Google AdSense चा Approval कसे मिळवायचे ? ; Google Adsense Tips In Marathi , Google Adsense Information In Marathi
Google Adsense म्हणजे काय ?
आपल्यापैकी बहुतेक जण Google Adsense Approval कसे घ्यावे यासाठी खूप प्रयत्न केले असतील किंवा करत असाल.मग ते ब्लॉगर साठी असो कि वर्डप्रेस मध्ये वेबसाईट चालवत असाल. सध्या Google Adsense Approval साठी खूप जण Apply करतांना दिसून येत आहेत व सध्याच्या काळात Online Earning च्या बाबतीत बहुतेक जण Blogging सारख्या क्षेत्रात येऊ पाहत आहेत. त्यासाठी आपल्याला आधी एक Adsense Account Approval करणे आवश्यक असते. त्यासाठी अनेक जण Apply करण्यामुळे सुद्धा Google चे काम वाढलेले असून Lockdown मुले म्हणा किंवा Staff च्या व्यस्त कामामुळे Application check करन्यासाठी जास्त वेळ जात आहे परिणामी Google Adesense Approval साठी आधीपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. Google ने अधिकृतरीत्या २ ते ३ हफ्त्याचा कालावधी लागू शकतो असे नमूद केलेले आहे आणि इतक्या वेळात Google कडून आरामात Reply मिळून जायचा पण, सध्या याहीपेक्षा अधिक काळ आपल्याला वाट पाहावे लागू शकते. आता विचार करा आधीच ब्लॉग बावून लिहून अनेक दिवस, महिने गेलेले असतात. आणि परत काही कारणास्तव तुमचा Application Reject झालं तर ? आपण किती वेळ वाट पहिली होती आणि त्रास झालं ते वेगळेच. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या छोट्याश्या अनुभवावरून Adsense Approval कसे घ्यायचे याबाबत थोडक्यात पण सविस्तर माहिती सांगणार आहे. ज्याला Follow करून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात व लवकरात लवकर Google चे ऍडसेन्स Approval घेऊ शकता.
Google Adsense Approval Basic In Marathi
१. Content ( Unique and No Copyright )
मित्रांनो, google सर्वात जास्त महत्व देतो ते तुमच्या कंटेन्ट ला म्हणजेच तुम्ही ब्लॉग लिहिता ते Article तुमचे स्वतःचे बनविलेले असावे. स्वतः अभ्यासपूर्ण लेख लिहून ते तुम्हाला Publish करायचे आहेत. कोणतेही Copyright मटेरियल किंवा Articles असायला नकोत. कोणाचेही Article जसेच्या तसे Copy न करता आपल्या स्वतःच्या शैलीने लिहावेत. इंटरनेटवरील कोणतेही पोस्ट किंवा फोटोस चे वापर न करता स्वतःकडील माहिती व फोटो तुम्हला वापरायच्या आहेत.
आता तुमचा Content Unique असावा म्हणजेच काय तर, तुम्ही एखाद्या ब्लॉग किंवा पोस्ट पाहून प्रेरित होता व त्याचप्रकारे लिहिण्याचा किंवा Content Create करण्याची प्रेरणा तुमच्यात येते. हि गोष्ट ठीकच आहे. पण नेमके जसेच्या तसे लिहून काढणे किंवा त्यालाच कॉपी करणे हे हितावह अजिबात नाही आणि हे Google च्या Copyright नियमाचे उल्लंघन होईल तेव्हा तुम्ही शक्य तितक्या Unique व स्वतःच्या शैलीच्या असू द्या.
२. Blog niche
Articles किंवा Blog बनवितांना एक नीच ( Theme ) सेट करणे तितकेच आवश्यक आहे. ज्यामध्ये तुमची आवड असेल , थोडीफार माहिती असेल व तुम्ही योग्य प्रकारे व जास्त काळ लिहू शकाल. असे नको व्हायला कि, कोणी फलान्या टॉपिक वर ब्लॉग लिहून खूप पैसे व नाव कामवितोय तर आपणहि तसेच करावे. तुम्ही आपला Path ठरवा. मग ते कोणतेही असो. Google खूप मोठे आहे. आणि तुमच्या नवीन विषयाची तो वाट पाहतोय आणि google ला नवीन नवीन माहिती हवी आहे. जी अजूनपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही.
३. Adsense Approval साठी Domain
Adsense Approval साठी Domain आवश्यकच आहे असे काही नाही हे मी आधी स्पष्ट करूया. पण आपण जर Top Level Domain आपल्या Blog ला add करू जसे, .com , .in यामुळे ब्लॉग चे reach वाढते व लवकरात लवकर Approval मिळण्याची शक्यता वाढते.
4. Resposive Template
तुम्हाला Blogger वर टेम्पलेटस आधीच उपलब्ध असतात. तरी पण तुम्हला एखादे दुसरे टेम्प्लेट्स जे आवडीचे आहे. ते वापरायचे आहे. तर ते Upload करतांना लक्ष्यात घ्यावे कि, ते User Friendly Template असावे. ते लवकरात लवकर Loading व Update व्हायला हवे.
५. Navigation and Pages
मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये About Us, Contact Us आणि Privacy Policy पेज बनविणे आवश्यक आहे. सोबतच Terms and Conditions व Desclaimers हि पेजेस सुद्धा असावीत. समजा हि जरी नसलित तरी about us, contact us आणि privacy policy हि तीन पेजेस बंधनकारकच आहेत असे समजा. आता Navigation म्हणजेच तुमच्या ब्लॉग मधील काही पेजेस आहेत जसे, Home किंवा इतर Menu ला तुम्ही काही Category जोडल्या आहेत त्या पूर्ण कार्यरत असाव्यात. म्हणजेच एखाद्या मेनूवर तुम्ही Option Create केला असेल तेथे काहीतरी असावेच ते खाली ठेवू नये.
6. Ad Code
Google Adsense Apply करतांना दिलेला Ad Code तुम्हाला तुमच्या ब्लॉग च्या थिम HTML मध्ये व्यवस्थित Head च्या ठिकाणी काळजीपूर्वक टाकायचे आहे.
ह्या Basic गोष्टी जरी आपण पाळल्या तर तुमचा Adsense Account लवकरात लवकर Approve होईल आणि तुम्ही पैसे कमवू शकाल. मित्रानो, माहिती आवडली असेल तर एक शेअर नक्कीच करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. त्यासाठी माझ्या Social Account वर Contact करू शकता.
Sai Gedam ( Visit My YouTube Channel Click Here)
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box