मित्रांनो सध्या जमीन खरेदी व विक्री चे व्यवहार जिकडेतिकडे जास्त प्रमाणात वाढलेले आहे. अनेक जण घर बांधण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतांना आपण पाहतो आहोत. आपल्याला कोणत्याही जमिनीच्या खरेदी विक्री संबंधी व्यवहार करायचा असल्यास महत्वाचे असते ते त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास किंवा Land Record माहित असणे म्हणजेच ती जमीन सध्या कोणाच्या नावावर आहे. पूर्वी कोणाच्या नावावर होती आणि नंतर त्या अभिलेखात कोणते बदल होत गेले याबद्दल माहिती असणे गरजेचे असते.
हि माहिती मिळविण्यासाठी आपल्याला आधी तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालय जावे लागत होते. त्यांच्याकडे हि माहिती सातबारा उतारा खाते , फेरफार खाते अशा प्रकारच्या पत्रकामधे हि माहिती नमूद असते. पण आता मात्र आपल्याला हि माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.
शासनाने ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील अभिलेख उताऱ्याचे संगणीकीकरण करून हि फेरफार उतारे onilne उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनीचे फेरफार उतारे आता ऑनलाईन पाहू शकणार आहात. Land Record मध्ये नेमका कोणता बदल व कधी झाला याविषयी माहिती याठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे व सातबारा उतारा व ८ - अ पाहता येईल.
* जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी पुढे दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नवीन नोंदणी करून तुम्ही ई रेकॉर्ड स्वरूपात पाहू शकता.
जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी लिंक
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box