How To Apply For Google AdSense Pin In Marathi | google adsense pin apply असे करा लवकर verification मिळेल
नमस्कार, आजच्या लेखात आपण Google AdSense Pin कसे Apply करायचे? आणि झटपट Verification कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहू.
काय आहे Google AdSense Pin ?
मित्रांनो, तुम्ही YouTube वर व्हिडिओ पाहत असाल. किंवा बनवत असाल तुमच्यापैकी कोणी ब्लॉगर किंवा WordPress वर आपली वेबसाईट बनवून माहिती देत असाल तर तुम्हाला Google Pin विषयी थोडेफार माहितही असेल. ज्यांना माहिती नाही की, Google AdSense Pin Kay Aahe तर google adsense pin ही Google AdSense वापरकर्त्यांसाठी Google कडून पाठवली जाणारी सहा आकडी एका बंद लिफाफ्यातली पिन असते ज्यात ते नंबर येतात ते आपल्याला आपल्या गूगल ॲडसेंस अकाउंट वर टाकून आपला पत्ता verify करायचा असतो.
ज्यामुळे तुमचा Google AdSense शी ओळखी सोबत पत्ता verifying होईल आणि तुमच्या adsense account वर तुम्ही कमविलेले पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यास सुलभता होईल. मित्रांनो थोडक्यात आता तुम्हाला समजलच असेल की, गूगल AdSense काय आहे. बहुतेकांना या पिन विषयी म्हणजेच ते कसे मिळवायचे किंवा कसे बोलवायचे व कशाप्रकारे व कधी मिळेल याची उत्सुकता असतेच शिवाय हा लेख सुध्दा तुम्ही वाचता आहात त्यामुळे याविषयी संपूर्ण माहिती मी येथे देतो आहे. चला तर पुढे यावर माहिती पाहूया.
Identy Verification संबंधित Action Button तुमच्या Adsence मध्ये आली हे कसे ओळखाल ? तर मित्रानो तुम्हाला या संबंधी तुमच्या Email मध्ये एक मेल आला असेल You need to verify your identity अशाप्रकारचा खाली स्क्रीनशॉट दिलेला आहे.
Google AdSense Pin कधी मिळतो ?
तुम्ही जेव्हा तुमच्या गूगल ऍडसेन्स खात्यात १० डॉलर पूर्ण करता तेव्हा तुम्हाला Identy Verification चा option येईल म्हणजेच तुमच्या खात्यात १० डॉलर झाले कि, गूगल adsence पिन साठी Apply करता येईल असे म्हणता येईल.
आता तुमच्या ऍडसेन्स मध्ये Identity verification संबंधीचा option शो होईल तेव्हा आपण कशाप्रकारे Identity Verification करायचा किंवा Google Adsence पिन साठी Apply करायचा म्हणजे त्यात चुका होणार नाही किंवा विलंब होणार नाही आणि तुमचा लवकरात लवकर आयडेंटी वेरिफिकेशन होऊन Google पिन मिळेल. त्यासाठी खालील टिप्स follow करा.
१. सर्वात प्रथम तुमच्या Google Adsence अकाउंट मध्ये लॉग इन व्हा. आता तुमच्या ऍडसेन्स मध्ये वरच्या बाजूस your payment on currently hold. identy verify required असा massege शो होईल. आणि पुढे Action Button असेल. त्यावर क्लिक करा.
२. Action Button वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नाव टाकण्यासाठी Option येईल आता येथे तुम्हाला तुमचा ज्या नावाने Adesense अकाउंट बनविला होता नेमका तोच नाव इथे भरायचा आहे.
३. नाव व्यवस्थित भरल्यानंतर identy proof upload करण्यासाठी option दिसेल. त्याठिकाणी तुम्हाला Government Issued Photo - ID अपलोड करायचा आहे.
मित्रांनो याठिकाणी बरेच जण चुका करतात. आणि मग त्यांना वेरिफिकेशन failed दाखविले जाते. किंवा बराच वेळ वाट पाहावी लागते त्यासाठी खालील काही मुद्दे आहेत ते व्यवस्थित लक्ष्यात घ्या.
Identy Proof Upload करण्यासंबंधी महत्वाचे मुद्दे.
१. ह्यापैकी एक Documents करा Upload : १) India Passport २) Pan Card ३) Voter ID ४) Driver License
२. Aadhar Card अपलोड करू नका. बरेच जण identy verify करतांना आधार कार्ड अपलोड करतात. पण Adesence मध्ये स्पष्ट नमूद आहे कि, आधार कार्ड Accept होणार नाही. त्यामुळे आधार कार्ड जोडू नका तुमचा ऍडसेन्स failed होईल.
३. आता महत्वाचे म्हणजे Document अपलोड करतांना त्या Document ची व्यवस्थित फोटो काढून घ्या किंवा त्याला स्कॅनर मध्ये स्कॅन करून घ्या. फोटो काढतांना व scan केल्यानंतर त्या ID ला अशाप्रकारे क्रॉप करा कि, त्याचे चारही बाजूचे कोपरे दिसतील कोणत्याही एका बाजूने cut वैगेरे राहणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्या. काढलेली फोटो हि व्यवस्थित स्पष्ट दिसायला हवी त्यात तुमचा नाव, फोटो अशा गोष्टी सुस्पष्ट दिसायला हव्या. एकदम अंधारात किंवा वाचण्यास अडचण जाईल अशी फोटो upload करू नका.
४. Document अपलोड केल्यानंतर next वर clik करा. त्यानंतर तुम्हाला Address चा Option येईल.
५. Address भरतांना व्यवस्थित भरा आणि तोच ऍड्रेस भरा जो तुमच्या adesece बनवितांना भरलेला होता. आणि तोच ऍड्रेस तुमच्या ID ला दिलेला असेल त्यामुळे तुमचा identy व्हेरिफाय होईल तद्वतच गुगल कडून पाठविला जाणारा ऍडसेन्स पिन सुद्धा त्या ऍड्रेस वर येण्यास सुलभता होईल.
६. ऍड्रेस भरल्यानंतर Got It या पर्यायावर क्लीक करा.
आता तुमची Identy व्हेरिफाय ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या संबंधी Email द्वारे कळविले जाईल. सोबत ऍडसेन्स पागे refress केल्यानंतर वेरिफिकेशन टॅब मध्ये Adsece Succesfully Completed असा message सुद्धा शो होईल.
माहिती आवडली असेल तर मित्रांमध्ये Share करा. आणि काही प्रश्ने किंवा समस्या असल्यास संपर्क करा. धन्यवाद !
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box