Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Online पैसे कमविण्याचा Genuine मार्ग; Blogging Earn Money At Home

कमविण्याचा Genuine मार्ग, Blogging Earn Money At Home 



रील Title वाचून काही लोकांचा हसू आवरत नसेल पण मी या ठिकाणी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते एकदम सत्य आणि Genuine Methods म्हणा की मार्ग सांगणार आहे. ज्यातून तूम्ही तुमचा खीसा खर्च काय तर विचारापलीकडे कमवून टाकाल. आणि तुम्हाला जास्त वेळही द्यावी लागणार नाही. ना कोणत्या ऑफिस मधे ना एखाद्या particular जागेवर तुम्ही जिथे असाल तिथून अगदी बाकावर, पलंगावर निपचित पडून सुध्दा हे वर्क करू शकता. 

तुम्ही कोणते कपडे लावले, दिसता कसे याचा या कामाशी काहीही संबंध नाही, तुम्ही शिकले किती याचाही तितका महत्त्व नाही. हव्या त्या वेळी हव्या तितकाच वेळात तुम्ही हे काम करू शकता. काय मग मित्रांनो, आवडेल न असा काम? नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाही. चला तर मग इकडतिकच्या गोष्टी सोडूया डायरेक्ट विषयाला सुरुवात करुया. 

त्याआधी मी काही अनुभव सांगतो. बऱ्याच वेळा मी online पैसे कमविण्याच्या नादात कोणत्या ना कोणत्या कंपन्या जॉईन केल्या. त्यांनी सांगितलेले अनेक Task करून मूर्ख बनलो. शेवटी काय आले वाट्याला ? निराश झालो, हताश झालो. वेळही बरबाद झाले, पैसे वाया गेले ते तर गेलेच पण मी त्यांच्या म्हणण्याप्रमाने काही मित्रांना तो जॉईन करण्यास सांगितले त्यामुळे काही मित्रांसमोर नाक पण कापला ही गोष्ट तर वेगळेच दुःख देऊन गेले. आता मात्र मी बराच सतर्क झालो. हे आधीच व्हायला पाहिजे होते जेव्हा मी एका How To Earn Online without Investment यावर एका माहिती अधिकारी यांनी सेमिनार मधे भाषण दिला होता की, ब्लॉग लिहून आपण विद्यार्थी दशेत पैसे कमवू शकतो. पण कोण तिकडे लक्ष देणार? कोणाला तेवढी फुरसत? माझ्याकडे लॅपटॉप नाही. कॉम्पुटर नाही. तेवढा ब्लॉग कसा लिहायचं बापरे! खूप कठीण असतो तो, खूप settings आणि हे ते असते याच प्रश्न आणि नकारात्मक विचारणे मीही तिकडे दुर्लक्ष केले पण जेव्हा Lockdown लागले आणि अनेक स्पर्धा परीक्षा चे अभ्यास करता करता पैशांची अडचण भासू लागली आणि वय पण वाढत चालले मग परत त्या गोष्टी आठवू लागल्या की, How to earn online at home, without Investment वैगेरे वैगेरे. मग काय पेटून उठलो. भिडलो आणि आज कमवत सुध्दा आहो. 

पण हीच गोष्ट त्यावेळी का लक्ष्यात घेतली नाही याची खंत वाटते. पण कोण सांगणार की नाही लागत त्यासाठी लॅपटॉप, किंवा कॉम्पुटर. नाही लागत मोठा दिमाग. ही खूप साधारण आहे जिला आपण कठीण करून दुर्लक्ष करतो आहोत. पण काळजी नका करू कारण मी या परिस्थितीतून गेलो आहे आणि सामोरा जात आहे. थोडाफार अनुभव सुध्दा आहे. तुम्ही माझा अनुभव ऐकून घ्या. आणि करा सुरुवात कारण हीच वेळ आहे मग उशीर झाल्यास पस्तावा व्हायला नको. 

एक गोष्ट तुम्ही जितका वेळ चॅटिंग करता तितक्या वेळात एक आर्टिकल लिहून होईल ? आणि हा गमतीचा विषय नाही. अनेक नोकरीवर असलेले सुध्दा extra income कुठून मिळणार म्हणून शोधत असतात. मग आपण तर रिकामे माणस मग करायला नको काय? 


Blog कसा बनवायचा?

तुमच्याकडे Gmail account आहे. त्यामधे Google चे अनेक सेवा आहेत. त्यातीलच एक YouTube सारखी Blogger म्हणून सेवा आहे. त्यासाठी Step by step खालीलप्राणे

✔️Google वर Blogger.com म्हणून Search करा

✔️ Blogger log in, sign up असा Page येईल ती पहिलीच Website Open करा. 

✔️ आता उजव्या बाजूस तीन रेषा दिसतील तिथे क्लिक करा. तुम्हाला आता Create Blog असा  Option येईल त्यावर क्लिक करा.

✔️ क्लिक केल्यावर ब्लॉग च नाव ठेवायचं option येईल तुम्हाला हवा तो नाव ठेवा. तुम्ही ज्या विषयावर लिहू शकता त्याला शोभेल अशा प्रकारे किंवा तुमच्या मर्जीने ठेवा.

✔️ त्यानंतर Url Choosing option येईल तुम्हाला उपलब्ध असलेले url निवडायचे आहे. जसे मी हा ब्लॉग बनवितांना Gadchirolikar.blogspot.com असा मिळविला होता. आता तो .in Domain घेऊन custom केला आहे. ती नंतर ची गोष्ट आहे. आधी Url create करून घ्या. कारण आपण free मधे without Investment यावर बोलतो आहोत.

✔️ अशाप्रकारे url मिळेल. झालं मग तुमची Basic Details नाव, आवड निवड, ब्लॉग च विषय, कशाबद्दल आहे वैगेरे वैगेरे, हे सर्व झाले की, झालं तुमचा ब्लॉग तयार

✔️ मग असतो Theme च Option. Blogger ने त्यांच्या वेगवेगळ्या Theme दिल्या आहेत त्यातली तुम्हाला आवडीची किंवा तुमच्या विषयाला अनुसरून theme select करायची आहे. Theme म्हंजे मोबाईल वर तुम्ही theme लावलीच असेल त्याचाच प्रकार. नसेल समजले तर आपण Theme setup यावर पुढे पाहूया.


ब्लॉग कसा लिहायचं?

तुमचा ब्लॉग तयार झाला सर्व झालं. आता मेन गोष्ट म्हणजे तुमच्या ब्लॉग चा गाभा म्हणजे तुमची पोस्ट किंवा तुमचा आर्टिकल, आता ते तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही की तुम्ही काय लिहायला पाहिजे. तरी पण तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहू शकता. 

जस मी सुध्दा अनेक विषय हाताळतो ज्या विषयावर मला आवडते किंवा थोडेफार कळते. तुम्ही क्रिकेट पाहत असाल किंवा त्यावर फार वेळा बोलत राहता तेव्हा क्रिकेट वर तुम्ही बराच लिहू शकता. कोणताही असो तुम्हाला वाटते तो. लिहा सुरुवात करा.


🌀 मुद्देसद लिहा

🌀 तुमच्या शब्दात व्यक्त करा. जास्त कठीण भाषा वापरू नका. 

🌀 वाचनात चुरस निर्माण होईल अशी लेखनशैली ठेवा.

🌀 वाचनकर्त्याला वाचनातून काहीतरी प्राप्त व्हायला हवे. म्हणजेच तुमच्या आर्टिकल ने त्यांच्या जीवनात काहीतरी Valuable माहिती मिळायला हवी.

🌀 जे काही लिहाल ते असे लिहा कि लोकांच्या कामाचे व हिताचे राहील. फसवणूक केल्यासारखे काहीही करू नका. 


किती शब्दाचे आर्टिकल लिहाल?

साधारतः १,५०० ते २,००० शब्दामध्ये एक effective article तुम्ही लिहू शकता आणि काही वेळेस त्याही पेक्षा कमी असेल तरी पुरेसे आहे. शक्य असेल तितके जास्त शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. 


मोबाईल मधेच लिहू शकता 

अनेक वेळा मनात प्रश्न येतो कि, typing सारखे कामे mobile वर होऊ शकतील का पण या ठिकाणी मी ताजा उदाहरण आहे मी आताही मोबाईल वरच ३५, ३६ पोस्ट लिहून काढल्या आहेत. आणि आताही लिहितो आहे. 

कॉम्पुटर वर काही प्रमाणात सोपे जाते व लवकर लिहून होते, तुम्ही efford करत असाल तर एक लॅपटॉप घ्यायला हरकत नाही पण मोबाइलसुद्धा पुरेसा आहे. मोबाईल व कित्येक वेळ आपण बोलत बसतो type करतो तितक्या वेळात एक पोस्ट लिहून होते. किंवा तुम्ही माझ्या ब्लॉग मधून आयडिया घेऊ शकता कि कशा प्रकारे लिहू शकतो. त्यामुळे कॉम्पुटर किंवा खूप मोठे gadget लागतील हा विचार आधी मनातून काढून टाका. 


कमाई कशी होणार ?

मित्रांनो, आपण ज्या ब्लॉग वर पोस्ट लिहितो त्यावर आपण add चालवू शकतो मग त्या कोणत्याही adds असोत. असे खूप सारे ऍड नेटवर्क आहेत जे तुमच्या बॉग वर ऍड रन करायचे पैसे देत असतात. त्यापैकीच एक google adsence आहे. Google AdSence प्रमाणे अनेक ऍड नेटवर्क आहेत. 

त्याविषयी मी समोर माहिती घेऊन येणारच आहे. त्या add नेटवर्क चे Approval मिळाले कि, आपण निवांत पोस्ट लिहून पैसे कमवू शकता. आता Google Adsence चे approval कसे मिळवायचे याबद्दल मी एक पोस्ट लिहिली आहे ती वाचून घ्या किंवा काही समस्या असल्यास social sites ला मला विचारू शकता किंवा पुढे यावर सविस्तर माहिती असलेला लेख मी घेऊन येईन. approval घेण्याची एक छोटीशी प्रक्रिया आहे. 

मग तुम्ही डॉलर च्या स्वरूपात कमवायला लागाल आणि तुमचा उत्साह द्विगुणित होईल आणि लेखनशैली व बऱ्याच सुधारणा होतील.  


Google AdSence Appraval Tips


स्वतःची नवीन ओळख 

मित्रांनो, तुम्ही जे ब्लॉग बनवता व त्यावर लेख लिहिता ते खूप जण वाचत असतात त्यांना तुमच्याकडून अनेक प्रकारची माहिती प्राप्त होते. त्यांच्याकडून तुम्हाला धन्यवाद स्वरूपात बक्षीस प्राप्त होते ते तर आहेच. यातून तुम्ही समाजात वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 

तुमचे पोस्ट जगाच्या पाठीवर कोठे वाचले जातील हे सांगता येणार नाही. आणि इतर देशातून जेव्हा आपला ब्लॉग वाचला जाऊ लागतो तेव्हा आपल्या ब्लॉग ची इन्कम आणखी वाढते. तुम्हाला तुमच्या मनातील विचार जगासमोर आणण्याचे एक दालन खुले होईल. आणि तुम्ही यातून अपेक्षेप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा अधिक कमवू शकाल. 


साई गेडाम ( Blogger/Youtuber ) visit my youtube channel Click Here



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या