आरमोरी तालुका ( जिल्हा - गडचिरोली ) ; Armori Taluka, Dist. Gadchiroli
आरमोरी :
वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर आणि गडचिरोली जिल्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. आरोमोरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी शी जोडले गेले आहे. आरमोरी 20.46°N 79.98°E वर स्थित आहे.
त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची 199 मीटर (676 फूट) आहे. आरमोरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग म्हणून वडसा ( देसाईगंज ) या उपविभागातील एक तालुका आहे. आरमोरी हा गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात येतो.
शैक्षणिक केंद्र
आरमोरी तालुका गडचिरोली जिल्यातील शिक्षणाचे माहेरघर आणि शैक्षणिक केंद्र म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यात अनेक शैक्षणिक संस्थांनी आपला योगदान देऊन शिक्षणाच्या बाबतील आरमोरीस अग्रेसर केले आहे.
ऐतिहासिक स्थळांचा वारसा
आरमोरी तालुका हा अनेक ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. गडचिरोली जिल्यातील प्रसिद्ध विराट राजांचा किल्ला म्हणून विशेष ओळख असलेले " वैरागड " हे ठिकाण आरमोरी तालुक्यातीलच आहे. वैरागड या ठिकाणी किल्यासोबतच अनेक मंदिरे आहेत. गोरजाई माता मंदिर, खोब्रागडी नदीच्या तीरावर असलेले भंडारेश्वर मंदिर, निजाम टेकडी असे अनेक ठिकाणे वैरागड येथे आहेत.
सोबतच सती व खोब्रागडी नदीचा संगम या ठिकाणी आहे. आरमोरी शहराच्या ठिकाणी असलेले "रामसागर" तलाव खूपच प्रेक्षणीय आहे. स्थानिक लोकांचे नवसाचे आराध्य ठिकाण " अर्जुन देव " आरमोरीहुन जवळच ठाणेगाव येथे आहे. आरमोरी शहरामधेच हेमाडपंथी मंदिर आहेत. शहराच्या पश्चिमेस " डोंगरी " नावाचे ठिकाण असून ते शिवनी मार्गावर आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
शिवनी जवळच काही अंतरावर त्रिवेणी संगम असून त्या ठिकाणी गाढवी व खोब्रागडी या नद्या वैनगंगा नदीस येऊन मिळतात. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा आंतरजिल्हा नदीवरील पूल हा खोब्रागडी नदीवर असून तो गडचिरोली - आरमोरी मार्गावर आहे.
पिके :
आरोमोरी तालुक्यात तांदूळ पीक मुख्य पीक असून काही ठिकाणी तांदळाचे दुबार पीक घेतले जाते. याप्रमाणे ऊस सुद्धा काही भागात लावले जाते. जिल्ह्यात अनेक लहान मोठे तलाव व बोड्या आहेत त्यामुळे मासेमारी हि ग्रामीण भागात चालणारा व्यवसाय आहे. मासेमारी सोबतच जिल्यात शिंगाळे उत्पादनासाठी आरमोरी हा तालुका प्रसिद्ध आहे.
सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी हा तालुका संस्कृतिकदृष्या महत्वाचा केंद्र आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात " विशेषतः विदर्भात आरमोरी शहर दुर्गा उत्सवाकरिता खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी दुर्गाउत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. अनेक प्रकारच्या कलाकृतीने शहर दुमदुमले असते. आणि लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दरवर्षी येतात.
गडचिरोली पोलिसांचे फायरबट प्रशिक्षण केंद्र हे आरमोरी तालुक्यातील किटाळी - डोंगरसावंगी या भागात आहे. शिवाय किटाळीपासून जवळच असलेल्या दगडी पहाडीवर गडचिरोली पोलिसांचे साहस प्रशिक्षण केंद्र सुद्धा होत आहे.
खनिज संपन्न :
गडचिरोली जिल्यातील लोहखनिज साठ्यात अग्रेसर नाव असलेले ठिकाण म्हणजे देऊळगाव हे आहे जे आरमोरी तालुक्यातील आहे. गडचिरोली आरमोरी महार्गावर जात असताना तुम्हाला अनेक डोंगर व पहाड दिसतील आणि पाहूनच लोहखनिज असल्याची अनुभूति येईल. त्यांना " कांडेसर " डोंगर म्हणून ओळखले जाते. याच भागात लोहखनिज साठे आहेत.
तालुक्यातील काही विशेष :
तालूका मुख्यालयापासून साधारणतः ७ ते ८ किमी अंतरावर ठाणेगाव हे ठिकाण ( गाव ) आहे. जेथे हड्डी ( अस्थिभंग) उपचार प्रसिद्ध आहेत. दमा यावर कोकडी गावात औषध दिले जाते. डोंगरगाव या देऊळगाव या गावालगत पहाडावर राम मंदिर आहे. जे पहाडाच्या शीर्ष भागावर आहे येथील वरच्या भागावरून आरमोरी शहर व भोवतीचा भाग satellite ने पाहिल्यासारखे वाटते.
आरमोरी तालुक्यातील सिरशी गावालगत मधमाशी पालन केंद्र आहे. तसेच आरमोरी तालुका हा " कोसा " उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आरमोरी शहरापासून १५ किमी अंतरावर रेल्वे वडसा स्टेशन आहे.
आरमोरी तालुका दृष्टीक्षेपात :
⇒ तालूका मुख्यालय - आरमोरी
⇒ जिल्हा - गडचिरोली
⇒ भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी
⇒ पिन कोड - ४४१२०८
⇒ लोकसंख्या ( २०११ जनगणनेनुसार ) - १९,०००
⇒ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या - खोब्रागडी, सती, वेलोचना, गाढवी
⇒ तालुक्याच्या सीमा - पूर्वेस - कुरखेडा
पश्चिमेस - वैगंगा नदी व ब्रम्हपुरी ( चंद्रपूर) तालुक्याची सीमा
उत्तरेस - वडसा ( देसाईगंज ) तालुका
दक्षिणेस - गडचिरोली तालुका
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box