Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

१० ब्लॉग Idea कमवा लाखो महिना ; Best Blogging Ideas In 2022


१० ब्लॉग Idea कमवा लाखो महिना  


मित्रांनो, आज अनेक जण ब्लॉगर वर आलेले आहेत. आणि आपल्या पद्धतीने आपल्या आवडीच्या विषयात ब्लॉग लिहून खूप पैसे कमवीत आहेत. आपल्यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांना वाटत असेल कि आपणही एक ब्लॉग बनवून त्याद्वारे पैसे कमवावे तर मी यावर एक पोस्ट लिहिलेले आहे ती वाचून घ्या. 

काही जण असे असतील कि, ज्यांनी ब्लॉग बनविला आहे. पण त्याठिकाणी कोणती माहिती किंवा कशा संबंधी माहिती द्यावी ज्यातून खूप वाचक येऊन आपली इन्कम खूप वाढेल तर, आजचा  हा लेख पूर्णपणे त्यावरच समर्पित आहे. आपण पाहणार आहोत असे १० ब्लॉग च्या Ideas जे 2024 मध्ये खूप चालतील  ज्यावर लिहून नक्कीच तुम्ही कमवू शकता. 

ब्लॉग कसा बनवायचा Click Here

१. Daily Current Affiairs 
    चालू घडामोडी 


आजचा युग हा स्पर्धेचा युग आहे. प्रत्येक विद्यार्थी हा अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. त्या दरम्यान त्याला रोजच्या महत्वाच्या स्थानिक, राज्य, देश आणि विदेशातील ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याविषयी माहिती जमा करणे व त्याचे नोट्स काढणे गरजेचे असते. 

तुम्ही जर ते सर्व एका ब्लॉग मध्ये रोज प्रॉपर इंडेक्स करून रोजच्या रोज जर त्यांना माहिती उपलब्ध करत गेले तर नक्कीच तुमचा ब्लॉग उच्च पातळीवर जाऊन खूप जास्त वाचक येण्याची शक्यता आहे. यात फक्त तुम्हाला रोज update राहावे लागेल आणि हे योग्य आहे. आपण update रहावेच. आणि हा विषय अगदी पर्मनंट चालणार आहे. यावर तुम्ही विचार करू  शकता. 

२. Gadget Review 


Online शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन घेतली जात आहे. पुस्तक, कपडे, शाळेच्या, घरच्या वस्तू या शिवाय कॉम्पुटर, मोबाईल सारख्या अनेक वस्तू आज online घेतल्या जात आहेत. आपण यावे कशा प्रकारे ब्लॉग बनवू शकता ते पाहूया. 

online घेतांना किंवा ऑफलाईन एखाद्या store मधून घेतांना असो एखादी वस्तू आपण त्याचाच घेतो जेव्हा आपल्याला त्या वास्तूबद्दल सर्व व योग्य माहिती असते कारण आजकाल कोणती वस्तू कशी निघेल सांगता येत नाही आधीच ऑनलाईन खरेदी करतांना वस्तू खराब निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

म्हणूनच अनेक जण आधी कोणतीही वस्तू घेतांना ती कशी आहे याबद्दल माहिती पाहतात आणि मगच खरेदी करतात. त्यामुळे तुम्ही यात  मदत करू शकता तुमच्या ब्लॉग च्या साहाय्याने तुम्ही ज्या वस्तू घेता त्याबद्दल ती कशी आहे, तिचे Features काय आहेत. त्या वस्तूची दुसऱ्या वास्तूच्या तुलनेत किती महत्व सांगता येतील. किंवा किंमत वैगेरे वैगेरे अशा गोष्टी सांगून तुम्ही तुमचा ब्लॉग हा gadget review च्या बाबतीत बनवू शकता. 

यासोबतच तुम्हाला एक दुसरा Option सुद्धा तयार होईल ज्यातून तुम्ही extra कामे करू शकता. ते म्हणजे Affiliatte Marketing . 

Read Article Affiliatte Marketing काय आहे ?

म्हणजेच तुम्ही ज्या वस्तू विषयी सांगता त्या वस्तूची लिंक देऊन तुम्ही त्यावर सुद्धा कमिशन कमावू शकता. फक्त तुमच्या वस्तू योग्य प्रकारे निवडून त्या लोकांना पटल्या पाहिजेत उगीच कोणतेही सामान विकण्याच्या उद्देशाने फसवेगिरी नको यातून काही साध्य होणार नाही. उलट निराशा हाती येईल. 

३. Web Series Blogs 


भारतात चित्रपटाप्रमाणे सध्या webseries सुद्धा मोठ्या प्रमाणावर पहिल्या जात आहेत. त्यात अनेक वेब सिरीज वेगवेगळ्या otg प्लॅटफॉर्म वर येत असतात. Marvel सारखे चित्रपट सिरीज घेऊन येणारे अनेक मालिका घेऊन येतात. त्या मालिकांची आवर्जून वाट पाहणारे अनेक प्रेक्षक आहेत. 

त्याचप्रमाणे भारतातही वेब सिरीज चा क्रेझ वाढत चालला आहे. कोणती वेब सिरीज कधी येणार आणि कोणत्या प्लॅटफॉर्म वर आहे. त्यातील पात्र आणि कल्पना याविषयी अनेक बाबतील सर्च केले जाते. त्यामुळे यावर तुम्हाला यात आवड असेल तर तुम्ही ह्या विषयी एक ब्लॉग बनवू शकता जो आज खूप सर्च केला जात आहे. आणि यावर ब्लॉग सुद्धा कमी आहेत. 

४. Application Review 


Play Store वर किंवा अनेक जागी असे असंख्य अँप्लिकेशन्स आहेत ज्यांचे अनेक उपयोग आहेत. या applications चा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग होतो. पण बहुतेक लोकांना या Application आणि त्यांच्या वापराबद्दल माहिती नसते तुम्ही त्या अँप्लिकेशन च्या Features आणि उपयोगाविषयी एक ब्लॉग तयार करू शकता. 

Play Store वर इतके Apps आहेत कि, रोज एक Apps चा Review कराल तरी कित्येक काळ लिहू शकाल. उदा. एखाद्याला फोटो किंवा विडिओ टिपण्याचा छंद आहे. तर तो त्यासाठी कोणता कॅमेरा अँप्स वापरावा हे शोधात असतो त्याचप्रमाणे विडिओ एडिटिंग apps , एखाद्या परीक्षेची तयारी साठी उपयोगी अँप्स कोणता वैगेरे वैगेरे. 

५. Vines किंवा Story Blog 


सध्या  तुम्हाला माहीतच आहे. You Tube वर आज भरपूर Creators आलेले आहेत.आणि येणारही आहेत ते अनेक प्रकारची शॉर्ट व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओज, किंवा स्टोरी बनवीत असतात त्यांना प्रत्येक वेळी नवीन निविन स्टोरी ची गरज भासत असते. 

तेव्हा तुम्ही त्यांची ही गरज भागवू शकता. तुमच्या ब्लॉग वर अनेक शॉर्ट फिल्म च्या स्टोरी, कॉमेडी स्टोरी publish करून त्यांना ते उपलब्ध करून देऊ शकता. या बदल्यात त्या स्टोरी ला तुमचा नाव पण येईल आणि ब्लॉग मधून तुम्ही पैसे कमवू शकता. ही आयडिया नवीन असून याची पुढे खूप आवश्यकता आहे. 

६. Online पैसे कसे कमवायचे ?


मित्रांनो, Lockdown पासून तुम्ही पाहिलेच असेल अनेक जणांचे जॉब गेले आणि नोकरी नसल्याने काही जण बेरोजगारीच्या दबावात आलेले आहेत. आता अशा वेळी शाळेची फी, पुस्तके किंवा काही कामासाठी पैशाची गरज भासत असते. आता त्यांना regular कामावर किंवा कोठे जॉब करणे अवघड जाते त्यामुळे घरबसल्या मोाइलद्वारे अशा काही Ideas जर त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही द्याल तर तुमचा ब्लॉग नक्कीच चालले आणि भरपूर यश संपादन कराल.

पण त्याआधी आपल्याला त्या Genuine पद्धती स्वतः Exeperment करून कमवून दाखवा लागेल. कारण कोणत्याही खोट्या बाबी सांगून काहीच साध्य होणार नाही. Scope तर तगडा आहे, फक्त योग्य पद्धतीने करा.

७. Health Tips 


सध्या तरी तुम्हाला माहीतच असेल की, जगात एक वेगळीच बिमारी आहे. ज्याच्याने संपूर्ण जग हादरून गेला होता. आणि संपूर्ण जीवन अस्तव्यस्त झाले. यात अनेक जण आपल्या कुटुंबातील व्यक्तींची व आपली स्वास्थ्य पुढे चांगले राहावे यासाठी अधिकच जागरूक होतांना दिसत आहेत. 

अनेक प्रकारच्या बीमाऱ्या आणि सध्याच्या धावपळीच्या युगात आपण जर एक ब्लॉग द्वारे योग्य पद्धतीने कशा प्रकारे आपले स्वास्थ्य राखता येईल. आपण कशा प्रकारे निरोगी राहून दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो यावर सुध्दा तुम्ही लिहू शकता. तुम्ही डॉक्टर असाल किंवा याबद्दल तुमचा चांगला अभ्यास असेल किंवा अभ्यास करून तुम्ही तुमचा एक दर्जेदार ब्लॉग बनवू शकता. 

८. Movie Review, Upcoming Movie


भारतात किंवा जगात चित्रपट पाहणाऱ्या ची संख्या तर अगणित आहे. बहुतेक जण आपल्या मनोरंनासाठी चित्रपट पाहत असतात. काही जणांना तर नविनवन कोणते चित्रपट येतात त्यांची ओढ लागलेली असते. ते नवीन चित्रपट बद्दल माहिती शोधत असतात. किंवा एखाद्या नवीन चित्रपटाविषयी जाणून घेण्याचा कल अधिक असतो.

त्यामुळे आपण आपल्या प्रतिक्रियंद्वारे चित्रपट कसा आहे ? का पाहावा? पाहावा की नाही? अशा प्रकारे review देऊ शकतो. त्याबरोबरच नवीन चित्रपट कोणता येतोय त्यावर लिहू शकतो. आपल्यापैकी अनेक जण चित्रपट पाहतात अनेकांना तर पूर्ण स्टोरी काय एक एक डायलॉग सुध्दा आठवते तर मित्रांनो ब्लॉग लिहून काढा आणि कमवा पैसे.

९. सरकारी योजना माहिती


तुम्ही पाहताय शासनाने अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत पण त्यापैकी अशा अनेक योजना आहेत ज्या अजूनही बहुतेक जणांना बरोबर माहिती होत नाही. नेमका कोणासाठी व त्यासाठी काय करावे लागते याबाबत सविस्तर माहिती नसते. 

तुम्ही या सर्व जोजनांची माहिती काढून त्यावर आपला ब्लॉग चालवू शकता. यातून शासनाच्या योजना तळागळातील लोकांना पोहचतील व तुम्हाला सुध्दा समाजकार्य करण्याची संधी मिळेल.

१०. क्रीडा बातम्या


क्रीडा या विषयी अनेकांत चुरस आहे, मग ते क्रिकेट असो की इतर खेळ. आयपीएल तर तुम्हाला माहीतच असेल आयपीएल चा इतका क्रेझ आहे की, जणू एक त्योहारच आहे असा वाटतो आणि तशी जाहिरात सुध्दा तुम्ही पाहिली असेल. या बाबतीत इंटरेस्ट घेणारे खूप आहेत. 

तुम्ही या विषयी भरपूर लिहू शकता. दैनंदिन सामन्याचा आढावा, नवीन अपडेट देऊ शकता मग हे क्रिकेप्रेमींना आवडेलच, वर्षभर तुम्ही लिहू शकाल कारण खेळ वर्षभर चालतात. अनेक खेळाडू आणि सामन्यांच्या हालचाली, त्यांच्या वेगवेगळ्या माहित्या लिहून तुम्ही आपला ब्लॉग चालवू शकता. 

मित्रांनो आणि मत्रिणींनो आपण अशाप्रकारे १० विषय पाहिले आहेत ज्यावर लिहून आपला एक Sucessful ब्लॉग चालवू शकता. पुढील Articles मधे आपण नवीन विषय पाहू. माहिती आवडल्यास एक शेअर नक्की करा. 

साई गेडाम ( blogger/youtuber) Visit Our YouTube Channel Click Here



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या