वैरागड - ऐतिहासिक किल्ले असलेले गडचिरोली जिल्ह्यातील गाव ; Vairagad Fort
![]() |
vairagad fort |
विराट राजांचा किल्ला हा गावाच्या मध्यभागी असून त्या समोरच सद्याचे ग्राम पंचायत कार्यालय बनलेले आहे. किल्ल्याभोवती किल्याच्या रक्षणासाठी खोल खाई खोदली असून सभोवती तटरक्षक भिंत आहे. साधारणतः २० ते ३० फूट तटरक्षक भिंती आहेत. किल्याचा प्रवेशद्वार आजही शाबूत असून काही वास्तुशिल्प काळाच्या ओघाने पडक्या अवस्थेत आहेत. प्रवेशद्वारा जवळ बुर्ज आहेत.
किल्याच्या आतील भागात अनेक वास्तुशिल्प आहेत. प्रवेशद्वारापासून जवळच विहिरीप्रमाणे जमिनीच्या आत पायऱ्या बनवून उतरण्यासाठी वास्तू बनविली आहेत. त्यातून भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते.
किल्ल्यामध्ये अनेक गोलाकार विहिरी आहेत. वैरावन नावाच्या राजाचे राज्य या ठिकाणी प्राचीन काळात होते. त्यांच्या नावावरून " वैरागड " हे नाव पडले. या ठिकाणी हिऱ्यांच्या खाणी होत्या असेही काही स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.
टिपागड ( गडचिरोली) महाराष्ट्रातील पहाडावर तलाव असलेले ठिकाण - वाचा
९ व्या शतकामध्ये नागवंशीय माना जमातीच्या पुरमशाहा राजाने वैरागडवर राज्य केले ( ई. स. १८६१ चांदा सेटलमेंट रेकॉर्ड ). नागवंशीयांचा या प्रदेशावर इ.स. १९५० पर्यंत अधिपत्य होता. वैरागड किल्ला हा प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा १९५८ अंतर्गत ' राष्ट्रीय महत्वाचे स्मारक ' म्हणून घोषित आहे.
( सुधारणा आणि वैधता ) कायदा २०१० चे कलम २० (अ ) आणि ( ब) च्या नुसार या किल्याच्या सीमेपासून १०० मीटर आणि त्या पलीकडे २०० मीटर पर्यंतच्या क्षेत्रात खोदकाम व बांधकाम करण्यासाठी प्रतिबंध आहे. किल्ल्याची डागडुजी कार्य सुरु असून जिल्ह्याच्या सौन्दर्यात योगदान देत आहे.
किल्यात आजही अनेक प्रकारच्या फुलपाखरांची, बेडूक व सरडे यांची वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतील व इतिहासात जगण्याची प्रचिती व अनुभूती यातून आपल्याला घेता येईल. या व्यतिरिक्त तुम्ही वैरागड येथे भेट देऊ इच्छित असाल तर खूप प्रेक्षणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारे ठिकाणे आहेत. गावाच्या पूर्व दिशेस सती व खोब्रागडी नदीचे संगम आहे.
जवळच गोरजाई माता मंदिर आहे ते हेमाडपंथी प्रकारचे आहे. खोब्रागडी नदी तीरावर असलेले भंडारेश्वर हे प्राचीन ठिकाण असून या मंदिराची स्थापना माना वंशीय राजा कुरुमप्रमोद यांनी केली. वैरागड च्या उत्तरेस ईदगाह सुद्धा आहे. वैरागडपासून १ किमी अंतरावर पांडव देवालय आहे.
माहिती आवडल्यास शेअर करा.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box