाखला सरपंच ग्रा.पं., तलाठी, पोलीस पाटील, रहिवासी स्वयंघोषणापत्र 

कोणत्या जात प्रवर्गासाठी कोणत्या वर्षीचा पुरावा लागतो ?

SC/ST करिता दिनांक १० ऑक्टोबर १९५० चा पुरावा 

VJNT करिता दिनांक २१ नोव्हेम्बर १९६१ चा पुरावा 

OBC/SBC करिता दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ चा पुरावा 

 

टीप :( हि कोणत्याही योजने अथवा शासकीय अधिकृत वेबसाईट नाही माहिती हि विविध स्रोत व संकेतस्थळ मधून मिळविलेली आहे. अधिक माहिती साठी शासकीय अधिकृत संकेतस्थळ व माहितीचा उपयोग करावा )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या