Gadchiroli Jilha ; गडचिरोली जिल्हा - सांस्कृतिक
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा अनेक गोष्टींनी आज आपली ख्याती देशभर व जगभर पसरवत आहे. गडचिरोली जिल्ह्याबद्दल अनेकांना जाणून घेण्याबद्दल उत्सुकता आहे. या जिल्याची विविध प्रकारची सांस्कृतिक वैशिष्ट आहेत जी आज मी तुमच्याशी वाटणार आहे. जी तुम्हाला नक्कीच नाविन्यपूर्ण वाटतील आणि आवडतील सुद्धा.
निसर्गसंप्पन जिल्हा
गडचिरोली जिल्हा हा सर्वात आधी जंगलांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जवळपास ७५ टक्के वनक्षेत्राच्या अधीन असलेला हा जिल्हा आहे. अर्थातच जंगल व दुर्गम भाग असणे साहजिकच आहे त्यामुळेच अनेक गावे व वस्त्या अशा जंगलात आजही वास्तव्यास आहेत आणि हे खूपच अप्रतिम आहे.
त्यातही अनेक नदी व लहान लहान नाले आहेत. वैनगंगा हि बारमाही नदी असून कठाणी , गाढवी, पोटफोडी या सारख्या आणखी हंगामी वाहणाऱ्या नद्या आहेत. जंगल अधिक प्रमाणात असल्याने त्यातल्या त्यात पूर्व भागात घनदाट जंगल आहे. त्यामुळे त्या भागात जंगल व त्यावर चालणारे व्यवसाय किंवा त्याचा योग्य वापरही त्या भागात केला जातो जसे, इंधन म्हणून ज्याला सरपण म्हणतो ते दैनंदिन जीवनात स्वयंपाकासाठी वापरले जाते. पण इंधन म्हणून जंगलांची अतोनात तोड केली जात नाही.
फक्त उन्हाळ्यात कुजून मोडलेल्या काळ्या, वाऱ्याने तुटलेल्या फांद्या ह्या येथील लोक जमा करतात. जिल्यात अनेकांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांच्यापासून सुद्धा शेन्यांच्या स्वरूपात इंधन उपलब्ध होत असतोच. जिल्यात अनेक प्रकारची नद्या,लहान लहान तलाव व बोड्या असल्याने मासेमारी हा व्यवसायही स्थानिक ढिवर व इतर समाजाच्या बांधवांकडून केले जाते. सिरोंचा कडील भागातील मासेमारी व झिंगे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्द आहेत.
मुंबई व गोवा येथील अनेक प्रसिद्ध हॉटेल मध्ये येथील झिंगे निर्यात केले जातात. भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्यातही अशाच प्रकारची सण वेगवेगळ्य्या प्रकारे साजरे केले जातात. गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्याच्या ठिकाणी दसरा हा सण मोठ्या उत्साहात व साजरा केला जातो. संपूर्ण गडचिरोली जिल्यात महादेवाची सर्वात जास्त मंदिरे आहेत आणि महाशिवरात्री हि संपूर्ण जिल्ह्याभर साजरी केली जाते.
महाशिवरात्री ला मार्कंडा या ठिकणी जे चामोर्शी या तालुक्यात व चामोर्शी जवळच पश्चिमेस ८, १० किमी अनंतरावर आहे त्या ठिकाणी १० दिवसाची मोठी शिवयात्रा भरते आणि हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भाची कशी म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेस लाखो च्या संख्येत भाविक दरवर्षी मार्कंडा या ठिकाणी भाविक येत असतात. जिल्यात तेंदू संकलन हाही व्यवसाय चालतो. बहुतेक भाग वनाच्छादित असल्याने वनातील फळे व अनेक प्रकारची फुले व भाज्या मुबलक प्रमाणात आहेत. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सुद्धा आहेत.
जिल्यात असणाऱ्या अनेक वनस्पती विषयी आपण एखाद्या पोस्ट मध्ये माहिती पाहू.
गडचिरोली जिल्हा इतिहास व निर्मिती
पारंपरिकता आजही टिकून आहे
आजच्या युगात आपण पाहतो आहोत कि, जीवन हे धकाधकीचे व खूपच व्यस्त बनत चालले आहे. हि चढाओढ म्हणजे आपल्या प्रगती आणि उदरनिर्वाहासाठी अर्थातच करावीच लागते. दैनंदिन खानपानातही बदल झालेले आपण पाहतो आहोत फेस्ट फूड, जेवणात आणेल प्रकारचे प्रोसेसिंग केलेले पदार्थ वापरत अहोत.
आणेल भागातील जंगल व वनस्पती नष्ट झाल्याने जंगली फळभाज्या ज्या आधी लहानपणी खुप खायला मिळायच्या त्या आज गहाळ झाल्या आहेत. पण याला कोठेतरी मात देत गडचिरोली जिल्ह्यातील लोक संथगतीने आपली प्रगती साधत आपली पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. जिल्यात जंगली भाज्यांमध्ये काटवल, कुळ्याची फुले, तोंडरी, काळूभाजी यासारखी असंख्य औषधी भाज्या आहेत ज्या स्वादिष्ट तर आहेतच सोबतच शरीरास पोषकही आहेत म्हणूच या भागातील जनतेचे जीवनमान आरोग्याच्या बाबतील खुप संतुलित आहेत.
आपण जर या सारख्या भाज्यांचा आस्वाद घेऊ इच्छित असाल तर नक्कीच या जिल्यात भेट घेऊ शकता वर्षभर तुम्हाला या कोठेहि कानाकोपऱ्यात उपलब्ध असतील किंवा माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. भाज्यांसोबत अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सुद्धा उपलब्ध आहेत. अनेक रोगांवर आजही पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. ताप असो कि, कावीळ सारखे त्रासदायक रोग यावर सुद्धा अनेक ठिकाणी उपचार केले जातात. वडसा तालुक्यातील कोकडी या ठिकाणी दमा यावर औषध दिले जाते. ते औषध घेण्यास गडचिरोली जिल्यातिलच नाही तर राज्यातील अनेक जिल्यातून जनता येत असते.
दिवाळी, दशहरा, पोळा यासारखे अनेक सण जिल्ह्यात साजरे केले जातात. दिवाळीला निव्वळ फटाके फोडून साजरे करण्यापेक्षा अधिक उत्साहाने कशी साजरी करावी हे जिल्यातील ग्रामीण भागातून स्पष्ट होते. दिवाळीला प्राण्यांची पूजा केली जाते. आपल्या घरांना रंगरंगोटी सोबतच आंब्याच्या पानांनी, झेंडू फुलांनी अगदीच सुशोभित सजविले जाते. अंगणात शेण सडा , सारवन केले जाते. अनेक भागात युवक त्या दिवशी जल्लोषात कुस्त्या वैगेरेचे खेळ आयोजित करत असतात.
पोळा सणाला शेतकऱ्याचा व अर्थातच आपल्यासाठी राबणारा बैल या प्राण्याची पूजा केली जाते. व गावात प्रत्येकाच्या घरी त्यास खाऊ घातले जाते. लहान लहान मुले उत्साहाने भोजारा मागतात. ( भोजारा - घरोघरी जाऊन आपल्या खाऊसाठी किंवा वस्तू किंवा पैशाच्या स्वरूपात काहीतरी भेट मागणे ).
दिवाळीस एक महत्वाचे म्हणजे सुरुंद या जंगली कंदमुळांची भाजी सर्वत्र बनविली जाते. ग्रामीण भागात पळस या वन्पस्पतीच्या पानांची पत्रावळ व द्रोण बनवून त्यात जेवण करावयास दिले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात अंबाडी या झाडाचे फुलं वाळवून त्यापासून बनविलेले आंबाळीचे शरबत खरच अप्रतिम आहे. त्यापासून उन्हाळी होण्यास संरक्षण मिळते.
आंबील, शिंदी व ताडी
गडचिरोली जिल्ह्यात आंबील हा दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग असलेला पेय पदार्थ आहे. ग्रामीण भाग जवळपास प्रत्येकाच्या घरी आंबील बनविली जाते. सोबतच शहरी भागातही काही प्रमाणात आंबील बनविली जाते.
आंबील साधारणतः मार्च महिन्यापसून बनविली जाते आणि उन्हाळ्यात हि फारशी बनविली जाते. आंबील हि तांदूळ, ज्वारी, गहू अशा प्रकारच्या धान्याच्या पिठापासून बनविली जाते. काही भागात कोसरी ची आंबील सुध्दा बनविली जाते. आंबिली सोबत कच्या कैरांची चटणी, लाल मिरच्यांचा ठेचा बनविला जातो.
जंगल भाग असल्याने, जंगलात ताडाचे झाडे सुध्दा आढळतात काही ठिकाणी तर या झाडांना पाहून कोकणात गेल्याची अनुभूती येते. या झाडापासून ताडी हा पेय पदार्थ काढला जातो.तसेच शिंदीच्या झाडापासून शिंदी काढली जाते.
अमराई, मोहरान
गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक गावात एक आमराई म्हणा किंवा मोहरान असतोच. या ठिकाणी आंब्यांची व मोह यांची एकाच जागी खूप जास्त झाडे असतात. अशा प्रकारे अनेक ठिकाणी वने राखून ठेवण्यात आलेले आहेत.
त्यामुळे गावात वातावरण संतुलित व समृद्ध करण्यास आजही मदत होत आहे. मोहाच्या झाडापासून दोन प्रकारचे फळ मिळतात. ज्यामधे एक मोह आणि दुसरे आमच्या इकडे त्याला टोऱ्या म्हणतो अशा प्रकारच्या दोन फळे देणारा हा वृक्ष आहे.
मोहफुलापासून पनोऱ्या सारखे पदार्थ बनविले जातात आणि त्यापासून आज सुंदर लाडू बनविले जात आहेत जे Amazon वर सुद्धा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी यापासून मद्य सुद्धा बनविले जाते जे आरोग्यास हानिकारक आहे असो, इथल्या जंगलात टेंभुर, काटबोर, वेरोण्या, शिंदोळे, जांभूळ, आवळा, बेहडा, बिबा यासारखे असंख्य फळे खायला मिळतील. बिब्याला खण्यासोबतच जखमेवर लावण्यास उपयोगात आणले जाते.
कंदमुळे
पूर्वीपासूनच आम्हाला अनेक प्रकारचे कंद खाण्यास मिळाले त्यामुळे ते दिवस आजही आठवतात. एखादी आजी अशा प्रकारचे कंद विक्रीस आणते त्यावेळेस आम्ही आवडीने घेऊन खातो.
त्यामधे ज्या भागात तलाव अथवा बोड्या आहेत व मुबलक पाणीसाठा असतो त्या ठिकाणी कांदे यांचे उत्पन्न होते. लहानपणी मृग नक्षत्र लागण्याआधी तलावाच्या काठावर निघणारे कचरकांदे खणून खाल्लेले दिवस आजही आठवतात.
अशा अनेक वनस्पती आजही टिकून आहेत आणि त्यांच्या कंद मुळापासून वेगवेगळ्या रोगांवर गुणकारी औषधे बनवली जातात.
दंडार व नाटक
गडचिरोली जिल्ह्यात मंडई आणि अनेक देवस्थाने आहेत त्यात यात्रा भरविली जाते त्यानिमित्याने किंवा मनोरंजन म्हणून प्रत्येक गावात आजही दंडार व नाटकांचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन आजकाल खूप कमी प्रमाण झालेले दिसून येत आहे पण नाटक मात्र आजही खूप प्रमाणात होत असतात त्याद्वारे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील अभिनयाची आवड असलेल्यांना एक व्यासपीठ उपलबध झालेले आहे.
जिल्यातील नाटकामध्ये स्थानिक कलाकारसोबत मराठी चित्रपट श्रुष्टीतील अनेक कलावंत सुद्धा आज भाग घेत आहेत. गडचिरोली जिल्यातील वडसा हे शहर कलावंताचे वसाहतीचे प्रमुख केंद्र असून यास " कलावंताची वसाहत " असे म्हंटले जाते. कुरखेडा तालुक्यातील गुरुणोली या गावास कलावंताची भूमी म्हणून ओळखले जाते.
आणखी बरीच माहिती गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृती व परंपरा विषयी समोरच्या लेखात आपण पाहणार आहोत. पेज ला Follow करून घ्या.
मित्रांनो माहिती आवडल्यास शेअर करा.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box