Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

YouTube वर Subscribers कसे वाढवायचे ? | By Gadchirolikar


YouTube वर Subscribers कसे वाढवायचे?

मस्कार, आपल्यापैकी बरेच जण YouTube वर व्हिडिओज टाकून त्यामार्फत, नाव, पैसा किंवा आपले कौशल्य जगासमोर आणू पाहत असतील पण, त्यांना त्यांचे subscribers नसतील तर त्यांचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे काही जण नैराश्यात येऊन YouTube हे आपल्या अवाक्याचे नाही. आपल्याला झेपणार नाही किंवा आपण Subscribers वाढवू शकणार नाही असे समजतात व YouTube ला रामराम ठोकतात. मित्रांनो मी तुमच्यासारखाच Struggle करत, विचार करत इथपर्यंत आलोय आणि आता मी जितके सबस्क्राइबर हवे होते तो आकडा गाठला आहेच पण आता दिवसागणिक आपोआप Subscriber येतात. त्यामुळे मी काही माहिती या ठिकाणी शेअर करणार आहे ज्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.

YouTube वरून कमिविण्यासाठी किती Subscribers हवे ? 

मित्रांनो, यूट्यूब वर व्हिडिओज टाकून पैसे कमविण्यासाठी कमीत कमी तुमच्या यूट्यूब चॅनल वर १००० subscriber असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण Subscribers ची पात्रता पूर्ण करू शकतो. 

पुढे आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या Ads द्वारे कमवू शकतो. तुमचे जर १००० Subscriber complete नसतील तर, किंवा चॅनल वर सबस्क्राईबर वाढत नसतील तर हे खालील गोष्टी लक्षात ठेवा. 


1. ( Upload Video Regular On YouTube ) नियमित वेळेवर व्हिडिओ अपलोड करा.

आपण कोणतीही गोष्ट असो नियमित करतो त्यावेळी ती सुयोग्य होत जाते व लोकांच्या ध्यानी राहते. तसेच YouTube सुध्दा स्वतः सांगते की, तुम्ही तुमच्या व्हिडिओ अपलोड करण्याचा एक वेळापत्रक बनवून घ्या. जसे की, तुम्ही आठवड्यातून एक, दिवसातून एक अशाप्रकारे. आपण असे करतो की, कधी दिवसातून तीन चार व्हिडिओ अपलोड करतो आणि मग कधी पंधरा दिवस काहीच नाही. 

अशा वेळी आपल्या चॅनल वर नियमितपणा राहत नाही. आणि subscribers सुध्दा तुमच्या वेळा, किंवा व्हिडिओज कधी येणार हे समजून घेऊ शकणार नाही. आता दुकानाचेच उदाहरण बघा. एखादा दुकान रोज बरोबर वेळेवर सुरू होतो तो कस्टमर ला बरोबर माहिती असतो आणि जो दुकान कधी बंद कधी सुरू असतो तो कस्टमर ला बरोबर समजणार नाही आणि ते बरोबर येणार नाही. 

त्यामुळे व्हिडिओ regular व वेळापत्रक बनवून टाकणे आवश्यक राहील एकंदरीत त्याला आपण Consistency म्हणू शकतो. हा एकदम जबरदस्त उपाय आहे यावर नक्कीच विचार करा.


2. Content वर Focus करा

" Content Is King " असे म्हंटले जाते ते काही असेच नाही. तर हे कोणत्याही सामाजिक माध्यमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे केंद्रक आहे. आता Content म्हणजे काय ? तर आपण कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ किंवा फोटोज् , पोस्ट अपलोड करतो त्या सर्व फोटोज्, पोस्ट,व्हिडिओज म्हणजेच कंटेंट होय. 

आपण You Tube, Instagram वर इतर ठिकाणी व्हिडिओज, पोस्ट अपलोड करतो आणि आपले Subscriber हे ते फोटोज् किंवा व्हिडिओज बघत असतात. त्यांना ते आवडायला हवेत. आणि आवडतील तेव्हाच ते Subscribe सुध्दा करतील. 

कधी कधी regularity साठी आपण काही ना काहीतरी टाकायचं म्हणून टाकून देतो, पण फलनिष्पत्ती काय ? तर आपण आपल्या विषयातून भटकू शकतो व याचा वाईट परिणाम आपल्या Subscribers वर होऊ शकतो. मग प्रश्न पडला असेल की, दिवसातून किती व्हिडिओ अपलोड करावे ? ज्यातून Subscribers वाढतील. तर यावर माझा मत आहे की, हवे तर तुम्ही आठवड्यातून एकच व्हिडिओ टाका पण तो परिपूर्ण माहिती देणारा किंवा मनोरंजन किंवा Subscriber जो व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या चॅनल वर विडिओवर आलेला आहे त्यांना परिपूर्ण माहिती मिळावी किंवा हेतू पूर्ण व्हावा. त्यामुळे Content वर सर्वात जास्त लक्ष द्या. 


3. Thambnail ( पोस्टर्स ) दर्जेदार बनवा .

Thambnail म्हणजे काय ? तर आपल्या व्हिडिओ च्या वर लावलेले पोस्टर्स म्हणजे ज्याला YouTube जगतात Thambnail असे म्हणतात. 

त्याला पाहूनच YouTube Users पैकी बहुतेक Users हे वीडिओवर क्लिक करतात किंवा व्हिडिओ पाहायला येतात. त्यामुळे सर्वात आधी तो Effective असणे आवश्यक असते. त्यामुळे आपण तो हवा तेवढा दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो कशाप्रकारे बनविला जातो, आणि आपला Unique व Effective thambnail बनला पाहिजे याकडे जरा विशेष लक्ष देणे गरजेचे असते. 

उदा. एखादा Users सर्च करतो की, How To Earn Money In Mobile In Marathi ? आणि नेमका हाच वाक्य लिहिलेला व व्यवस्थित चित्रे असलेला thambnail त्याच्या डोळ्यासमोर आला की, तो १०० टक्के तुमचा व्हिडिओ पाहनार. आणि Subscriber पण करणार कारण आधीच सांगितले आहे की, तुमचा Content हा Wievers ची प्रतिपूर्ती करणारा असावा. मग तुमचे विव्ह असोत की, नसोत तो तुम्हाला नक्कीच Subscribe करेल. जो तुमच्या Eye Catching Thambnail ने आलेला असेल.


4. Clickbait करा

Clickbait हा शब्दच क्लिक संबंधी आहे म्हणजेच त्यावर आपण click आणून view वाढवू शकतो हा Views आणण्यात जास्त भूमिका निभावतो आणि views आले तेव्हा Subscriber पण येण्याची शक्यता वाढते. सर्वात आधी समझुन घेऊ klickbait mhanje kay ? Klickbait म्हणजे आपण जे Thambnail लावतो ते अशाप्रकारे बनविणे किंवा त्यावर अशाप्रकारे लिहिणे की, ते वाचून Viewers तुमच्या व्हिडिओवर हमखास येतील.

उदा. तुम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बनविला आहे आणि त्याचा बॅनर किंवा thambnail अशाप्रकारे बनविला आहे की, ते पाहून प्रेक्षक व्हिडिओमध्ये येतील. पण व्हिडिओ पण दर्जेदार असायला हवे. 


5. patience ठेवा

मित्रांनो, YouTube वर किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला संयम व थांबण्याची शक्ती हवी असते आणि हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे जो तुमच्या अंगी असावाच. क्षेत्र कोणतेही असो एका रात्रीत यश मिळत नाही. किंवा दोन चार दिवसांनी यश संपादन होत नाही. 

कर्म करा फळाची अपेक्षा नको अशाप्रकारे तुम्हाला कार्य करत राहावे लागते याचे फळ नक्कीच मिळेल. हे एकदम चायनीज बांबू सारखे असते जसे, हा बांबू कित्येक वर्ष खूप लहान असतो एकदम उगविनार की नाही असा सुध्दा विचार येतो पण नंतर एकदा की त्याची वाढण्याची वेळ आली की काही दिवसातच एकदम लांब वाढतो असे वाटेल की, काही दिवसातच हा वाढला आहे Subscribers च्या बाबतीत तसेच घडते एकदा का ते वाढायला लागले की, दिवसागणिक आपल्या विचारापलीकडे ते वाढतांना दिसतील.

माहिती आवडली असेल तर मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद



Gadchirolikar 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या