Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

YouTube वर व्हिडिओ Upload करता ? या गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष द्या.

YouTube वर व्हिडिओ Upload करता ? या गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष द्या.




मित्रांनो जसे की, आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीतच असेल की, जगातील अनेक कोपऱ्यातून YouTube वर व्हिडिओ Upload रोज होत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असतांना सुध्दा आपण पाहतो आहोत. ही संख्या का वाढते आहे कारण, व्हिडिओ पाहनाऱ्या लोकांची संख्या सुध्दा वाढते आहे. 

आपल्यापैकी बहुतेक जनांनी काही ठराविक व विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी YouTube वर शोधल्यास त्या माहितीवर कमी किंवा त्या माहितीवर विडिओच उपलब्ध नसतील असे झाले आहे का? अर्थातच झाले असेल म्हणूनच काही जणांना याविषयी आपणच YouTube वर माहिती टाकावी ही कल्पना आलीच असेल, काही जणांना तर YouTube ला व्हिडिओज Upload करून त्यामधून काहीतरी रेव्हेन्यू मिळवावा असेही वाटत असेल पण चेहरा दाखवून बोलणे हे टाळायचे असेल किंवा चेहरा न दाखवता व्हिडिओ कसे Upload करता येतील आणि त्यातूनही रेव्हेन्यू मिळू शकतो का? अशी अनेक प्रश्न निर्माण होत असतील. या सर्व प्रश्नांची मी या ठिकाणी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

समजा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी YouTube चॅनेल बनवून व्हिडिओ टाकण्याचा विचारही केला असेल पण चेहरा दाखविणे त्यांना अयोग्य वाटत असेल आणि त्यांचा मनात विचार होत असेल की, आपण चेहरा न दाखवता ही व्हिडिओ बनवू शकतो का? तर उत्तर आहे होय. 

आपण YouTube वर असे अनेक माहिती पाहतच असतो की, ज्यामधे एखाद्या व्यक्तीकडून Facts बद्दल माहिती सांगितली जाते. सांगणारा व्यक्ती कोण हे आपण विसरूनच जातो आपण फक्त त्या माहितीकडे लक्ष देतो. पण तुम्हाला माहिती आहे काय? की तो व्यक्ती चेहरा न दाखवता त्याच Facts व्हिडिओ कितीतरी पैसे कमवित किंवा कमविल असेल.

मित्रांनो, Facts व्हिडिओज प्रकारे अनेक असे Ideas आहेत ज्या पद्धतीने आपण चेहरा किंवा आपण कॅमेरासमोर न येताही व्हिडिओ बनवू शकतो. त्यामधे स्त्रिया, मुली किंवा मुले जरी स्वयंपाकात आवड असेल अनेक वेळा ते नवनवीन पदार्थ बनवीत असतात. अशा वेळी त्यांना जर Cooking मधे आवड असेल किंवा ते पारंगत असतील तेव्हा तोच Cooking चा व्हिडिओ रेकॉर्ड करून सुध्दा YouTube वर टाकु शकता. 

आपण आपला चेहरा किंवा कॅमेरासमोर न येता कशा प्रकारे व्हिडिओ बनवून YouTube वर टाकु शकतो या विषयी पुढे जाऊन आपण सविस्तर माहिती पाहू. आता आपण चर्चा करतोय की, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला YouTube व्हिडिओ बनविताना सर्वाधिक महत्वाच्या आहेत. चला तर पाहूया.


व्हिडिओ बनविताना आपण सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असते ती आपल्या आवाजाकडे. मित्रांनो मी YouTube Channel वर अनेक व्हिडिओ टाकले आहेत. त्यामुळे मला माझ्या Subscriber कडून आलेल्या प्रतिक्रियामधे सर्वात प्रथम एकाच गोष्टीबद्दल वारंवार सल्ला दिला जायचा तो आवजाबद्दल. मुळात माझा आवाज आधीच कमी आणि मोठ्याने बोलायची सवय नाहीच त्यामुळे विडिओतील आवाज प्रेक्षकांना आजिबात कळत नव्हता पर्यायी व्हिडिओ त्यांना मधूनच सोडावे लागत होते. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवितांना दिसता कसे यापेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही काय बोलता आणि ये व्यवस्थितपणे लोकांना पोहचते का हे जास्त महत्वाचे आहे.  कधी कधी आपण अशा ठिकाणी व्हिडिओ बनवितो की, आजुबाजूस खूप गोंगाट किंवा इतर कोणताही आवाज होत असतो मग हे आपण टाळू तर शकत नाही. अशा वेळेस एक तर आपणास तो गोंगाट थांबेपर्यंत वाटच पाहत रहावी लागेल. यात तुमचा वेळ अकारण व्यर्थ जाईल. मग अशा वेळेस काय कराल. त्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यापैकी मी काही उपाय याठिकाणी सांगतो आहे.

➡️ आवाज रेकॉर्ड करण्यासाठी Mic म्हणून तुमचे Headphones सुध्दा वापरू शकता. 

➡️ मोबाईल ने आवाज रेकॉर्ड केलेला असेल आणि त्यात अनेक प्रकारचा अनावश्यक आवाज येत असेल अशा वेळेस आपल्याला Play Store वर असे काही Application उपलब्ध आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण त्या आवाजातील अनावश्यक आवाज कमी करू शकतो त्यामधे Lexis Audio Editor सारखे Application उपलब्ध आहेत.

➡️ तुम्ही Mic चा वापर करून आपल्या आवाज रेकॉर्ड करून दमदार व्हिडिओ बनवू शकता. काही वेळेस त्या Mic मध्येच बाहेरील गोंगाट आपोआप Reduce केला जातो. आणि ते सहज उपलब्ध सुध्दा आहेत. अनेक YouTube वर व्हिडिओ बनविणारे मंडळी ही Boya By M1 हा Mic वापरत आहेत. तुम्ही सुद्धा तो वापरू शकता. 

Boya Mic साठी Click करा


मित्रांनो व्हिडिओज बनविताना आणखी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कशा प्रकारे आपण बनवू शकतो याविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात  पाहू. तुम्ही लवकर Subscribe करुन घ्या.

धन्यवाद!






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या