Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

टीपागड, गडचिरोली ; पहाडावर तलाव असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण

गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या पूर्वेस साधारनतः ९० की अंतरावर छत्तीसगड राज्याच्या सीमेच्या जवळ गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या तालुक्यात टीपागड हे ठिकाण आहे. येथील जंगल अतिशय निसरगरम्य व घनदाट आहे. जंगलासोबतच दगडांनी तयार झालेल्या पर्वत रांगा आहेत. जवळच दक्षिण दिशेला ३५ किमी अंतरावर झडापापडा नावाची गुफा आहे. टीपागडच्या पहाडावर गोंडकालीन किल्ला असून तो समुद्रसपाीपासून साधारणतः २ हजार फूट उंचीवर आहे. या किल्याच्या भिंती संपूर्णतः दगडांनी बनविलेल्या आहेत. या किल्यावर राजा पुरमशहा यांचे राज्य होते. त्यांनी छत्तीसगड राज्याच्या काही भागास जिंकून आपला प्रदेश स्थापित केला होता.
Satellite image : Tipagad Lake
समुद्रसपाटीपासून जसेजसे आपण वर जातो पाण्याची पातळी साधारणता कमी होत जाते. पण हा ठीकणाचे वैशिष्टय म्हणजे आपण जेव्हा टीपागड पर्वतावर चढतो तेव्हा असे निदर्शनास येईल की, चक्क पर्वतावर तलाव आहे आणि भरगच्च पाणी त्याठिकाणी पहावयास मिळेल. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हा एक ठिकाण म्हणता येईल की, ज्याठिकाणी पर्वतावर तलाव आहे. या तीपागड किल्याची विशेषतः म्हणजे किल्ला हा पहाडावर असून याच तीपगडच्या पहावर सुंदर नैसर्गिक तलाव वसलेले आहे. इतक्या उंच ठिकाणी पर्वतावर तलाव असूनही त्या तलावात नेहमी पाणी आपल्यास पहावयास मिळते. ही एक कमालीची आणि या ठिकाणाबद्दल कुतूहल वाढविणारी बाब आहे. तलाव सदैव भरलेले तर असतेच शिवाय या तलावाच्या खोलीचा अंत नसावा अशी एकंदरीत कल्पना वाटते. तलावाच्या पश्चिम दिशेस झऱ्याच्या रूपाने पाणी वाहत असते त्यास तिपागड नदी असे संबोधित केले जाते. पहाडावर दक्षिण दिशेला छोटेखानी किल्ला आहे.

➡️ टीपागडचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टीपागड पहाडीची निर्मिती ही प्राचीन काळी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली त्यामुळे याठिकाणी अग्निजन्य बेसॉल्ट व ग्रॅनाईट दगड पाहायला मिळतील. तलावाच्या बाजूला असलेल्या सुरुंगातून आपण एका मठाकडे निघतो त्यात एक सभामंडपही आपणास पहावयास मिळेल. 
टीपागड पर्वतावर वरच्या बाजूस चढतांना आपल्याला अनेक झुडपी व दगडी मार्गातून मार्गक्रमण करावे लागते. काही वेळेस एकदम अरुंद रस्ता दिसेल फक्त एकच व्यक्ती व्यवस्थित चढू शकतो आणि बहुतेक दा चढण्यास तुम्हाला मशागत सुध्धा करावी लागते पण जेव्हा आपण पर्वतावर जाऊ तेव्हा चढतांना केलेली मशागत आणि आलेला थकवा पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल कारण, वरील निसर्ग आणि दृश्यच तशा प्रकारचे आहेत. वरून आपण चौफेर नजर फेरली असता आपल्याला आजुबाजूस अनेक डोंगररांगा आणि त्या पर्वतावर असलेले जंगल पाहून तुम्ही एकदमच थक्क व्हाल यात काही शंकाच नाही. पर्वत व तलाव या प्रमाणेच या ठिकाणी फुलपाखरांच्या अनेक प्रजाती पहावयास मिळतात. अनेक प्रकारच्या जिवांची या ठिकाणी वास्तवता आजही टिकून आहे. या ठिकाणी एकदा तरी भेट देऊन आपला आनंद द्विगुणित होईल.


केव्हा जाल ?

पावसाळा या ऋतूमध्ये तलाव तुडुंब भरून असतो व पावसाचे पाणी पर्वतावरून वाहत असते त्यामुळे पावसाळ्यात जाणे टाळले जाते आणि वनस्पती सुद्धा खूप घनदाट असल्याने तुम्हाला त्यातही चढण्यास अडथळे येतात. म्हणून हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये तलाव पाहण्यास जाणे योग्य राहील. त्यातही हिवाळ्यात या ठिकाणी सकाळी जे धुके दिसतात आणि त्याच धुक्यातून डोकावून पाहणारे पर्वरांगांमध्ये आपण पूर्णपणे हरवून जातो.

कसे जायचे ? 

गडचिरोली मुख्यालयापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. 

गडचिरोली - चातगाव - धानोरा - येरकड - कोसमी - मरकेगाव - न्याहाकल 
किंवा
गडचिरोली - आरमोरी - कुरखेडा व आरमोरी - वैरागड - मनापुर मार्गे सुध्दा जाता येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या