Chamorshi Taluka Gadchiroli ; चामोर्शी ( जिल्हा गडचिरोली )
२६ ऑगस्ट १९८२ ला जिल्हा निर्मित होऊन ८ तालुके निर्माण झाली त्यात चामोर्शी हि तहसील अस्तित्वात पुढे चामोर्शी तालुक्यातून मुलचेरा हि नवी तहसील निर्माण करण्यात आली. चामोर्शी तालुक्यात गडचिरोली जिल्हयातील सर्वात दाट लोकसंख्या आहे.
या तालुक्यात सरासरी मुबलक प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे धान हे पीक या तालुक्यात सर्वत्र घेतले जाते सोबतच धानाचे दुबार पीकही घेतले जाते. त्याचप्रमाणे कापसाचे उत्पादन सुद्धा चामोर्शी तालुक्यातील येणापूर सारख्या भागात घेतले जाते.
शैक्षणिक बाबतीतही चामोर्शी तालुका अग्रेसर आहे. केंद्र सरकारची शाळा ( नवोदय विद्यालय ) चामोर्शी तालुक्यातील घोट या ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी जिल्ह्यात जंगल क्षेत्र असल्याने वाघ, कोल्हा, हरीण या सारखे प्राणी पाहायला मिळतील महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू सुद्धा येथील चपराळ्याच्या जंगलात पाहायला मिळतो.
सध्या नामशेष होत असलेला गिधाळ पक्षी सुद्धा कुनघाडा व चामोर्शीच्या तालुक्यातील वनक्षेत्रात पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यातील कार्यान्वित प्रकल्प दीना प्रकल्प जो कन्नमवार जलाशयावर आहे हा रेंगडी डॅम म्हणूच प्रसिद्ध आहे.
रेगडी हे गाव गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मध्यभागी असलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे. जंगल असल्याने लाकूड कटाई सारखे उद्योग केले जातात, आष्टी या ठिकाणी पेपरमिल आहे. तालुक्यात अनेक मामा तलाव आहेत सोबतच बंगाली बांधव आणि ढिवर या समाजातील लोकांचे वास्तव्य या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे पारंपरिक मासेमारी हा व्यवसाय देखील येथे केला जातो.
चामोर्शी तालुक्याविषयी थोडक्यात
हे सुद्धा वाचा आरमोरी तालुका - सांस्कृतिक आणि शैक्षणिक
* घोट येथे केंद्र सरकारचे जवाहर नवोदय विद्यालय व वीर बाबुराव स्मारक
* धानाची बाजारपेठ ( धान गिरण्यासाठी प्रसिद्ध )
* कृष्णनगर धाम येथील प्रसिद्ध राधाशाम सुंदर मंदिर
महाल आमगाव
चामोर्शी पासून साधारणतः १२-१३ किमी अंतरांवर आमगाव हे ठिकाण असून या ठिकाणी हेमाडपंथी शिवालय आहे. राष्ट्रकूट वंशाचे राजे गोविंद यांची राजधानी " मयूरखंडी" म्हणून आमगाव प्रसिद्ध आहे.
चपराळा अभयारण्य
चपराळा या ठिकाणी वर्धा वैनगंगा या नदीचे संगम आहे. या ठिकाणास " प्रशांतधाम " म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे.
वर्धा व वैनगंगा संगमातुन होणार प्रवाह पुढे ' प्राणहिता नदी ' म्हणून ओळखला जातो.या ठिकाणी चंदनाचे वृक्ष सुद्धा आहेत. या अभयारण्यात वाघ, हरीण, शेकरू, या सारखे प्राणी आहेत. वनविभाची निरीक्षण कुटी या ठिकाणी आहे जी प्रेक्षणीय आहे.
लोकमंगल संस्था
चिचडोह बॅरेज
चामोर्शी जवळ वैनगंगा नदीवर चिचडोह हा मोठा प्रकल्प झालेला आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box