झाडीपट्टी रंगभूमी वडसा ( देसाईगंज )
झाडीवूड ( Zadywood )
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज ( वडसा ) हे ठिकाण नाटक कंपनीचे केंद्र स्थान आहे. विदर्भात हे ठिकाण नाट्यसाठीचे केंद्र असून या ठिकाणास झाडीपट्टी रंगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्व विदर्भात नाटक हे मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. खास करून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात नाटके हि मोठ्या प्रमाणात होतात. पूर्वीपासूनच या भागात सिनेमागृहे हि अल्प प्रमाणात होती. किंवा दूरदर्शन संच पण कमी प्रमाणात होती, येथील लोकांचा करमणुकीचा हा एक महत्वाचा भाग आधीपासूनच दंडार या रूपाने केला जायचा.
कालांतराने दंडारीचे प्रमाण कमी होत सध्या नाटकांनी त्यांची जागा घेतली व नाटकांना मोठीच पसंती प्राप्त झाली. holywood, बॉलीवूड प्रमाणे Zadywood म्हणून एक वेगळी ओळख आज झाडीपट्टील नाटकांना मिळत आहे.
जिल्ह्यात मंडई व यात्रा अनेक ठिकाणी भरतात त्या निमित्याने आणि येथील जनता मुखत्वे शेती आणि शेतीवर आधारित वर्षभर कामे करतात. दिवाळीनंतर धान हा पीक या भागात कंपनी करून मळणी म्हणा किंवा या भागात चुरणा वैगेरे म्हणतात ते सुरु होतात. म्हणजेच एकंदरीत धान हे पीक निघते मग काही काळ उसंत म्हणून व वर्षातून एकदा तरी निवांत मनोरंजन म्हणून गावागावात स्वखर्चातून व लोकग्रहातून नाटकांचे आयोजन केले जाते. नाटकांस गावातील लहान पोरांपासून तर स्त्रिया व वरिष्ठ मंडळी एकूणच सर्व परिवारासह नाटक पहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन केले जाते. वर्षातून एक तरी नाटक असतोच हि परंपराच बनलेली आहे.
नाटकाच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यरसिकांची संख्या पाहता नाटकांसाठी योग्य स्थिती आजही नाट्य करणाऱ्या कंपन्या व कलाकारांना बळकट बनवते. नाटकांची हि परंपरा असल्याने येथील स्थानिक कलाकारांना यातून आपली अभिनयाची कला सादर करण्यास व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
झाडीपट्टी चे कलाकार मोठ्या पडद्यावर
अनेक युवक आपला अभिनयातून मोठ्या मोठया व्यासपीठावर जात आहेत. काही जणांनी नाटकांत आपली प्रतिष्ठा प्राप्त करून आज मोठ्या पडद्यावर आपला पदार्पण मिळविला आहे.
देवेंद्र दोडके, प्रवीण प्रभाकर, शेखर पटले या सारखे आणखी काही उदाहरण सांगता येतील. देवेंद्र दोडके यांनी तानी या चित्रपटात आपली छाप सोडली आहे. लाल चुडा या सारखे चित्रपट सुद्धा झाडीपट्टीतील कलाकारांनी मोठ्या पडद्यावर आणले आहे.
महाराष्ट्रात गाजत आहेत नाटके व गाणी
नाटक हे गडचिरोली, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात लोकप्रिय तर आहेतच त्याप्रमाणे त्यातील कलांवंत सुद्धा येथील लोकांच्या मनात घर करून आहेत. युवराज प्रधान, निकेश खोबरे या सारखे अन्य गायक व कलावंत आहेत जे आपल्या मधुर आवाजाने नाट्यरसिकांना आजही मंत्रमुग्ध करतात. भूक या नाटकांची गाणी आजही युवकांच्या मनात घर करून आहेत.
' तुझे रूप गोझिरे ' सारखी गाणी तर अख्या महाराष्ट्रात सध्या गाजत आहे.
स्थानिकांना रोजगार
नाटकांच्या माध्यमातून फक्त कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यापुरता हा विषय संपत नाही तर, यातून अनेक जणांना आज रोजगार मिळतो आहे.
मग ते नाटकांसाठी लागणारा पेंडाल, नेपथ्य , मेकप करणारे आर्टीष्ट, तबलाकार , ऑर्गन व ध्वनी पासून तर बाहेर बसून खाद्य विकणारे यांपर्यंत अनेकांना पूर्ण सीजन रोजगार मिळत असतो.
कलावंतांची हंगामी वसाहत
हिवाळा लागला कि, अवघे वडसा शहर नाट्य कलावंताच्या गजराने दुमदुमते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाटकांचे पोस्टर्स व बॅनर्स लावलेले आढळतील. वडसा हे नाट्य कंपन्यांचे एक केंद्रस्थान आहे. या ठिकाणी प्रत्येक नाटक सादर करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे.
याच ठिकाणी नाटकांची बुकिंग आणि याच ठिकाणी नाटकांचे कलाकार एकत्र येऊन नाटकातील अभिनयाचा सराव करतात आणि त्यासाठी ते संपूर्ण हिवाळा भर या ठिकाणी वास्तव्यास येऊन असतात म्हणूच वडसा शहरास नाट्य कलाकारांची हंगामी वसाहत म्हणून ओळखले जाते.
असे असूनही काही काळापासून लॉकडाऊन मुळे दीर्घकाळ बंद राहिलेले नाटके आता पूर्वस्थितीत येत आहेत. व आताही नाट्यरसिकांचा तितकाच प्रेम मिळतो आहे. शासन स्तरावरून सुद्धा या क्षेत्राकडे विशेष लक्ष्य देऊन या कलेस वाव मिळण्यास योजना असावी किंवा सहकार्य मिळावे हीच अपेक्षा.
साई गेडाम ( Youtuber / blogger ) माझा Youtube चॅनेल :- येथे क्लीक करा
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box