Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Blog चे भविष्य - Micro Niche; मराठीत ब्लॉग वाचक विदेशातून !, Marathi blogging

Marathi Language Blog चे विदेशातून येत आहेत वाचक! 


मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार, आज प्रत्येक जण जो नविन Blogger आहे तो आपला पहिला Blog बनविताना Confussion मधे असतो की, Blogging साठी Language कोणती निवडायची? आपल्यापैकी जास्त प्रमाणात English Language मधे Blogging सुरू करण्याचा निश्चय करतात. आणि साहजिकच आहे की English ही जागतिक पातळीवरील भाषा आहे. Google Search करतांना बहुतेक जण English Language चा वापर करतात. 


    आपल्या Marathi Blog Site वर आणि मराठीतून Blogging करूनही विदेशातून वाचक आपल्या ब्लॉगवर येत आहेत हे कसे शक्य आहे ? Marathi Blog किंवा Marathi भाषेतून Blog लिहिल्यास केवळ ते स्थानिक पातळीवर वाचल्या जाईल ही विचारसरणी आता बदलावी लागेल कारण, आम्ही आमच्या ब्लॉगवर लिहीलेली माहिती, लिहिलेलं Articles याचे Views आज विदेशातून यायला लागले आहेत म्हणूनच आज आपण या विषयी चर्चा करूया.



    मातृ भाषेतून का सुरू करावे Blog ?


    मित्रांनो आपण अनेक गोष्टी, कल्पना आणि विचार हे आपल्या मातृभाषेतून योग्य प्रकारे प्रकट करू शकतो इतर भाषेच्या तुलनेत, पण English ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि ती जगात किंवा YouTube सारख्या माध्यमावर अनेक Features आहेत व ते वापरताना English Language मधे उपलब्ध असते. असे असले तरीही ते आपण आपल्या मराठी भाषेत अनुवाद करून समजून घेत असतो Exactly ह्याच Point of View ने आपण मातृभाषेतून Blog करू शकतो या बद्दल चर्चा करू.

    Marathi Blog सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज English Language मधे उपलब्ध असणाऱ्या Blogging च्या अनेक सुविधा Marathi Blogging म्हणजेच Marathi Blogger साठी उपलब्ध आहेत. पूर्वी आपण आपल्या मराठी भाषेत blogging करू शकत नव्हतो, कारण Marathi Blogging साठी ऑप्शन नव्हता. आता तो आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


    पूर्वी UPSC आपण मराठी भाषेतून देऊ शकत नव्हतो. आज तेथे आपल्याला देता येते त्याचप्रमाणे अनेक केंद्रीय परीक्षा आहेत त्यात मराठी भाषेतून परीक्षा देण्यासाठी सुविधा आहे त्यामुळे एकंदरित ह्या परीक्षांची तयारी करण्यास आपल्याला सोयीस्कर झाले. अगदी तसच पुर्वी इंग्लिश भाषेतच ब्लॉग लिहा व करायचे असल्याने बऱ्याच जणांना अडचण होत होती. उत्तम लिखाण, करण्याची आवड असूनही केवळ भाषेच्या अडचणीतून अडथळा येत होता. पण, आता मात्र ह्याला पर्याय आहे.

    आपण अशा एका विषयावर ब्लॉग करत असाल ज्या ब्लॉगचे वाचक हे स्थानिक पातळीवरील असतील. तेव्हा साहजिकच आहे स्थानिक भाषेचे वाचक असतील तेव्हा आपल्या भाषेत लिहिणे योग्य राहील. स्थानिक पातळीवरील विषयावर लेखन करतांना बऱ्याच गोष्टी, बरेच शब्द आपल्याला आपल्या मातृ भाषेतून योग्य प्रकारे मांडता येतात, त्यामूळे काय होते की, आपण जे काही ब्लॉग मधून मांडत आहोत त्या भावना व ते लेख आपल्या वाचकांना आपण पटवून देण्यात यशस्वी होऊ शकतो.

    Marathi Blog चे भविष्य काय ?


    सुरुवातीला केवळ English Language मधेच Blogging करता यायची हे आपण पाहिले आहे. आता मराठी भाषेतून ब्लॉग करता येते तरीही, English Language मधले ब्लॉग बंद झाले नाहीत. म्हणजे मला हे सांगायचे आहे की एखाद्या Language मधले ब्लॉग आलेत म्हणजे दुसऱ्या कुठल्या Language मधले ब्लॉग बंद होतील ह्यात कोणताही Sense बनत नाही. 

    Marathi Blog चे भविष्य काय ? ह्यावर बोलतांना एवढच सांगावेसे वाटते की Marathi Blogging ची आता सध्या सुरुवात आहे. त्यामूळे आताच आपण सुरुवातीच्या काळात आपल्या लेखनातून Blog वर काम करणे योग्य राहील कारण हळूहळू आज Marathi Blogging च्या उपलब्धतेमुळे अनेक जण ब्लॉगिंग क्षेत्रात वळताना आपण पाहतो आहोत. मोठे Newspaper सुधा पूर्वी English Language मधे उपलब्ध होते ते सुद्धा आता marathi language मधे newspaper उपलब्ध करून देत आहेत. ह्यावरून आपण काय समजू शकतो ? की English Language मधल्या उपलब्ध गोष्टी मग त्या newspaper असो व्हा ब्लॉग्ज ह्यातले Content अनेकांना आपल्या भाषेत उपलब्ध झाल्यास ते वाचणे अधिक आवडीचे होईल त्यामुळे मातृ भाषेतून ब्लॉग्ज बनविण्याचे सध्या ही उत्तम वेळ आहे हे लक्षात येईल.

    English Language मधले blogs या सारखे बरेच ब्लॉग Hindi Language मधे लिहिणाऱ्या Bloggers ने लिहायचा सुरुवात केली. आज बरेच जण आपल्या हिंदी भाषेत ब्लॉग लिहून लाखो रुपये महिन्याला कमवितात हे आपण ऐकत असतो. कारण बराच वाचक जनमत आपल्या देशात आहे जो आजही आपल्या भाषेत उपलब्ध असलेल्या माहित्या शोधत असतो. ते आपल्याला उपलब्ध करून देणे आणि आपल्या भाषेत लिहिणे, आपल्या भाषेत योग्य मांडणे आवश्यक आहे सध्या हेच आपल्याला ब्लॉग्ज सुरू करण्यास अनुकूल बाब आहे.

    तुम्ही असे विचार करत असाल, की आता तर खूप Bloggers मराठी भाषेतून blogs बनवत असतील आणि आता मी सुरू केले तर कोण वाचेल आणि कोणत्या विषयावर लिहायला पाहिजे ? तर इथे मी एक गोष्ट सांगतो की आता ही सुरुवात आहे आणि किती bloggers आहेत जे मराठी भाषेत blogging करतात तर ती आपण मोजू शकतो इतकीच संख्या सध्या Marathi Blogging किंवा marathi Blog च्या बाबतीत आहे. पाहिजे तेवढे ब्लॉग्ज, पाहिजे तेवढे ब्लॉगर्स अजूनही marathi language मधे उपलब्ध नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामूळे तुम्ही नक्कीच मराठी ब्लॉग सुरु करा. राहिला प्रश्न की आपण कोणत्या विषयावर लेखन केले पाहिजे ? ह्याचे उत्तर किंवा तुम्ही कोणता ब्लॉग सुरु करावा ह्याचे उत्तर मी कसे काय देऊ ? ह्यावर मी आपल्या साईट वर माहिती दिली आहे ती सविस्तर वाचून तुम्ही आपला ब्लॉग सुरु करू शकता कारण ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे त्यातला काही बाबी व सूचना खालील प्रमाणे आहेत त्या नक्कीच आत्मसात करा.

    Marathi Blog साठी काही Micro Niches 


    Niche म्हणजे काय ? आपण ज्या विषयावर ब्लॉग करणार आहोत, ज्या विषयी लेख लिहू तो विषय म्हणजे एकंदरित आपल्या ब्लॉगचा Nieche. आता Micro Niche म्हणजे काय ? ज्या विषयावर ब्लॉग सुरु करणार आहात त्यातल्या त्यात असलेला सखोल व सूक्ष्म विषय म्हणजे Micro Niche.

    उदा. समजा तुम्ही Health Care ह्यावर ब्लॉग सुरु करणार आहात. हा झाला तुमचा Niche पण Health Care ह्यावर लिहिताना तुम्ही जर त्वचा विकार, त्याची काळजी, प्रकार ह्यावर जास्त प्रमाणात सूक्ष्म लेखण करत असाल तर त्यास तुमचा Micro Niche म्हणता येईल. म्हणजेच 'Skin Care' हा तुमच्या ब्लॉगचा Micro Niche आहे.

    तूम्ही जर मराठी भाषेतून असे Micro Niche ब्लॉग तयार केलात तर नक्कीच लवकरात लवकर वाचक तुमच्या ब्लॉगला भेट देतील. आणि अगदीच थोड्या काळात तुम्ही blogging क्षेत्रात उंची गाठू शकता. तरीही काही गोष्टी आहेत जशा, लेखनाची आवड, विषयाचे ज्ञान, शिकण्याची तयारी व संयम या बाबी तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. या ठिकाणी काही Micro Niche ब्लॉग आहेत ज्यावर तुम्ही Marathi Blog सुरू करू शकता. ज्या खूप प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत.


    Marathi Blog चे वाचक येतात विदेशातून !


    मित्रांनो आपल्या ह्या ब्लॉग वर संपुर्ण महाराष्ट्रात, देशातच नाही तर विदेशातूनही वाचक येत आहेत. आम्ही हा ब्लॉग सुरु केला तेव्हा असे वाटायचे की, आपण ज्या विषयावर लेखन करतो आहोत त्यावर केवळ स्थानिक Views येतील. सुरुवातीला हा अंदाज खरा ठरला. पण, नुकताच आपल्या ब्लॉगवर विदेशातून वाचक येत आहेत. सुरुवातीला वाटत होते की फक्त आपल्या जिल्ह्यातीलच वाचक येतील पण आता मात्र जिल्हा, देश व विदेश अशा सर्व स्तरावरून वाचक येत आहेत. त्यामुळे Marathi Blogging ही सुद्धा International Blogging साठी उपयुक्त आहे. म्हणजे केवळ English Language मधेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लॉगिंग करू शकतो हा पूर्वग्रह आता नाही. म्हणूनच आपण बिनधास्त आपल्या मातृभाषेतून ब्लॉगिंग करू शकतो.

    आपल्या ब्लॉगवर विदेशातून येणारे वाचक यांचा Analysis करण्यासाठी खाली आम्ही ग्राफ देतो आहोत.



    20 Mirco Niche Blog Idea For Marathi Blogger 


    आपण मराठी भाषेतून एका वेगळ्या 20 विषयावर लेखन करून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करू शकतो. मी खाली काही Unique Blog Ideas For Marathi Blogger साठी सांगणार आहे तुम्हीही त्यावर ब्लॉग Try करू शकता.

    1. शेतीविषयक : आजच्या काळात शेती आणि शेतकऱ्यांच्या अनेक समस्या व अडचणी आहेत त्यावर तुम्ही ब्लॉग सुरु करू शकता. ह्यात शेतीसाठी आवश्यक बियाणे, शेतीसाठी आवश्यक जमीन व जमिनीची काळजी, कीड व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी आहेत ह्यावर तुम्ही Marathi Micro Niche Blog सुरू करू शकता.

    2. शेती व शेतकरी योजना Blog : भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. शेतकरी आणि शेती ह्यावर आज संपूर्ण देश अवलंबून असतो. अशा बऱ्याच योजना शासनाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक विकास शेतीपूरक उद्योगांमध्ये हातभार लावण्यासाठी असतात त्या वास्तविक पाहता लहान गावातील शेतकरी पर्यंत पोहचत नाहीत. ह्या विषयावर आपण सखोल माहिती घेऊन आपल्या Marathi Blog वरून PM Kisan, Maha DBT अंतर्गत शेतकरी व शेतपूरक योजना यांची विस्तृत माहिती देणारे एक ब्लॉग सुरु करू शकता.


    3. महीला योजना Blog : आज केवळ महिलांच्या साठी अनेक योजना व कार्यक्रम आहेत जसे , Mazi Ladki Bahin Yojna, महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे दिल्या जाणाऱ्या आर्थिक विकास कार्यक्रम प्रशिक्षणे ज्यांची माहिती अनेक तळागाळातील महिलांना पोहचत नाही. माहिती ही पोहचली तरी काही प्रमाणात अपूर्ण अथवा अर्ध माहिती मिळते आपण केवळ महिलांच्या साठी असलेल्या अनेक योजना व कार्यक्रमांची माहिती आपल्या Marathi Micro Niche Blog मधून देऊ शकतो आणि हा तुमचा Unique Blog होऊ शकतो. अशा प्रकारचे ब्लॉग खूप कमी पाहायला मिळतात.

    4. Admit Card ( प्रवेशपत्र) Blog : मित्रांनो, ही ब्लॉग आयडिया एकदम भन्नाट आहे. आपण पाहता आज अनेक स्पर्धा परीक्षा होतात त्यांचे अनेक जण आवेदन करतात पण ऐनवेळी परीक्षेचे वेळापत्रक माहित नसल्याने त्यांना प्रवेशपत्र Download करण्यास खूप अडचण होत असते. आपण एक यावर आपल्या भाषेत Micro Niche Blog सुरू करू शकता. या ब्लॉग मध्ये आपल्याला महाविद्यालय, शाळेचे, स्पर्धा परीक्षा यासारखे केवळ प्रवेशपत्र व परीक्षा वेळापत्रक यांचे Update देणारे ब्लॉग सुरु करावे नक्कीच हे आपले एकमेव ब्लॉग सगळ्यांना आवडेल.

    5. कथा ( Short Story) Blog : Instagram, YouTube या सारख्या माध्यमावर आज कॉमेडी व्हिडिओ, Motivation, Educational Videos अशा प्रकारचे व अन्य प्रकारचे व्हिडिओज खूप पाहिले जातात. YouTube, Instagram सारख्या माध्यमावर Videos बनविणारे Creators यांना प्रत्येक वेळी व्हिडिओ बनविण्यासाठी Story ची गरज असते. अशा वेळी तुम्ही एक चांगले लेखन व कथानक लिहीत असाल तर तुम्हाला एक Story Blog सुरू करणे खूप फायद्याचे ठरेल. अनेक Creators तुमच्या ब्लॉग मधल्या Stories वाचायला येऊ शकतात व त्यातून तुमच्या Story त्यांना आवडल्यास त्यावर व्हिडिओज बनवून त्याचे Credit तुम्हाला मिळू शकते. यावर मराठी ब्लॉग करणाऱ्या तरुणांनी लक्ष द्यावे असे मला वाटते.

    6. Online Course & Coupon Code Blog : आज Online उपलब्ध असलेल्या अनेक Courses चे Selection करणे फार अवघड असते. अनेक प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस आहेत व त्यावर अनेक प्रकारचे कूपन कोड सुधा असतात ज्यातून आपल्याला वेळोवेळी सुट मिळत असते, पण बहुतेक जणांना त्याबद्दल फारशी माहिती एका ठिकाणी मिळत नाही. तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल ते किती टक्के चांगले व कोणासाठी आहे तसेच त्यावर कोणते कूपन कोड सध्या सुरू आहे हे अपडेट देणारे एक प्रभावी ब्लॉग सुरु करू शकता.

    7. What's App, Instagram , YouTube Features & Update : WhatsApp हा Application आज प्रत्येक मोबाईल वापरकर्ता वापरत असतो. त्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बहुतेक जणांना माहिती नसते. त्याचप्रकारे Instagram व YouTube सारख्या माध्यमावर अनेक Update वेळोवेळी येत असतात जे सर्वांनाच माहीत असते असे नाही. केवळ मोजकेच लोक या Media चा वापर योग्य प्रकारे करू शकतात. आपण या बद्दल Awareness साठी म्हणजेच ते कसे Secure पने हाताळणे, कोणत्या सेटिंग्ज तपासाव्या व वेळोवेळी कसे Update करावे याबद्दल अनेक प्रकारचे लेख लिहून आपला एकमेव Marathi Micro Niche ब्लॉग बनवू शकता.

    8. लहान बालकांच्या संगोपन व सवयी यावर ब्लॉग : "लहान मुले म्हणजे देवाघरची फुले" असे आपण म्हणतो. अनेक पालक व माता आपल्या मुलांना त्यांचा हट्ट पुरवत असताना मोबाईल या सारख्या वस्तू त्यांच्या हातात देत असतात. कधी कधी त्यांना ह्या मोबाईल ची इतकी सवय होते, की ते मोबाईल शिवाय जेवण सुद्धा करत नाहीत. कधी कधी ते इतका गोंधळ आणि कल्लोळ करतात की डोकं भांबावायला लागतो अशा वेळी त्यांचे Management वेगळ्या प्रकारे करणे आवश्यक असते. म्हणूनच तुम्ही जर लेखनात आवड आणि बाल्यावस्था संबधित त्यांचे सवयी व संगोपन यांचे जाणकार असाल तर नक्कीच यावर एक दर्जेदार व Unique Blog सुरू करावे.

    9. Top 10 Blog : ह्या ब्लॉगची कल्पना ही उत्तम स्वरूपाची आहे. आज ह्यावर YouTube Channel भरमसाठ दिसून येतात. ह्यात आपण जगातील, देशातील कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी आहेत ज्या क्रमागत दहा घेऊन त्या आपल्या प्रसिद्धी, दर्जा व गुणवत्ता यानुसार क्रम लाऊन त्या सांगू शकतो. उदा. जगातील Top 10 सर्वात लांब नद्या. मग सांगताना पाहिल्या नंबर वर नाईल नदी अशा प्रकारचे अनेक असंख्य विषय आहेत जे आपण टॉप टेन स्वरूपात सांगू शकतो. 

    10. गावांची माहिती ब्लॉग : भारतात अनेक गावे आहेत ज्यात काही गावे खूप प्रसिद्ध आहेत, पण त्या बद्दलची माहिती ऑनलाईन आपल्याला फारशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. आपण अशा गावांची यादी बनविली ज्यात काहीतरी ऐतिहासिक, परंपरा, संस्कुती आणि प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे व वाहतूक सोय याबद्दल माहिती देणारे ब्लॉग्ज बनवू शकता.

    11. Offers & Deals Blog : Amazon, Flipkart, Meesho अशा E - commerce वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन वस्तू विक्री करतात. आज प्रत्येक जण काही ना काही ऑनलाईन खरेदी करतोच त्यातल्या त्यात काही ऑफर्स असतील तर दुधात साखर. म्हणुनच बहुतेक जण अशा सूट व ऑफर्सच्या शोधतच असतात. तूम्ही आपला एक ब्लॉग सुरु करुन त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांच्या ऑफर्स, Deals Blog यावर लेखन करू शकता. सोबतच Affiliate Marketting सुद्धा करू शकता.

    12. Share Market, Trading Blog : "Share Market ऐक ऐसा कुवा है जो पुरे देश की प्यास बुझा सकता है" अशी एक डायलॉग तुम्ही ऐकलीच असेल तर ह्यातली प्यास कोणती तर ती आहे पैशांची. ह्यात बरेच जण चांगल्या गुंतवणुकीसाठी कोणते शेअर्स खरेदी करावे ह्या शोधात असतात. ट्रेडिंग कशी करायची ?, कोणते शेअर्स कोणत्या वेळी चालणार ?, भविष्यात कोणते शेअर्स चांगले रिटर्न देऊ शकतात हे अभ्यासपूर्ण लेख लिहून पटवून दिले तर सर्वात जास्त RPM Clicks मिळवून तूम्ही दर्जेदार Blogs चे मालक बनू शकतात.

    13. Short Trick Blog : शॉर्ट ट्रिक अशी गोष्ट आहे जी घंटो का काम मिनीटो मे होऊ शकतो. पण ह्या ट्रिक्स आपल्याला एकाच जागी भेटत नाहीत. आपण अशा ब्लॉग्ज सुरू करू शकतो जिथे अनेक भन्नाट ट्रिक्स मांडू शकतो. अशा ब्लॉगची Reach लवकरात लवकर होईल आणि लवकर Google Index होईल ह्यात अजिबात शंका नाही.

    14. Ideas Blogs : Ideas म्हणजे काम कोणतेही असो ते करण्याची वेगळी पद्धत याची Ideas देणारे Blogs असा एक ब्लॉग सुरु करू शकता. अशा प्रकारच्या Blog मधे आपण अनेक प्रकारच्या Ideas सांगू शकतो. वेगळ्या वेगळ्या कामे करण्याच्या किंवा व्यवस्थापनात एका वेगळ्या प्रकारे आयडिया ह्या ब्लॉगच्या माध्यमातून सुचवू शकता.

    15. Re-use Ideas Blog : घरातील फळापासून तर बाजारातील भाजीपाला पर्यंत अनेक वस्तू आहेत, शाळेतील विद्यार्थ्यांची भरलेले पाने, बुकातील खराब पाने, प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या, पेन अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या फेकण्यात जातात. पण, त्या आपण परत कशा प्रकारे वापरू शकतो यावर आपल्या मराठी भाषेतून Micro Niche ब्लॉग बनवू शकतो.

    16. Shoping Blog : हिवाळा, पावसाळा व उंन्हाळा या सारख्या ऋतू येत व जात असतात. बहुतेक जणांना चांगले स्वेटर, छत्र्या, रेनकोट याप्रमाणे कॉम्पुटर, मोबाईल फोन घ्यायचा असतो तेव्हा आपण एक ब्लॉग बनवून त्यामधे चांगल्या चांगल्या. निवडक वस्तू व स्वस्त वस्तू यांची लिस्ट आपल्या ब्लॉगवर देऊ शकता. अशा ब्लॉगची जाहिरात आणि Affiliate Marketting मध्ये सुधा फार कमविण्याची संधी निर्माण होऊ शकते. एक ऑनलाईन शॉपिंग साईट सारखे तुमचे ब्लॉगचे नाव होऊ शकते. Marathi Blogging मधे फार कमी प्रमाणात अशे ब्लॉग्ज उपलब्ध आहेत.

    17. औषधी वनस्पती Blog : Health Care ची समस्या तर माणूस पृथ्वी तलावावर असेपर्यंत आहे. आजच्या काळात तर आणखीनच वाढताना दिसत आहे. पूर्वीचा आजीचा बटवा तर गहाळ होण्याच्या मार्गावर आहे. आपण आपल्या ब्लॉगिंग लेखनातून ह्या विषयावर लेखन करून ब्लॉगिंग करू शकतो. बरेच केसांची, दातांची निगा त्यांची स्वच्छता व अनेक आजार यावर घरगुती आयुर्वेदिक पद्धतीने उपाय काय आहेत हे शोधत असतात त्यांना ही समस्या सोडवण्यास तुमच्या ब्लॉग ची मदत होऊ शकते.

    18. रानभाज्या ब्लॉग : मित्रांनो ह्या विषयावर ब्लॉग हा अजून तरी marathi Blog फारसे दिसत नाहीत. आपल्या देशातील बहुतेक जण गावखेड्यात राहतात आणि आपल्याला माहीतच आहे गावात अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. ह्या रानभाज्या कोणकोणत्या आहेत, त्या कोठे मिळतात व त्यांचे उपयोग ह्या वर खूप काही सांगणारा ब्लॉग आपण नक्कीच बनवू शकता. आणि शहरातील लोकांना तुम्ही तुमच्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून भाज्या सुधा विकू शकतात.


    19. विविध खेळाविषयी ब्लॉग : क्रिकेट, फुटबॉल या सारख्या खेळाविषयी जवळपास सर्वच लोकं जाणतात. पण कधी लगोरी, विटीदांडू, धरपकड हे असे खेळ आहेत जे आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावात असे भरपूर स्थानिक पातळीवरील खेळ आहेत जे आपण आपल्या लेखणीतून जगासमोर आणू शकतो. ही भन्नाट कल्पना करणारे कदाचित तुम्ही पाहिले Marathi Blogger होऊ शकता.

    20. Online पैसे कसे कमवायचे ह्यावर ब्लॉग : आता हा विषय सर्वांच्या आवडीचा, पण ऑनलाईन पैसे कसे कमवायचे यावर सांगताना ते आपल्याला सर्वात प्रथम कमविता आले पाहिजे तेव्हाच आपण सांगू शकतो. तरीही काही जण स्वतः काही कारणांस्तव नाही करू शकत असले तरी ते मात्र दुसऱ्यांना आपल्याकडील काही idea's दुसऱ्या लोकांना आपल्या ब्लॉग मधून शेअर करू शकतात जेणेकरून दुसरे तरी थोडेफार पैसे कमवू शकले पाहिजे मग त्या गृहिणी अथवा बेरोजगार युवक यांना थोडीफार मदत होईल.

    मित्र आणि मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण २० अशा Marathi Blogging मधल्या काही Micro Niche Blog Idea पाहिल्या आशा आहे तुम्हाला त्यातल्या काही आवडल्या असतील आणि त्यावर काम करणे हे तुम्ही ठरवले असाल तर आम्हाला काहीही नको. फक्त ही माहिती गरजवंत लोकांना शेअर करा.







    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या