गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली पोलीस शिपाई भरती अद्यापही झालेली नाही. नुकताच गृह विभागाने आदेश जारी करत पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे वृत्त येताच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना दिलासा व त्यांच्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातील ४१६ रिक्त पदेे तातडीने भरण्याचे गृह विभागाने आदेश जारी केले आहे.
शासन निर्णय : पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दी.३१.१२.२०२० अखेरपर्यंत रिक्त असलेली ३११ पदे ( १५० पोलीस शिपाई व १६१ पोलीस शिपाई चालक ) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान ) यांच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयातून वगळण्यात येत असून सादर पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया टी सी एस , आय बी पी एस , एम के सी एल यांचे मार्फत न राबविता थेट पोलीस घटक स्तरावरून राबविण्यात विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे आणि हि मान्यता फक्त २०१९ च्या पदभरतीकरीता राहणार आहे.
शासन निर्णय संकेतस्थळ : Click Here
अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक दिलासा निर्माण झालेला असून सदर हि भरती प्रक्रिया तात्काळ राबविले जाणार असल्याचे निदर्शनात येत आहे. दरम्यान हि भरती प्रक्रिया जिल्हा पोलीस विभागामार्फत राबिविली जाणार आहे. पोलीस भरती देणाऱ्या युवकांनी अनेक वर्षांपासून पोलीस भरती न झाल्याचे प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाकडे हा मुद्दा मांडून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान हि भरती प्रक्रिया आता सुरु करण्याला मंजुरी दिली असून शासन आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून गडचिरोली जिल्यातील तरुणांना पोलिस शिपाई बनण्याची संधी लवकरच प्राप्त होणार आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box