जन्मताची मिळे बाळा
निजावया झोपाळा
तैसेचि लाभे
खग - पशुंना
गोठा निवारा.....
खेळतानाशी होई दंग
करी आपुलियांशी जंग
करे जरी कुणी
खेळ मधेच भंग
त्याशी मारूनी अंग
बनी हा बाळ दबंग.....
सैराट होऊन पळता
बहुदा निवा तयाशी लासला
मग कोळसा बी यासी
आगीचा कण भासला.....
लागली जवा तहान
होऊनी हैराण
पळे तुडवीत सडा
वासरूही फोडे हंबरडा.....
ऐकुनी बाळाची हाक
गायही हकनाक
पळत येई नजीक
घ्यावया बाळा जवळीक.....
ऐसेची असती आपली माय
ऐसेची बालपण.....
साई गेडाम ( YouTube Channel gadchirolkar )
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box